अनंत प्रेमचक्र अर्थात The Infinite loop of love भाग ४

Submitted by शुभम् on 17 October, 2019 - 07:40

अनंत प्रेमचक्र अर्थात The Infinite loop of love भाग १
https://www.maayboli.com/node/71968
अनंत प्रेमचक्र अर्थात The Infinite loop of love भाग २
https://www.maayboli.com/node/71975
भाग -३
https://www.maayboli.com/node/71983

संकेत त्याच्या घरीच होता . तो रवीला मेसेज करणारच होता . पण मागच्या दोन वेळेस काय झालं हे त्यालाही आठवलं . पहिल्या वेळेस जेव्हा रवीने त्याला बोलून घेतलं व सांगितलं त्यावेळेस त्यावेळेस ही प्रीतीचा मृत्यू झाला . दुसऱ्या वेळेस त्याने प्रितीला वाचवायचा प्रयत्न केला पण दुसऱ्या वेळेसही प्रीतीचा मृत्यू झाला आणि त्याच वेळी जो कोणी प्रीतीला मारायला आला होता त्याने रवीचा गैरसमज करून दिला की त्याला संकेत ने मदत केली होती . पण रवीला माहीत नव्हतं की संकेतला सर्वकाही आठवले आहे . म्हणून संकेतने पुन्हा एकदा रवीला मेसेज केला .
' Come tonight , project work '
रवीचा काही रिप्लाय आला नाही . संकेतला काय करावे कळेना . बिन बोलवता जावे तर रवीचा संशय अधिकच दाट होईल व तोच प्रीतीचा मारेकऱ्याला मदत करतो आहे असे वाटून तो संकेतलाच मारायचा प्रयत्न करेल . पण संकेतला माहित होतं त्याने कोणत्या मारेकर्‍यांना मदत केली नव्हती . जो कोणी मारेकरी होता तो भलताच हुशार होता त्याने दोन मित्रांमध्ये संशयाचे बीज पेरलं होतं जेणेकरून ते एकमेकांची मदत घेऊ शकणार नाहीत आणि त्याचं प्रीतीला मारण्याचं काम अधिकच सोपं होणार होतं .
संकेतला शांतपणे बसून प्रीतीचा मृत्यू पाहणे सहन होत नव्हतं . त्याने गपचूप त्या दोघांचा पाठलाग करण्याचे ठरवले . जो कोणी मारेकरी होता त्याला पकडण्याचे त्याने मनाशी निश्चित केले . त्याला तर रघुवीर सांगितलेल्या सर्व गोष्टी आठवल्या होत्या पहिल्या दोन वेळेस प्रीती तिच्या घरी गेली होती त्यावेळी तिचा मृत्यू झाला होता तिसऱ्यावेळेस रवी तिच्या सोबत असूनही तिचा मृत्यू झाला होता . पहिल्या तीन वेळेस मृत्यू कसा झाला हे त्याला माहीत नव्हतं . पण शेवटच्या दोन्ही वेळेस पण बंदूकच वापरली होती . पहिल्या तीन वेळेस त्याने समोर न येता गपचूप खून केला होता . पण शेवटच्या दोन्ही वेळेस तो उघडपणे समोर आला होता कारण त्याला गुपचुपपणे काम करता येणे शक्य होते . कारण शेवटच्या दोन्ही वेळेस ते दोघेही प्रीती बरोबर उपस्थित होते त्यामुळे त्याला गुपचूपपणे काही करता येणे शक्य नव्हते . मात्र आता रवी एकटाच होता आणि तो काय करेल काही सांगता येत नव्हतं . त्यामुळे संकेतने त्यांचा पाठलाग करण्याचे ठरवले .

