एक वेळ ...

Submitted by आत्रिक on 22 October, 2019 - 13:01

नेहमी आपण कितीही चिडवले तरी गप्प बसणारा मित्र एखाद्या दिवशी सणसणीत बैकफायर करतो अणि ते पचवायला जड़ गेले की आपल्या तोंडातून निघते "हर कुत्ते का एक दिन होता है" इथपासून ते त्याच मित्राबरोबर "च्यायला, कसा वेळ निघून गेला कळलेच नाही " असे म्हणण्यापर्यंत वेळेला खूप वेळा आठवतो आपण.

पण ही पोस्ट काही अशा फुकट काढलेल्या वेळा परत काढण्यासाठी नाही, ही तशी वेगळी पोस्ट पण नाही म्हणता येणार; ही एक फ़क्त ओळख आहे पुढील लिखाणाची.

आयुष्य कितीही व्यस्त झाले असेल तरी अनेक वेळा येत असतात , जिथे आपण स्तब्ध होतो, प्रसन्न होतो, खिन्न होतो, विचारी होतो, अवखळ होतो आणि आणि आणि .....

ह्या वेळा जगण्याच्या भाऊगर्दीत पकड़ता येत नाहीत, किंवा पकडण्यासाठी आपण तयार नसतो.

माझा प्रयत्न एवढाच की ह्या वेळा जपून ठेवायच्या. मनाच्या एक कोपऱ्यात अलगद ठेवून द्यायचे, वेळ मिळाला की इथे शब्दांकित करायचे

ह्या वेळा कधी क्षणात असतात कधी तासात कधी दिवसात , काही भरवसा नाही, आपल्या हातात फ़क्त अनुभवणं त्यामुळे या वेळा जगायच्या जशा मिळतील तशा , जितक्या मिळतील तितक्या, शेवटी EMI चे हफ्ते आयुष्य कधीच समृद्ध करात नाहीत.

आता आजचीच गोष्ट

नेहमीप्रमाणे चर्चगेट ला शेयर टॅक्सी घेतली आणि निघालो. सिग्नलच्या जरा आधी एका मुलीने माझ्या टैक्सीला एवढ्या आरामात क्रॉस केले की विचारु नका, ड्रायवरने एकदम शांतपणे बाजुने गाड़ी घेतली. त्याच क्षणी माला एकदम मस्त वाटले, मी त्या मुलीच्या जागी असतो तर मला खुप छान वाटले असते की आपण एवढ्या आरामात क्रॉस पण कोणीही हॉर्न नाही वाजवला.

छोटे छोटे आनंद !!!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users