अंदाज अपना अपना - एक Lokal किस्सा

Submitted by A M I T on 1 November, 2019 - 02:25

लोकलमध्ये माझ्या शेजारी एक कमी शिकलेला गृहस्थ बसलेला होता. मी कमी शिकलेला का म्हणालो, याचा खुलासा पुढे येईलच. जलद लोकलमध्ये शक्यतो नेटवर्कची समस्या असते. त्या गृहस्थाने मोबाईलवर अमेझॉन ऍप उघडला. सर्चबॉक्समध्ये Many Pars असा सर्च दिला.
माझा अंदाज - कदाचित हा इसम पर्स (Purse) शोधत असावा. इंग्रजी कच्चं असल्यामुळे स्पेलिंग चुकली असावी.
नेटवर्क कंपन्यांच्या कृपेने त्याच्या मोबाईलवर ऍमेझॉनचं दुकान उघडलं नाही. त्यानं ते प्रकरण 'पर्स'नली घेतलेलं असावं, कारण लगेच त्याने दुसरा सर्च दिला - Violet. ह्यावेळी स्पेलिंग अगदी करेक्ट किंवा मोबाईलच्या आगाऊपणामुळे ऑटोकरेक्ट.

माझा अंदाज - याला जांभळ्या रंगाचं काहीतरी हवंय. पण नक्की काय? नुसताच रंग टाकून सर्च दिला. पुन्हा नेटवर्क कंपन्यांनी ढिम्म राहून आपले अंतरंग दाखवले.

त्याने त्या सर्चबॉक्समध्ये पांढऱ्यावर काळी अक्षरे उमटवून Many Pars असा पुन्हा मघाचाच सर्च दिला.
माझं स्वगत - याला एकच पर्स हवाय ना, मग हा Many पर्स असा सर्च का देतोय? त्याने नुसता पर्स मागितला असता तरी ऍमेझॉनने त्याला ढिगाने पर्स दाखवले असतेच की... अवघडे !!
मी त्याच्या मोबाईलमध्ये गुंतलेले माझे डोळे दुसरीकडे वळवले.

तोवर तिकडे ऍमेझॉननं दुकान उघडून त्याला असंख्य पर्स दाखवले. बहुतेक सगळ्याच पर्समध्ये नोटा कोंबलेल्या दिसत होत्या.
माझा मघाचा चुकलेला अंदाज - त्याने जो Many Pars असा सर्च दिला होता, तो प्रत्यक्षात Money पर्स असा होता. बरोबर आहे! ज्याला पर्सची अचूक स्पेलिंग लिहता येत नाही तो many हा शब्द तरी कसा बरोबर लिहील. हे मी आधीच ओळखायला हवं होतं.
ऍमेझॉनवाल्यांनी आपल्या ग्राहकाच्या मनातलं अगदी अचूक ओळखलं व त्यांनी त्याला त्याच्या एका चीजवस्तूच्या नाना तऱ्हा दाखवल्या.

त्या ग्राहक-दुकानदाराच्या नात्याकडे बघ्याच्या भूमिकेतून स्वतःची करमणूक करून घेणाऱ्या माझ्यासारख्या तिऱ्हाईताच्या तर्काला त्या उभयतांनी छेद दिला.

जाता जाता एवढंच सांगतो, त्या इसमाने Violet म्हणून जो सर्च दिला होता, तो प्रत्यक्षात त्याला Wallet असा द्यायचा होता, हे माझ्या उशिरा लक्षात आले.

माझा अजून एक अंदाज चुकला होता. खरंच अवघडे !!!

