तारा

Submitted by प्रिया खोत on 27 October, 2019 - 22:48

माणगाव तालुक्यातील गिरणा हे गाव डोंगराळ भागात वसलेलं. गिरण्याचं गाव तस मोठच सर्व जातीचे लोक वेगवेगळ्या अळयामध्ये पण एकाच गावात राहायचे. शेती सांभाळून मासेमारी करणें गाई गुर पाळणे हा व्यवसाय. तिथली काही लोक शेतातच घर बांधून राहणं पसंत करत म्हणजे शेतातून येण्या- जाण्या साठी लागणारा वेळ वाचवा.
गिरण्याचं गावात तारा राहायची. तारा ही जवळपास ३० गाठलेली गावातील एक बाई.मध्यम उंचीची उन्हामुळे रंग थोडा काळवडलेला पण तरी दिसायला सुंदर. अशिक्षित असली तरीही हुशार. नऊवारी लुगडं नेसणारी गावातली एक काटक बाई.
लग्न लवकर झाल्याने पदरात २ मूल. तारापण वेळ वाचवा म्हणून शेतातच घर बांधुन राहायची. सासरे नवरा मुलं आणि तिने पाळलेल्या गाई म्हशी वासर असा संसार एकत्र घेऊन शेतातल्या घरात राहायचि. तशी तारा धाडशी असल्याने तिला शेतात एकट राहायला कधी भीती वाटायची नाही. दिवसभर नवरा सासरे कामासाठी बाहेर असले मूळ शाळेत गेली असली तरी ती एकटीच असायची.
पेरणी पासून ते भात कापून झोडपून सर्व एकटीच करायची. कामासाठी मजूर घेणे हे तीला माहीतच नाही.
शेतजमीन आणि आजूबाजूला जंगल असल्याने जंगली प्राण्यांचा धोका कायम असायचाच.
एक दिवस अशीच ती एकटीच घरात काही काम करत असताना अचानक एका बिबट्याने तारा कडे असलेल्या बछड्यावर हल्ला केला. आणि बछड्याला घेऊन जंगलात जात होता ते तारानी बघितलं.
तारा त्या बछड्याला वाचवण्यासाठी बिबट्याच्या मागे धावत गेली . बिबट्याला तिने गाठल आणि बछड्याला सोडवण्याचा प्रयत्न करू लागली. त्या बछड्याला एक बाजूने तारा ओढतेय तर एका बाजुने बिबट्या. ना तारा हार मानायला तयार ना बिबट्या त्या बछड्याला सोडायला तयार. जवळ पास १५-२० मिनिटे ही झुंज चालूच होती. अखेर बिबट्या त्या जिद्दी स्त्री पुढे हरला.
तारानी त्या बछड्याला काही इजा न होवु देता बिबट्याच्या जबड्यातून सोडवलेलं होत पण हे करत असताना तिने ना त्या बिबट्याला मारलं ना स्वतःच्या जीवाला काही होऊ दिल.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बरं..

छान ...
फक्त काही मुद्दे खटकले ते पुर्नविचार करून संपादित करणे योग्य वाटले तर अवश्य विचार करावा ―

१) नऊवारी लुगडं लावणारी गावातली एक बिनधास्त बाई ...

नऊवारी लुगडं लावणारी नेसणारी
एक बिनधास्त (???) बाई
→→एक काटक स्त्री
______________________

२) एक दिवस अशीच ती एकटीच घरात काही काम करत असताना अचानक एका वाघाने तारा कडे असलेल्या बछड्यावर हल्ला केला....

माणगावला पट्टेरी वाघ नसावा त्यामुळे ही कथा बिबट्या वाघाबद्दल आहे हे गृहीत धरून पुढील मुद्दा वाचावा -
पाळीव प्राणी आणि गोठ्यातील जनावरे ह्यावर बिबट्या रात्री हल्ला करतात आणि त्याच्या आटोक्यात असणारे सहज सोप्पे सावज घेऊन डिनर पार्टी करायला निघुन जातात.

कुठलीही माणसाची हालचाल जाणवली किंवा मोठ्या गुरांनी गोंधळ माजवला तरी ते पुढील धोका टाळण्यासाठी ते सावज सोडून दुसरीकड़े जातात.

वाघ हल्ला करताना आपले दोन्ही सुळे खोलवर त्या सावजाच्या मानेत रुतवतो (नरडीचा घोट घेणे म्हणजे हेच ते) आणि ही पक्कड़ त्याने सोडल्यशिवाय (इतर कोणाच्या खेचाखेचीने) सूटत नाही आणि समोरून आलेल्या ताराला बघुन बिबट्या एकतर सर्वप्रथम आपले सावज उचलून पटकन अंधारात निघुन जात गायब होईल किंवा न घाबरता ( ती एक्टीच आलीय ह्याची खात्री झाल्यावर) सावजात रुतलेले सुळे बाहेर काढून आता तारावर हल्ला करायचा बेत आखेल. म्हणजे तिला जख्मी केले की तो आपले आधीचे सावज उचलून पळून जाऊ शकेल.

कुठल्याही प्रकारे तो बछड़ा जीवंत राहणे बहुतांश अशक्यच असते. त्यामुळे चेन स्नैचर सोबत खेचाखेची करून आपली चेन परत सुखरूप मिळवणे आणि वाघाच्या तोंडातून एखादे भक्ष्य खेचाखेची करून सुखरूप जीवंत मिळवणे ह्यात खुप मोठ्ठा फरक आहे/ असतो.
____________________

३) तारा त्या बछड्याला वाचवण्यासाठी वाघाच्या मागे धावत गेली .

एकतर तारा ही टारझन/मोगलीच्या फॅमिलीतली असेल किंवा तो वाघ स्पोर्ट्स कॉम्पेक्सच्या रनिंग ट्रैकवर धावत असेल म्हणून रात्र असली तरी त्या हैलोजन फ्लडसमुळे दिसू शकत असेल Light 1

बादवे बिबट्या हे जनावर किमोफ्लेजमध्ये इतके माहिर असते की त्याने ठरवले तर १० फुटावर लपलेले त्याचे अस्तित्व माणसाला ओळखता येणे दुरापस्त होऊन जाते ...( त्या माणसाच्या सोबत कुत्रा नसेल तर )
____________

४) टाइपो --
बछड्याला सोडवण्याचा पर्यंत करू लागली.
बछड्याला सोडवण्याचा प्रयत्न करू लागली.

आज्ञानी दुरुस्ती साठी धन्यवाद बद्दल करते पण वाघ( बिबट्या) दिवसाच आला होता ती शेतजमीन असल्याने तिकडे दिवसा पण बिबट्याचा वावर असणार हे साहजिकच.

ही सत्य घटना आहे कदाचित शब्दात मांडायला नीट जमलं नसेल म्हणून चूका झाल्या असतील. पण तुमच्यासारखे मित्र चूक दुरुस्त करायला असतील तर नक्कीच लवकर शिकेन.

आज्ञानी दुरुस्ती साठी धन्यवाद बद्दल करते पण वाघ( बिबट्या) दिवसाच आला होता ती शेतजमीन असल्याने तिकडे दिवसा पण बिबट्याचा वावर असणार हे साहजिकच.

ही सत्य घटना आहे कदाचित शब्दात मांडायला नीट जमलं नसेल म्हणून चूका झाल्या असतील. पण तुमच्यासारखे मित्र चूक दुरुस्त करायला असतील तर नक्कीच लवकर शिकेन. >> लिहीत रहा आणि वाचन वाढवा. पुढील लेखनास शुभेच्छा.