सगळे कसे अताशा

Submitted by डॉ अशोक on 24 October, 2019 - 05:20

*--------------------------------*
सगळे कसे अताशा.............
*--------------------------------*
सगळे कसे अताशा, छान चालले होते
जखमांना काळाचे, मलम लावले होते !
*
सूर जुळले नसतील, ताल बरोबर होता
मुखड्यातून तू मजला, सहज गाळले होते !
*
पेल्यातुन घेतो पण, नशा तसली नाही
घोट-घोट नजरेचे, व्यसन लागले होते !
*
भुतकाळाचा बटवा, उघडून बसलो असता
कप्प्यात सा-या अश्रू, सहज दाटले होते?
*
कट्टी करून जेंहा, दूर आपण झालो
गप्प रहायाचे मी, वचन पाळले होते.
*
-डॉ अशोक
हे गीत डॉ गोपाळ देशपांडे, मुंबई ह्यांनी दि १२-१०-२०१९ (कोजागिरी) रोजी पुणे इथं माझ्या घरी गायले आहे.
https://www.youtube.com/watch?v=dZH6PI1sP-Y

Group content visibility: 
Use group defaults