* * *

http://kolaantudya.blogspot.com/

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

हा हा हा !!! भारी च Happy हे हसणं त्या माणसाच्या कमी शिक्षणाविषयी नाही तर अश्या गमती होतात त्या बद्दल

छान गमतीशीर किस्सा

चार दिवसांपूर्वीची गोष्ट. मोबाईलवरचा ईंग्लिश मेसेज मी मित्रांना वाचून दाखवत होतो. मध्येच एका शब्दाचा उच्चार मी अवेसम असा केला. लगेचच एका मैत्रीणीने ते ऑसम असे कर्रेक्ट केले. पण आता मला पुढचे काही दिवस अवेसम अवेसम असे ट्रोल व्हावे लागणार Happy

परकीय भाषाच ती. कोणाची कच्ची कोणाची प्क्क्की. ज्यांची पक्क्की असते त्यांच्या ईतरांकडून किमान अपेक्षाही सर्व ईंग्लिश शब्द माहीत असायच्या असतात. त्यामुळे अश्या गमती घडतातच. किंबहुना असे म्हणने योग्य की अश्या गोष्टी घडल्या की गमतीशीर वाटतातच.

कमी शिकलेला नक्की कोण? सर्च करणारा तो कि त्याच्या पर्सनल स्क्रिन मध्ये तो काय काय करतोय हे स्टॉक करणारे तुम्ही Light 1

Google search करतानासुद्धा अनेकदा त्यांना आपल्या मनातले कसे अचूक कळते ह्याचे आश्चर्य वाटते. सर्च मशीन्सना AI बनवलेय की काय असे वाटावे इतक्या सराईतपणे ही मंडळी एक पूर्ण शब्द न लिहिताही आपल्याला बरोबर पाहिजे ते रिझल्ट्स पुढ्यात आणतात.

तो कमी शिकलेला व्यक्ति आणि शेजारच्या अति शहाण्या व्यक्तिपेक्षा मला तर ते ऍमेझॉनवाल्यांचे विशेष कौतुक वाटले. भाषेच्या अडचणीमुळे काही खाणाखुणा करून वस्तु मागणे नाही की नुसत्या बोटाने निर्देश करणे नाही... तरीही प्रत्यक्ष समोर नसलेल्या माणसाला गिर्हाइक बनवणे म्हणजे उत्तम दुकानदार असण्याचीच ही पोच पावती म्हणावी.

मध्येच एका शब्दाचा उच्चार मी अवेसम असा केला. - हे वाचून मला माझा काही वर्षांपूर्वीचा किस्सा आठवला. त्यावेळी कॉलेज मध्ये होतो आणि इंग्लिश फारसे बरे नव्हते. तेंव्हा फॅमिली गेटटूगेदर वेळी काहीतरी वाचताना मी 'chaos चा उच्चार केऑस ऐवजी चाओस असा केलेला :D:D

मला अजूनही मॅलिनचोली शब्दाचा उच्चार कसा करायचा माहीत नाहीय
अजून हा शब्द माझ्यासमोर कोणीच बोलला नाही आणि मला बोलावा लागला नाही त्यामुळे प्रश्न नाही. ☺️

Google search करतानासुद्धा अनेकदा त्यांना आपल्या मनातले कसे अचूक कळते ह्याचे आश्चर्य वाटते>>>

गुगल आपल्या मोबाईलवरील प्रत्येक शब्द वाचतो. मी बऱ्याच वेळा झाडांची शास्त्रीय नावे गुगलत असते, आलेल्या मेसेजमध्ये त्या नावाचा ओझरता उल्लेख असतो. पण मी गुगलायला घेतले की पहिली दोन तीन अक्षरे टाईप केली की गुगल पूर्ण नाव सर्च मध्ये दाखवते. माझ्या सर्च हिस्टरीमधून त्यांना असे काही सापडणे शक्य नसते कारण मी नाव पहिल्यांदा वाचलेले असते. माझ्याआधी गुगल ते वाचून मी सर्च करायला गेले की आता काय गुगलणार हे ओळखून नाव समोर आणते. सुरवातीला गुगल सगळे वाचते याची मला भीती वाटायची, आता मी विचार करणे सोडून दिले.

chaos चा उच्चार केऑस ऐवजी चाओस असा केलेला :D:D
>>>

ओह तेरी
धन्यवाद आपले
मला तर तुमच्यामुळे आता बरोबर उच्चार समजला

कमी शिकलेला नक्की कोण? सर्च करणारा तो कि त्याच्या पर्सनल स्क्रिन मध्ये तो काय काय करतोय हे स्टॉक करणारे तुम्ही Light 1
>>>>

च्रप्स १०० पिंच. सेम विचार माझ्याही मनात आलेला. मला तर स्वतंत्र धागाही दिसलेला यात. पण ईथल्या धागाकर्त्याला मुद्दाम पर्सनल टारगेट करत धागा काढलाय असे व्हयला नको म्हणून मोह आवरता घेतला. प्रत्यक्षात शेजारच्या मोबाईलमध्ये डोकावण्याचा मोह मलाही चुकत नाही. भल्याभल्यांना चुकत नसेल.

