बहिण

Submitted by vijaya kelkar on 30 October, 2019 - 13:10

बहिण
भगवंता तुला नाही बहिण
तूच असशी सार्‍यांचा वाली
मानवी अवतारी कळली बहिण?
असो सहोदरी वा मानलेली

भगवंता तुला नाही बहिणी
तू 'साहित्य शब्दफुले'चा माली
अडखळली तुझी लेखणी?
लिही..भावनेस आळा घाली

भाऊ नसलेली असते बहिण
तिने मान न घालता खाली
बीजेची चंद्रकोर गगनी?
ओवाळण्या त्यास मान उंचावली

भल्या भल्यांना नसता बहिणी
निरख ती चांदणी नभातली
लुकलुकत्या नजरनं पाहे धरणी?
भाऊराया, ती न रहावी रडवेली

भावी युगात कशी मिळावी बहिण
दोन अपत्ये ही नकोशी झाली!!
कारणे शोधण्या करावी पाहणी?
नको आत्ता ही प्रश्नावली.......
विजया केळकर _____

Group content visibility: 
Use group defaults