देव कसा आहे आणि तो का आहे?

Submitted by मी सुंदर आहे. on 22 October, 2019 - 12:22

गावाबाहेरच्या देवळात साधू बाबा येतात. लोक आम्हाला उपदेश करा, सत्संग करा असा आग्रह करतात. तेव्हा साधूबाबा प्रवचनाची वेळ देतात. दिलेल्या वेळेला गावकरी जमतात. बाबा म्हणतात देव आहे असं किती लोकांना वाटतं? जवळपास निम्मे लोक हात वर करतात.
साधूबाबा म्हणतात म्हणजे बाकीच्या लोकांना देव नाही असं वाटतं तर.‌ मग एक काम करा, ज्यांना देव आहे असं वाटतं त्यांनी देव नाही असं वाटणाऱ्यांना देव आहे हे पटवून द्या. व बाकीच्यांनी देव कसा नाही हे आहे वाल्यांना पटवून द्या. मी चाललो. कारण आता माझी गरज नाही.
मला सुद्धा देव आहे की नाही या प्रश्नानं खूप छळले आहे. हिंदू धर्मातील तत्त्वज्ञाना प्रमाणे देव आहे व चौऱ्यांशी लक्ष योनी फिरुन झाल्यावर मानवी जन्म मिळतो, फक्त मानवी जीवनात योग्य आचरणातून मोक्ष मिळून देवपदाला पोचता येते.
आता विज्ञानाच्या अंगाने विचार केला तर पृथ्वी वर अगोदर एक पेशीय सजीव तयार झाले, पुढे पुढे उत्क्रांती होत निसर्गाच्या अनुकुलनातून वेगवेगळ्या प्रकारचे जीव तयार झाले. हजारो किलोमीटर दूर असलेल्या, वेगवेगळ्या भाषा, रंग, रुप, आहारविहार असलेल्या अनेक समुहांमध्ये देव सुध्दा वेगवेगळ्या रुपात हजर होता व आहे. काहींचा देव मनुष्य रुपात, काहींचा पशु, पक्षी, दगड, वृक्ष, पर्वत, पाणी, सूर्य अशा वेगवेगळ्या वस्तूत, रुपकांत आहे. तर काही लोकांचा देव अदृष्य आहे. तो सर्वशक्तिमान आहे असं एकमत आहे.
देव जणू मायबोलीचा अॅडमिन आहे. समोर येत नाही, दिसत नाही पण आहे.
देव कनवाळू कैवारी असल्याचा संतांनी दावा केला आहे पण इथं मर्त्यलोकात कैक लोक अर्धपोटी, उपाशी राहतात. आजाराने ग्रस्त, अभावाने गांजलेले, परिस्थिती मुळे रंजलेले लाखो जीव आहेत. मग देवाला त्यांची दया का येत नाही. निदान त्याला मानणाऱ्या, पुजणाऱ्या लोकांना संकटातून, पुरातून, आगीतून, दुष्काळातून का वाचवित नाही?
डॉ. श्रीराम लागू यांच्या विचारांनुसार देवाला हद्दपार केले पाहिजे का? देव हा माणसा माणसात भांडणं लावतोय असे मला वाटते. देव ही कल्पना आहे. समुहाच्या अंतर्मनातील देव आहे हा विश्वास एखाद्या तरंगाप्रमाणं कार्य करीत असावा व त्या विश्वास रुपी बलालाच देव समजलं जात असावे असे वाटते.
विषय खूप मोठा आहे. पुर्ण विषयाला हात घालणं माझ्या आवाक्याबाहेर आहे. तेव्हा आपल्या जाणीवा, अनुभव यांतून आपण देवाला मानता किंवा मानत नाही, देव आहे की नाही हे जाणून घ्यायला आवडेल. धन्यवाद.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

कीरण्या चे गाढव होते ते त्याचे गाढव पुरोगामी बनलं
मग हरारे मध्ये जावून किरण्या ची स्त्री झाली .
ही ईश्वराची च कृपा.

ज्यांना देव नाही असं वाटतं ते देवळात का येतील?
>>>
प्रसाद खायला.
मी सुद्धा त्याचसाठी जातो..
Submitted by ऋन्मेऽऽष on 3 January, 2020 - 14:57
>>> हे उत्तर मला सुचत नव्हतं. धन्यवाद ऋन्मेष भाई.

कीरण्या चे गाढव होते ते त्याचे गाढव पुरोगामी बनलं
मग हरारे मध्ये जावून किरण्या ची स्त्री झाली .
ही ईश्वराची च कृपा.
Submitted by Rajesh188 on 3 January, 2020 - 11:29
>>> मै शशिराम हूं, किरण्या का दूश्मन. लाजू तूला ओळखायला आलं नाही.

ते स्वानुभावातून आलेले उत्तर आहे. मी प्रसाद, महाप्रसाद, भंडारा जेवण वगैरे न चुकवता लाभ घेतो.
बाकी देव न मानणारयांनी देवळात जायची बरीच कारणे आहेत. या वरच्या केसमध्ये किर्तन प्रवचन ऐकायलाही लोकं जमली असतील. सांस्कृतिक कार्यक्रम, ऑर्केस्टा वगैरे असेल देवळात तर का चुकवायचा?
मी किर्ती कॉलेजला असताना सिद्धीविनायक मंदिरात निव्वळ सुण्दर सुंदर मुली बघायला जायचो.
आमच्यायेथील एक गणपतीमंदीर भक्त आणि भाविकांचा नाही तर एकांत शोधणारया प्रेमी युगुलांचा अड्डा आहे.

ऑं

ऋन्मे श
भक्ती भावाने जाणारी सुद्धा लोक असतात.

>>> मै शशिराम हूं, किरण्या का दूश्मन. लाजू तूला ओळखायला आलं नाही.
काय तुझी ही अवस्था झालीय .
स्त्री आयडी घेतलं की बोबड बोलावं लागतं का.
मला माहित नव्हतं.
त्या मुळे ओळखू शकलो नाही.
इथे सुधा पुरुष रुपात
वावरू शकत नाही.
स्त्री आयडी ghava लागतोय.

ऋन्मे श
भक्ती भावाने जाणारी सुद्धा लोक असतात.
>>>
अर्थात ! त्यांच्यासाठीच तर मंदिर अस्स्ते.
वर त्याव्यतीरीक्त कोण कश्याला जाते हा प्रश्न होता. पोस्झ्त वाचा आधीच्या Happy

स्री आयडी आहे म्हणून इतके दिवस टिकला राजेश भाऊ. यार आपण कसं नेहमी सोबत राहीलोय. म्हणून गंमत केली. बाकी काय नाय. माफी देव.

Pages