तारा

Submitted by प्रिया खोत on 27 October, 2019 - 22:47

माणगाव तालुक्यातील गिरणा हे गाव डोंगराळ भागात वसलेलं. गिरण्याचं गाव तस मोठच सर्व जातीचे लोक वेगवेगळ्या अळयामध्ये पण एकाच गावात राहायचे. शेती सांभाळून मासेमारी करणें गाई गुर पाळणे हा व्यवसाय. तिथली काही लोक शेतातच घर बांधून राहणं पसंत करत म्हणजे शेतातून येण्या- जाण्या साठी लागणारा वेळ वाचवा.
गिरण्याचं गावात तारा राहायची. तारा ही जवळपास ३० गाठलेली गावातील एक बाई.मध्यम उंचीची उन्हामुळे रंग थोडा काळवडलेला पण तरी दिसायला सुंदर. अशिक्षित असली तरीही हुशार. नऊवारी लुगडं लावणारी गावातली एक बिनधास्त बाई.
लग्न लवकर झाल्याने पदरात २ मूल. तारापण वेळ वाचवा म्हणून शेतातच घर बांधुन राहायची. सासरे नवरा मुलं आणि तिने पाळलेल्या गाई म्हशी वासर असा संसार एकत्र घेऊन शेतातल्या घरात राहायचि. तशी तारा धाडशी असल्याने तिला शेतात एकट राहायला कधी भीती वाटायची नाही. दिवसभर नवरा सासरे कामासाठी बाहेर असले मूळ शाळेत गेली असली तरी ती एकटीच असायची.
पेरणी पासून ते भात कापून झोडपून सर्व एकटीच करायची. कामासाठी मजूर घेणे हे तीला माहीतच नाही.
शेतजमीन आणि आजूबाजूला जंगल असल्याने जंगली प्राण्यांचा धोका कायम असायचाच.
एक दिवस अशीच ती एकटीच घरात काही काम करत असताना अचानक एका वाघाने तारा कडे असलेल्या बछड्यावर हल्ला केला. आणि बछड्याला घेऊन जंगलात जात होता ते तारानी बघितलं.
तारा त्या बछड्याला वाचवण्यासाठी वाघाच्या मागे धावत गेली . वाघाला तिने गाठल आणि बछड्याला सोडवण्याचा पर्यंत करू लागली. त्या बछड्याला एक बाजूने तारा ओढतेय तर एका बाजुने वाघ. ना तारा हार मानायला तयार ना वाघ त्या बछड्याला सोडायला तयार. जवळ पास १५-२० मिनिटे ही झुंज चालूच होती. अखेर वाघ त्या जिद्दी स्त्री पुढे हरला.
तारानी त्या बछड्याला काही इजा न होवु देता वाघाच्या जबड्यातून सोडवलेलं होत पण हे करत असताना तिने ना त्या वाघाला मारलं ना स्वतःच्या जीवाला काही होऊ दिल.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users