संकेत ने गाडी घेतली व रवीच्या बिल्डिंग समोर घेऊन उभारला . त्याने कपडे वेगळे घातले होते तोंडाला रुमाल ही बांधला होता . साधारणपणे कोणालाही दिसणार नाही अशा जागी तो लपला होता . तो बिल्डिंगच्या गेट वरती येणाऱ्या-जाणाऱ्या कडे लक्ष देत होता . तो आल्यापासून कन्ही संशयित व्यक्ती आत आली होतं किंवा गेली नव्हती . तो बराच वेळ तिथे उभा होता . नेहमीच्या वेळी पिझ्झा डिलिव्हरी बॉय पिझ्झा घेऊन आला . तो आत जात असताना कोणीतरी त्याला बेशुद्ध केलं . त्याच्याकडून पिझ्झा घेत तो माणूस आत जाऊ लागला.त्याच्या मागोमाग संकेतही जाऊ लागला . मधेच थांबत त्याने पिझ्झ्यामध्ये काहीतरी मिसळले . तो रवीच्या दाराची बेल वाजवणार तेवढ्यात संकेत ने त्याला मागून पकडले . त्याने दार वाजवत रवीला हाक मारली .
" रवी पटकन बाहेर ये मी त्याला पकडले आहे .....
दार उघडत रवी बाहेर आला . संकेत संकेत तू काय करतोयस इथे ....
" रवी हाच आहे प्रीतीचा खुनी ....
" तुला कसं माहित म्हणजे तुला आठवतंय का काय सगळं....
" होय रवी मला मागच्या दोन्ही वेळेस घडलेल्या घटना आठवत आहेत.....
" ही तुझीच चाल आहे , तुला पहिल्यापासून सारं काही आठवत होतं , तूच आहे खूनी .....
" मी का करू प्रीतीचा खुन मी तिच्यावरती प्रेम केलं होतं आणि अजूनही करतो .... हा माणूस खरा पिझ्झा डिलिव्हरी बॉय नाही . त्यांने खऱ्या डिलिव्हरी बॉयला बेशुद्ध केलं . त्याच्याकडून पिझ्झा घेऊन तो तुम्हाला द्यायला येत होता . त्याने त्याच्यामध्ये काहीतरी मिसळलही होतं . मी त्याला पकडलं नसतं पुन्हा एकदा तिचा जीव गेला असता ....
त्याने पकडलेल्या माणसाला मारत बोलू लागला ...
" बोल बोल काय मिसळलं पिझ्झ्यात .....
" काही नाही काही नाही साहेब मला एका माणसाने भरपूर पैसे दिले होते हे काम करण्यासाठी . तो म्हणाला की जर मी पिझ्झा डिलिव्हरी बॉयला बेशुद्ध केलं आणि त्यामध्ये काहीतरी मिसळल्याचं नाटक केलं तर अजूनही तेवढेच पैसे देईल......
तेव्हाच आतल्या खोलीत गोळी झाडल्याचा आवाज आला . त्या पाठोपाठ एक किंकाळी हवेत विरून गेली . पुन्हा एकदा त्या माणसांने प्रीतीचा खून केला होता .....
पुन्हा एकदा तो टाईम लुप रिसेट झाला होता . संकेतच्या हातात पुन्हा एकदा मोबाईल होता . तो रवीला मेसेज करणार होता पण या वेळेस त्याने मेसेज करण्याचे टाळले . सहावी वेळ होती . महेंद्र स्वामीनाथनला संपर्क साधण्याचे त्याने ठरवले . त्यांनी बरीच धडपड करून महेंद्र स्वामीनाथचा प्रायवेट नंबर मिळवला .
" Hello... Mahendra speaking..
" तू मला ओळखत नसशील . पण मला एक फार महत्त्वाचं बोलायचं आहे ....
" Who is this....?
" Do you remember priti , who punched you in seventh standard....? , I am her friend sanket ....
" Ohh priti.... अरे प्रीती प्रीतीला मी कसा विसरेन...?
" म्हणजे तू विसरला नाही तर तुझ्या लक्षात आहे सारं काही ...
" मग अरे सारं काही लक्षात आहे तिथून तर माझं सारं आयुष्य बदललं....
" म्हणजे तू अजूनही राग धरून आहे मनात..
" राग कशाचा राग... राग नाही अरे प्रीतीला मला थँक्यू म्हणायचंय...
महिंद्र स्वामीनाथन हा त्या टाईम ट्रॅव्हलरला मदत करत नाही किंवा त्याच्या मनात प्रीती बद्दल राग नाही हे ऐकून संकेत उत्साहाच्या भरात बोलून गेला
" म्हणजे तू पुढे जाऊन टाईम मशीन बनवून भूतकाळात येऊन प्रीतीला मारणार नाही तर ....
" काय काय बोलतोस काय तू.....
भलतेच बोलून गेल्याची सारवा सरव करतो म्हणाला
" काही नाही काही नाही असंच म्हणालो चेष्टेने....
" पण माझ्याशी तू टाइम ट्रॅव्हलची चेष्टा का करशील....? तुला माहीत नसेल पण टाईम ट्रॅव्हल हा माझा सगळ्यात आवडीचा विषय आहे...
" मी तुला काही सांगितलं तर तू मला वेड्यात तर काढणार नाही ना.....
" बोल बोल काय म्हणतोस तू.....
संकेत ने त्याला झालेले सर्व किस्से सांगितले...
" This is fascinating , not only time travel is possible but also some one is already doing it ....! पण प्रीतीला मारण्यासाठी एवढ कष्ट कुणी घेतला असावं....
" आम्हालाही तेच कळत नाही प्रीतीला मारण्यासाठी कोणी टाईम मशीन बनवली असावी..? किंवा ज्याने कोणी टाईम मशीन बनवली त्याच्याकडून जो कोणी मारू इच्छित आहे त्याने चोरली असावी... पण तो आहे कोण हेच कळत नाही ....
" सोपं आहे . साधारणपणे पुढच्या वीस ते तीस तीस वर्षात कुठल्या कुठल्या इन्स्टिट्यूट आणि कुठले कुठले शास्त्रज्ञ टाईम मशीन बनवू शकतात हे आपल्याला शोधून काढावे लागेल ....
" ठरलं तर मग तू यादी तयार कर तोपर्यंत मी प्रीतीला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करेन....
आणि संकेत रवीच्या खोलीकडे निघाला...
6

