चाहूल

Submitted by vijaya kelkar on 23 October, 2019 - 18:31

चाहूल

लागे चाहूल
पडे पाऊल
आले खुशीत
हे घरकुल......

कपडे नवे
फटाके हवे
जावे बाजारी
भावंडांसवे .....

घर सफाई
करी पुताई
कामे आवरा
सारीच घाई....

शंकरपाळी
खाऊ फराळी
भरले डबे
आली दिवाळी....

मऊ उटणं
मोती साबण
अभ्यंग स्नान
मग औक्षण....

आकाशदीवा
रे रामा शीवा
छान बनला
आवडे जीवा....

ही रंगावली
ही दीपावली
करी स्वागता
'जया'आपली........

विजया केळकर______

Group content visibility: 
Use group defaults

छान