साधना , अगं तु सेटिंग तस केलयस गं. गुगल सर्च ऑटो कंपलीत सेटिंग ऑन ठेवलयस. ते ऑफ केलस कि दोन तीन अक्षर टाईप केल्यावर नाही पुर्ण नाव येणार.
अमित, मला खरोखरच आश्चर्य वाटल कि शेजारच्या फोनमधल तुम्ही कस वाचल असेल याच? त्या माणसाला कळलं कस नाही तुम्ही वाचताय ते ?

मी काही टाईप करताना जर कुणी पिपिंग करत असेल तर मला भयंकर ऑड वाटतं, पण तेच एखादा कधी मोबाईल न पाहिलेला माणूस जर व्हिडिओ वगैरे बघताना डोकावला तर मला फार काही वाटत नाही.

>> Google search करतानासुद्धा अनेकदा त्यांना आपल्या मनातले कसे अचूक कळते ह्याचे आश्चर्य वाटते. सर्च मशीन्सना AI बनवलेय की काय असे वाटावे इतक्या सराईतपणे ही मंडळी एक पूर्ण शब्द न लिहिताही आपल्याला बरोबर पाहिजे ते रिझल्ट्स पुढ्यात आणतात.

वाटावे नाही. बनवले आहेच. मशीन लर्निंग आणि एआय चा सर्रास वापर होतोय आजकाल अनेक ठिकाणी. गुगल आघाडीवर आहे.

amazon.com वर अमेरिकेतून many pars सर्च केलं की https://www.amazon.com/s?k=many+pars&ref=nb_sb_noss_1
हे पेज दिसतं.
त्यात मनी पर्स अजिबात कुठे दिसत नाही. भारतातून एआयचा व्हू अर्थात वेगळा असू शकेल.

मी ऐकलेला एक चतुर किस्सा
ईंग्रजांचा अम्मल असताना एका फिरंग्याच्या हाताखाली एक नेटीव चपराशी होता. त्याला ईंग्रजी कळत नव्हते आणि फिरंंग्याला मराठी कळत नव्हते. गोरा साहेब त्याला दरवाजा बंद किंवा उघडायला सांगायचा तेव्हा चपरासी हमखास
गोंधळायचा . साहेबांच्या केबिनचे दार जेव्हा बंद करायचे असे तेव्हा तो उघडे ठेवायचा आणि जेव्हा उघडायचे असते तेव्हा बंद करायचा.
यावर दुसऱ्या एका हुशार इंग्रजी येत असलेल्या भारतीयाने गोऱ्या साहेबाला उपाय सुचवला. त्याला सांगितले तुला जेव्हा केबिनचा दरवाजा बंद हवा असेल तेव्हा तू असे म्हण
There was banker आणि खुला हवा असेल तेव्हा तू त्याला असे सांग
There was cold day.
या दोन्ही वाक्यांचा अर्थ भारतीय चपराशाला इंग्लिश उच्चारा बरहुकूम
दरवाजा बंद कर आणि दरवाजा खोल दे असा बरोबर कळला
चपराशाला इशारा देखील समजत नसावा हे गृहीत धरा.