संकेत रवीच्या बिल्डींगपाशी पोहोचला . रवी आणि प्रीती दोघेही कोठेतरी निघाले होते .
" रवी कोठे चाललाय तुम्ही ...?
" संकेत तू आमच्या पासुन दुर रहा , आम्हाला नको आहे तुझी मदत .... रवी म्हणाला
" माझं ऐकून तर घे , मी महेंद्र स्वामीनाथनशी संपर्क साधला आहे , त्याच्या मनात प्रीती बद्दल अजिबात राग नाहीये.... दुसरेच कोणीतरी तिच्या माग आहे ......" संकेत त्यांच्याजवळ जात म्हणाला
" तू तिथेच थांब जवळ येऊ नकोस
" रवी तुला माहित आहे मी कधीच तिला दुखणार नाही , you know yaar I still love her ... "
पुढेही या दोघांची वादावादी सुरूच राहिली पण संकेतच्या त्या वाक्याने प्रीतीच्या ह्रुदयाचा वेध घेतला .
" येऊ दे त्याला , मारायचं असतं तर त्याने मला अगोदरच मारलं असतं ... प्रीती रवीला म्हणाली
यावेळी ते प्रीतीची मैत्रीण अंजलीच्या घरी जमले होते . अंजलीच्या घरी तिचे आई-वडील नव्हते . घरी एकटीच असल्याने रवी , संकेत , प्रीती नि अंजली त्या ठिकाणी गोळा झाले होते . अंजलीच्या घरी म्हटल्यावरती संकेत ने जरा का - कू करायचा प्रयत्न केला . कारण अंजलीचे त्याच्यावरती क्रश होतं . तिला बोलायची फार सवय . कोणत्याही विषयावरती बोलू शकत असायची . तिला वाचायची , चित्रपट पाहायची कविता करायची आवड . ती नेहमी संकेत बरोबर बोलायचा प्रयत्न करायची , पण संकेत शक्यतो तिला नम्रतापूर्वक फाटा द्यायचा . तिला जेव्हा टाईम लूप , प्रीतीचा खून , भविष्यातला माणूस या गोष्टी सांगितल्या तेव्हा तर ती हबकलीच .
" This is freaking exciting ... ते उत्साहाच्या भरात बोलून गेली पण बाकीच्या तिघांची गंभीर चेहरे पाहून सर्वांकडे बघत ती सॉरी म्हणाली... " पण मला एक सांगा तुम्ही म्हणता येतो भविष्यातून आला आहे , मग त्याच्याकडे कोणती फ्युचर टेक्नॉलॉजी आहे का.?"
" अगं अजून त्याचा चेहरा पण पाहिला नाही आम्ही त्याचा आवाज मात्र रोबोटिक आहे म्हणे ....प्रीती म्हणाली
" पण मला एक कळत नाही, प्रीती मृत्यू तुझा होतोय , तुझ्यामुळे loop reset होतोय आणि तुलाच आठवत नाही.... हे जरा विचित्र वाटत नाही का ....?म्हणजे फक्त रवी आणि संकेतला का आठवतय... इतर कोणाला आठवत नाही....? "
" काय माहित कशामुळे होते...." प्रीती म्हणाली
तेव्हाच संकेतने सगळ्यांचे लक्ष वेधून घेत बोलायला सुरुवात केली
" इकडे लक्ष द्या , आपल्याला कसेही करून त्याला पकडला पाहिजे...
" तुमच्या म्हणण्याप्रमाणे ही सातवी वेळ आहे , मागच्या सहाही वेळेस तुम्ही फेल झालाय ... आता माझं ऐका ..
अंजलीने संकेतला गप्प करत बोलायला सुरुवात केली " तुम्हाला माहीत नसेल तर सांगते घरामध्ये entry करण्यासाठी फक्त एकच गेत आहे तिथून तो आला तर आपल्याला कळेलच आणि दुसरीकडून आला तरीही कळेल . कारण घराच्या चारी बाजूला सीसीटीव्ही आहेत . Dad जरा जास्तच ओव्हरप्रोटेक्टिव आहेत . आपण वरच्या गेस्ट रूम मधे थांबूया . तिथून सीसीटीव्ही फुटेज या टॅबलेटवरून पाहता येईल .... पण तो आल्यावर त्या आपल्याला रेडी राहावे लागेल....

