नाणी - नवीन जुनी - भूतकाळ जोडणारी

Submitted by सच्चा on 29 October, 2019 - 06:59

या दिवाळीत लक्ष्मीपूजनानंतर दुसऱ्या दिवशी पाडव्याला नैवेद्य झाल्यावर पुजा आवराआवर करताना नाणी गोळा करत होतो. काही जुनी नाणी दिसली, २५ पैसे (चार आणे), ५० पैसे (आठ आणे), पाच पैसे, दहा पैसे, आणि मन लहानपणीच्या भूतकाळात गेले. पाच पैसे, दहा पैसे, चार आणे देऊन गोळ्या, बिस्कीट, चॉकलेट किंवा मुरकूल (बॉबी) असा खाऊ मिळायचा. बऱ्याचदा वेगळी असणारी नाणी गल्ल्यात टाकली जायची.

Pacchis_Paisa.jpgअल्युमिनिअमची दहा पैशांची नाणी

Daha_Paise.jpgDus_Paisa.jpgनंतर आलेली निकेलची ५० पैशांची नाणी
Pachas_Paisa.jpgनिमकी, पावकी, दिडकी, अडचकी शिकलेल्या आमच्या आधीच्या पिढीतील नाणी
Ek_paisa.jpgEk_paisa_New.jpgTeen_Paisa.jpgBees_Paisa.jpgOne_Rupee.jpgब्रिटिशकालीन नाणी

One_Rupee_Victoria.jpgOne_Rupee_George_V.jpgCopper Coin.jpgTwo_Anna_Victoria.jpgOne_By_Four_Rupee_George_VI.jpgनिजामाच्या राजवटीतील काही नाणी

Hyderabad_Rupee.jpgHyderabad_coins.jpgकाही ईतर नाणी

One_Rupee_Parliament.jpg

पंडित जवाहरलाल नेहरू
One_Rupee_Jawaharlal_Nehru.jpg

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी
Two_Rupee_Dr_Shayamaprasad_Mukharjee.jpg
लुईस ब्रेल
Two_Rupee_Louis_Braille.jpg

नेताजी सुभाषचंद्र बोस
Two_Rupee_Netaji.jpg

संत तुकाराम
Two_Rupee_Sant_Tukaram.jpg

श्रीमती इंदिरा गांधी
Five_Rupee_Indira_Gandhi.jpgFive_Rupee_Jain.jpg

आचार्य तुलसी
Five_Rupee_Acharya_Tulsi.jpg
माता वैष्णो देवी
Five_Rupee_Vaishno_mata.jpg
डॉ. होमी भाभा
Ten_Rupee_Homi_Bhabha.jpgपरदेशी नाणी (श्रीलंकन नाणी) - ही नाणी कशी आमच्याकडे आली त्याची काहीही कल्पना नाही.

Srilanka_25_Paise.jpgSrilanka_Ten_Paisa.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त आहेत नाणी.
आमच्या गावामधे एका दुकानात ही नाणी आता आतापर्यंत चालायची. पण फक्त लहान मुलांनाचा ही नाणी देऊन खावू मिळायचा.

मस्त कलेक्शन! का माहीत नाही, पण मला ते २५ पैशाचं नाणं फार आवडायचं. कदाचित, बस च्या तिकीटाला, शाळेबाहेर मिळणार्या पेरूला वगैरे ते लागायचं / पुरायचं म्हणून असेल. किंवा ५, १०, २० पैसे ह्या अ‍ॅल्युमिनियम च्या नाण्यांपेक्षा, हे ४ आण्याचं निकेल चं(?) नाणं वेगळं आणी थोडं अधिक किमतीचं वाटायचं म्हणून असेल. सहसा ५, १०, २० पैशाची नाणी ही कशाला तरी जोड म्हणून दिली जायची. २५ पैशाच्या नाण्याला मात्र स्वतंत्र अस्तित्व / किंमत होती. Happy

ही 1 आणि 3 पैश्यांची नाणी काही वर्षांपर्यंत माझ्याकडे होती. लहानपणी आजोबांकडून घेतली होती. नंतर कुठेतरी हरवली. तुमच्यासारखाच वेगवेगळी नाणी जमवायचा छन्द मलाही आहे. त्यामुळे तुमचं कलेक्शन पाहून मस्त वाटलं. ती श्रीलंकन नाणी नक्की कुठल्यातरी भाजीवाल्याने दिली असणार तुम्हाला. Proud

वाह्ह भारीय कलेक्शन
माझा काका शाळेत असताना त्याच्याकड़े सुद्धा चाराणे आणि आठाणे वाटतील अश्या आकाराची काही श्रीलंकन आणि काही अरब देशातील नाणी चुकून आलेली. बहुधा छोट्या मुलाना खाउच्या ठेल्यावरचे असे गंडवून नको असलेली / भारतात न चालणारी नाणी खपवत असावेत.

मस्त कलेक्शन.
माझ्याकडे १ पैसा २ पैसे ३ पैसे आणि ५ पैसे अशी नाणी होती जमवलेली. आजोबांची असतील.
काही परदेशी नाणी पण होती. आता कुठेतरी हरवली.
५ पैसे २० पैसे २५ पैसे आणि ५० पैसे मी स्वतः वापरलंय लहानपणी. २५ पैसे आणि ५० पैसे काही वर्षांपुर्वी बंद झाले.
हल्लीच माझ्याकडे एक नव्या १ रुपयाच्या नाण्यासारखं वेगळंच भाषेतलं नाणं आलं होतं.
टॅक्सीवाल्याने दिलं असावं.

छान कलेक्शन.
निजामाच्या राजवटीतील, लुईस ब्रेल, आचार्य तुलसी, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी, डॉ. होमी भाभा, श्रीलंकन नाणी पहिल्यांदा बघितली.
बाकीची आहेत आमच्याकडेपन.

मस्त आहे संग्रह.
छोटी १० पैशाची चकचकीत नाणी मीही भरपूर जमवून ठेवली होती मला आवडायची म्हणून. पुढे त्याचं काय झालं कुणास ठाऊक!

अरेच्चा! माझ्याकडेसुद्धा सेम कलेक्शन आहे... आणि प्लस टकल्या नेहरूचा चित्र छापलेले काही नाणीसुद्धा आहेत....कुणीतरी सांगितलेले ती नाणी दुर्मिळ आहे आहेत म्हणून..