रंग जीवनाचे

Submitted by nivedita dole on 24 October, 2019 - 13:28

कधी पान हळवे कधी सोनपिवळे
कधी सानुले गोजिरे लाल कवळे !

कधी रंग झाडांवरी भारलेले
कधी शुष्क वाटांवरी सांडलेले

सडे केशरीसे कधी शिंपलेले
कधी तप्त भूमीत कोमेजलेले

गहिऱ्या मनाच्या रुजोनि तळाशी
कधी कोंभ अंकुरतो, घे उराशी !'

किती रंग मी पाहिले जीवनाचे
तुझ्या सोबतीने , कधी एकटीने !

Group content visibility: 
Public - accessible to all site users