अंजली उत्साहात होती . तिने पेपर स्प्रे बॅट आणि घरा जी एकुलती एक रिवाल्वर होतं ते आणि इतर साहित्या जे शस्त्र म्हणून वापरता येईल ते गोळा केलं . ते सर्वजण गेस्ट रूम मध्ये गोळा झाले .
" आणखी एक गोष्ट मागच्या वेळेस आपण पिझ्झा डिलिव्हरी बॉयला पकडायला गेलो पण तो खरा खुनी नव्हता . त्याला खऱ्याने पैसे दिले होते ..."संकेत म्हणाला " मग याही वेळेस त्याने दुसऱ्या कोणाला पाठवले तर..." रविने शंका काढत स्वतःलाच विचारले ...
" कितीही येऊ दे मी आहे तोवर प्रीतीला काही होणार नाही... तसेही Nature doesn't want her dead that's why we are getting chances to save her ..... अंजली म्हणाली
" It might not be natural; it might be happening due to some setting in time machine , आपल्याला नक्की माहीत नाही हा loop कितीवेळा reset होणार ते , त्यामुळे आपल्याला लवकरात लवकर हा निकाल लावावा लागेल...
" You are so talented अंजली संकेतला बिलगत म्हणाली ....
" बघा बघा भिंतीवरून उडी मारून कोणीतरी आत येतोय.... प्रीती टॅबलेट वरती पहात म्हणाली . तो भिंतीवरून आत आला व मागील दाराने आत शिरायचा प्रयत्न करू लागला. मात्र या चौघांनी सारी दारे व खिडक्या pack करून टाकल्या होत्या . घरातील खुर्च्या सोफा व जाड वस्तू सर्व काही दारा व खिडक्या मागे लावून टाकल्या होत्या . त्यामुळे आत येता येणे सहजासहजी शक्य नव्हते . त्याच्या पायात विटकरी रंगाचे बूट होते . काळी पॅंट , पांढरा शर्ट , गुडघ्यापर्यंत येणारा व पूर्ण हात झाकणारा काळा कोट घातलेला . हातात पांढरे हातमोजे व तोंडावरती काळा मास्क आणि डोक्यावर गोल काळी टोपी असा विचित्र पोषाक होता त्याचा...
दारातून आत जाता येईना त्यामुळे तो वैतागला . त्याने दारावर वैतागून लाथा घातल्या पण नंतर त्याला सीसीटीव्ही दिसला . सीसीटीवी पुढे जात त्याने त्याच्या कोटमधून छोटेसे ग्रेनेड काढले व विचित्र हातवारे करत तो नाचू लागला . त्याने ग्रेनेडची पिन काढली व ते दारापुढे फेकून दिले . तो थोडावेळ लांब जाऊन उभारला . काही क्षणातच एक मोठा विस्फोट झाला व ज्या कॅमेरातून त्यांना दिसत होते तो कॅमेरा बंद झाला . संपूर्ण घर हादरुन निघाले . सर्वत्र धुळीचे लोट उडाले . चौघांचेही कान वाजू लागले . त्यांना काही कळायच्या अगोदरच त्यांच्या खोलीत एक ग्रेनेड आले . ते बाहेर फेकण्यासाठी संकेत धावला पण त्यातून अगोदरच धूर निघू लागला . संकेत जागेला बेशुद्ध झाला त्याच्यापाठोपाठ ते तिघेही बेशुद्ध झाले .

