मी आणि तो

Submitted by _दयानंद_ on 1 November, 2019 - 08:37

मी जपली ती नीती तत्वे | अवघी पोपटपंची |
तो आचरून प्रथम स्वतःशी | जपतो त्यांना अंती |

मी नशिबाला दोष देऊनी | चिडलो स्वतःहा वरती |
तो हसतो अन सहजच म्हणतो | नशीब कसे रे दोषी |

मी दौडवतो हे घोडे तबलख | विचारांचे स्वछंदी |
तो त्याना जुंपून रथाशी | सारथी लईत वळणावर्ती |

मी उगाच झटतो सिद्ध कराया | सत्याच्या त्या राठी |
तो म्हणतो हे सत्य असत्य | रचले कोणासाठी |

मी तेच पुराने रडगाणे गाऊन | रुसतो जगतावरती |
तो मुक्त मोकळ्या स्वछ मनाने | स्वीकारून निघतो पुढती |

मी अपेक्षांचे रचून डोंगर | व्यर्थ तोलतो नाती |
तो ठेऊन दूर अपेक्षा | त्यागून देतो स्वार्थ |

लेखन - दयानंद कांबळे.

Group content visibility: 
Use group defaults