यावरून आठवलं, बसमध्ये मी खिडकीजवळ बसले होते आणि एफबीवर विडिओ बघत होते, बाजूला बसलेली हिंदी बोलणारी, गावाकडची वाटणारी, मध्यमवयीन बाई तो विडिओ बघून हसत होती. मला वाटलं तिला खिडकीबाहेर काही दिसलं असेल कारण असा कसा ती माझा मोबाईल बघेल, पण नंतर ती विडिओ बघूनच हसतेय हे स्पष्ट कळलं आणि मला तिचा निरागसपणा फार आवडला. हे शिष्टाचारात बसत नाही हे तिच्या गावीही नव्हतं.
कधी कधी ठरवून नाही पण काही मुली ट्रेनमध्ये त्यांच्या मोबाईलमध्ये काय बघत असतात ते दिसतं आणि मजा वाटते. जिवलगा, चला हवा येऊ द्या, बिग बॉस असे वेगवेगळे चित्र दिसते.
माझा एक दुसऱ्या विभागात काम करणारा सहकारी कधी माझ्याबरोबर एकच कॅबमध्ये असेल तर कॅब मध्ये बसल्याबरोबर चला हवा येऊ द्या बघायला सुरुवात करतो, मला हाय हॅलो सुद्धा करत नाही. त्याचं घर येईपर्यंत तो तेच बघतो, पुढे बसतो त्यामुळे मला दिसतं तो काय बघतोय ते.

सुरवातीला गुगल सगळे वाचते याची मला भीती वाटायची, आता मी विचार करणे सोडून दिले >> गुगल सगळे वाचते. एवढच नाही तर ऐकते सुद्धा. मला एखाद्या पदार्थाची रेसीपी माहीत नसेल तर मी माझ्या आईला फोन करून विचारते. बर्‍याचदा मी हा फोन लँडलाइन्वरून करते. पण जेव्हा मी आईशी फोनवर बोलत असते तेव्हा माझा smartphone कुठेतरी आसपासच पडलेला असतो. आई मला सगळी रेसिपी नीट सांगते. नंतर दुसर्‍याच काही कामासाठी मी youtube उघडते. मी कोणतीही रेसिपी youtube वर सर्च करत नाही. तरीही suggested videos मधे मी आईला ज्या पदार्थाची रेसिपी विचारली त्याच पदार्थाचे रेसिपी व्हिडीओज दिसतात. हे माझ्या बाबतीत अनेकदा घडले आहे.

अंदाज अपना अपना - एक Lokal किस्सा

शीर्षकावरुन मला वाटलं कदाचित तुम्हाला कळलं असेल की तो कमी शिकलेला नव्हता.

इतरांना आणि कदाचित खुद्द धागालेखकाला न कळलेलं हे कोडं इथेच सोडवतो -

हल्ली अनेकांना फोनेटिक इंग्लिश कीबोर्ड मधून मराठी टायपिंग करायची सवय लागली आहे. त्यात एखादा इंग्रजी शब्दही देवनागरीत लिहायचा असतो तेव्हा जरी इंग्रजी अक्षरे टाइप केली तरी तो मराठीत उमटावा म्हणून ओरिजिनल इंग्लिश स्पेलिंगमध्ये फेरफार करावा लागतो. जसे की मला मोबाइल हा शब्द मराठीत दिसावा म्हणून इंग्रजीत mobaail असे टाईप करावे लागले. आता दिवसभरात अनेकांना अनेक मेसेजेस व्हॉट्सॅपवर पाठवले की बोटांना हीच चूकीच्या स्पेलिंग्सची (बरोबर इंग्रजी स्पेलिंग्स ठाऊक असूनही) सवय लागते. मग कधीतरी जिथे इंग्रजीत उमटवायचं आहे आणि इंग्रजीतच टाईप करायचं आहे तिथेही ही अशीच चूकीची स्पेलिंग्स टाइप केली जातात. एवढ्यावरुन तो सहप्रवासी कमी शिकलेला असावा असा निष्कर्ष काढू नये.

मी शाळेत असताना शुद्धलेखनाचा सराव केल्याने आजही बर्‍यापैकी शुद्ध मराठी लिहू शकतो पण ते फक्त कागदावर पेनने. इथे मायबोलीवर किंवा मोबाईलवर मराठी टाईप करताना बर्‍याच चूका होतातही त्यावरुन मी अशुद्ध मराठीत लिहितो असा निष्कर्षही कोणी काढू शकेल पण ते वास्तवाला धरुन होणार नाही.

Pages