7

जेव्हा त्यांना जाग आली तेव्हा त्यांचे हात-पाय खुर्चीला बांधले होते . तोंडावरती पट्टी होती . चौघेही अंजलीच्या घरी कैद झाले होते . त्यांचे नियोजन पुन्हा एकदा फसले होते . त्यांच्यासमोर तो विक्षिप्त माणुस उभा होता . त्याला पाहून प्रीती बोलायचा प्रयत्न करू लागली . पण तिच्या तोंडावरती पट्टी असल्याने तिला नीट बोलता येईना .
" थांब थांब आत्ताच काढतो तुझ्या तोंडावरची पट्टी . आणि त्यांने प्रीतीच्या तोंडावरची पट्टी काढली....
" का मला मारायच्या मागे लागलायास तू ..... अजून किती वेळा मारणार आहेस .....? कोण आहेस तरी कोण तू .....? आणि मी काय वाईट केलय तुझं....? "
" बास बास भरपूर बोलून झालं तुझं " आणि त्यांने पुन्हा एकदा तिच्या तोंडावर ती पट्टी बांधली .
" तू माझ्या आयुष्याच वाटोळ केलस तू नसतीस तर माझं आयुष्य काही वेगळं झालं असतं म्हणूनच तुला मारायला मी भूतकाळात झाले आत्ताच जर तू मेलीस तर माझं आयुष्य पूर्ण बदलेल....
अजूनही बराच वेळ प्रीतीने त्याच्या आयुष्याचं वाटोळं केलं याचाच गाणं गात बसला . कसं केलं कधी केलं हे मात्र त्यांना सांगितले नाही . स्वतःला महान समजत तो उपदेशाचे डोस पाजत होता...
" चला जास्त वेळ न घालवता काम करून टाकलेलं बरं.... त्याने बंदुक काढली आणि प्रीतीला तीन चार गोळ्या घातल्या . प्रीतीची तिची हालचाल बंद झाली.
" चला काम तर पुर्ण झालं .... मागच्या वेळी जो आला होता त्याला करता आले नाही पण मी करून दाखवलं ..... " त्याच्या आवाजातून आनंद ओसंडून वाहत होता . जणू काही हे अशक्य शक्य झाल्याप्रमाणे ओरडत तो निघूनही गेला .

यावेळेस तिचा मृत्यू होऊनही लूप रीसेट झाला नव्हता . ते तिघेही जागेलाच होते . रवी संकेत आणि अंजली अजूनही खुर्च्यांना बांधलेले होते . तिचा मृत्यू यावेळेस झाला होता आणि तो कायमसाठी झाला होता . संकेतच्या डोळ्यातून अश्रू नकळत वाहून गेले , पण त्यांची जागा लगेच प्रतिशोधाने घेतली . ते त्यांचं जीवन जगत होते . सुखात असो दुःखात असो , एकत्र असो वेगळं असो . प्रीती भलेही त्याचा राग राग करत असो पण लपून का असेना तिचा आनंदी चेहरा त्याला बघता येत होता . तिच्या सुखात तो सुख मानत होता . आता होतं ते थोडेफार सुखही कोणा भविष्यातल्या माणसाने येऊन हिरावून घेतलं . त्याचं मन पूर्णपणे रागाने भरले . तो खुर्चीची जोरात आदळआपट करू लागला . तो कसेतरी करून सुटला . पहिल्यांदा प्रीतीला सोडून तिला झोपवून , त्याने रवि व अंजलीला सोडवले. नंतर तो त्या माणसाच्या मागे गेला .

रविला तर काहीच कळत नव्हते . प्रीती विना आयुष्याची कल्पनाच करू शकत नव्हता . त्याने तिचे शीर त्याच्या मांडीवरती घेत तिच्या केसांवरून हात फिरवत तो रडत होता . " रवी रवी.... प्रीती अडळखत बोलली .... प्रीती अजून जिवंत होती . अंजलीचा एक विचित्र फॅशनेबल ड्रेस मेटल थ्रेडसने बनवलेला होता . तो तिने घातलेला असल्यामुळे गोळ्यांचा वेग कमी झाला होता ;पण गोळ्या लागल्या होत्या . " माझं ऐक ...." ती अडखळत अडखळत हळुवारपणे बोलत होती " मला नाही वाटत यावेळी लूप reset होईल , आय लव यु रवी... आणि संकेतला सॉरी म्हणून सांग . मी खूपच harsh वागले रे त्याच्याशी.... बोलताना तोंडातून रक्त येत होतं आणि शेवटी ती शांत झाली . आणि लूप पुन्हा एकदा रिसेट झाला ...

रवी आणि प्रीती त्यांच्या रूममध्ये होते . संकेत त्याच्या त्याच्या खोली शवरती होता . साऱ्यांना वाटलं होतं यावेळी लूप काही रीसेट होणार नाही , पण झाला होता . रवी आणि संकेतला सारं काही आठवत होतं . प्रीतीला अजूनही काही आठवत नव्हतं. रवीने तिला नेहमीप्रमाणे समजावून सांगितले . आतापर्यंत तिचा सात वेळा मृत्यू झाला होता . तोपर्यंत रवीला संकेतचा फोन आला ..
" हेलो , रवी मी मागच्यावेळेस त्याच्या मागोमाग गेलो होतो . त्याची टाईम मशीन , टाईम मशीन म्हणण्यापेक्षा टाईम पोर्टल पाहिले मी . जुना पूल आहे ना तिथं आहे . तुम्ही दोघेही अंजलीच्या तिथे या . आपण काय करायचं ते ठरवू तिथे .
ते सारे पुन्हा एकदा अंजलीच्या घरी जमले .
" मला वाटत आपण पोलिसात जाऊया..." अंजली म्हणाली
" वेडी आहेस का..? पोलिसांना काय सांगणार ? टाइम ट्रॅव्हल करून प्रीतीला मारायला भविष्यात अजून कोणीतरी आले आहे म्हणून ...." संकेत म्हणाला
" नाही , नाही , बरोबर बोलतेय ती , आपण सारं काही सांगायचं नाही . फक्त सांगायचं कोणीतरी मारायला मागे लागलाय आणि त्याचं वर्णन करायचं . जोपर्यंत तो सापडत नाही तोपर्यंत आम्ही तिथेच थांबू .....
" ठरलं तर मग तुम्ही दोघी पोलीस स्टेशनला जा आणि आम्ही दोघे त्या पोर्टल कडे जातो ...." रवी म्हणाला . त्या दोघीही पोलीस स्टेशन कडे जाण्यासाठी निघाल्या आणि रवी व संकेत त्या पोर्टलकडे कडे निघाले .

त्या दोघीही पोलीस स्टेशनमध्ये पोहोचल्या . दोघीही जरा दबकत दबकतच आत गेल्या .
" काय गं पोरींनो इकडे कुठे ...?
" काही नाही साहेब कंप्लेंट करायची होती ....."
अंजली म्हणाली
" कशाची कंप्लेंट करायची तुम्हाला ...? बापमाणूस नाही का बरोबर....?
" कंप्लेट आम्हाला करायचीय , फक्त आम्हाला करता येत नाही का ...? पुन्हा अंजली म्हणाली
" या या ... इकडे या.. बसा असं खुर्चीवर . सगळं खरं हाय , पण उठ सूट कंम्प्लीट करायला ही काय मोबाईल कंपनीचा ऑफिस नाही.... तुमची कुणी छेड काढली असेल तर सांगा . त्याला चांगलाच चोप देऊ. पुन्हा कोणी बघायची हिंमत पण करणार नाही....
" तसं काही नाही साहेब मला कोणीतरी मारायचा प्रयत्न करतोय... प्रीती म्हणाली ...
नंतर तिने ममागच्यावेळी अंजलीच्या घरात घडलेल्या घटनातून काही घटना वगळून जेवढ्या गरजेच्या आहेत तेवढ्या सांगितल्या .
" बरं बरं लिहू तुमची कंप्लेंट . दोन मिनीटं बसा जरा त्या बाकड्यावर . माझं हातातलं काम आटपल लिहून टाकू तुमची कंप्लेंट ....
त्या दोघीही बाकांवरती बसल्या तो बाक खिडकीला लागून होता . प्रीती व अंजली त्या ठिकाणी बसल्या . त्यांची पाठ खिडकीकडे होती . बऱ्याच वेळा बऱ्याच गोष्टी अशा घडतात की त्यांना स्पष्टीकरणे नसतात . प्रीतीला जो मारायला आला होता , तो हुशार तर होताच पण अजून त्याला प्रीतीला मारता आले नव्हते . आताही त्यांचा पाठलाग करत तो पोलीस स्टेशन पर्यंत आला होता . पोलीस स्टेशनच्या मागच्या बाजूने आत शिरत ज्या खिडकीपाशी त्या दोघी बसल्या होत्या तिथे आला . सायलेन्सर बसवलेल्या बंदुकीने त्याने गोळी झाडली . त्याला वाटलं की गोळी तिला लागली म्हणून तो लगेचच पळाला . पण ती गोळी लागली एका पोलिसाला . जेव्हा त्याने गोळी झाडली त्याचवेळी प्रीती बाजुला झाली व ती गोळी त्या पोलिसाला लागली . पोलिस स्टेशनमध्ये गोंधळ माजला . मारेकरी पळून जाताना प्रीती व अंजलीने पाहिला . त्याच्यापाठोपाठ दोन-चार पोलिसही गेले .
" कोणाची एवढी हिंमत झाली रे पोलीस स्टेशनमध्ये येऊन गोळी झाडायची...
" साहेब तोच होता , जो आमच्या मागे लागलाय... प्रीती म्हणाली
" अगं पोरींनो तुम्ही केलंय तरी काय एवढं गुंड माग लागण्यासारखं ..... तो हवालदार म्हणाला .
" तेच सांगत होतो आम्ही , आम्ही काहीच केलं नाही आणि तो आमच्या का मागे लागलाय तेच आम्हाला कळत नाहीये... अंजली तावातावात म्हणाली
तोपर्यंत ॲम्बुलन्स आली होती जखमी पोलिसाला हलवलं होतं . त्याचं रक्त सर्वत्र पसरलं होतं .
" बर मला सांगा तुम्हाला मारायला जो कोणी मागे लागला त्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का..? म्हणजे तो कोण आहे...? कोण असू शकतो ...? तुमचं कोणा बरोबर भांडण वगैरे झाले का ....?
" साहेब प्रीतीचं कोणा बरोबर भांडण नाही ...? तिला मारायच्या मागे कोण लागले तेच आम्हाला कळेना....
तोवर तिथली वॉकी-टॉकी वाजली . त्या मारेकऱ्यालग पकडण्यात यश आलं होतं . त्याला घेऊन स्टेशन कडेच येत होते .
" तुम्ही थांबा थोडा वेळ इथेच...
पोलीस त्याला घेऊन आत आले . आल्या आल्या त्याला साहेबांनी पट्ट्याने चांगलाच चोप दिला . त्याचा कोट टोपी काढून बाजूला टाकले . जेव्हा त्याचा मास्क काढायला गेले , तेव्हा तो वेड्यासारखा करू लागला . पण सगळ्या पोलिसांपुढे त्याचा काही निभाव लागेना . शेवटी त्याचा मास्क काढलाच . त्याखालचा चेहरा पाहून प्रीती जागीच स्थिर झाली . तिच्या डोक्यात विचार येण्या अगोदर त्यानं पोलिसांच्या कमरेची पिस्तुल काढून प्रीती वरती गोळ्या झाडल्या . हा तिचा आठवा मृत्यू होता . आणि लूप पुन्हा एकदा रीसेट झाला ....
क्रमःश

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे बापरे..... किती वेळा होणार हे असं??

मला तर रवीवरच संशय येऊ लागला आहे. Lol

मस्त आहे.

टाइम लूप आणि टाइम मशीन या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. रवी आणि इतर हे टाइम लूप मधे अडकलेत आणि त्यामुळे घटना पुन्हा पुन्हा होत आहेत हे लॉजिकली पटते, पण मग टाइम ट्रॅवल चा काय संबंध इथे? कुणी प्रितीला मारायला भविष्यातून येतेय असे कशामुळे वाटतेय त्यांना?

वेलींगकर हा चित्रपट तीन डिसेंबरला रिलिज झाला . माझी कथा दोन नोहेंबरला संपली. त्यामुळे ही कथा मला विकी वेलिंगकर वरून सुचलेली नाही हे म्हणण्यास हरकत नाही. शेवटचा भाग मी आज पोस्ट केले पण प्रतिलिपी वरती हा भाग 2 नोव्हेंबरला पोस्ट झालेला आहे तुम्ही वाटलं तर जाऊन पाहू शकता. ( जर एखादा मी खास मोठा माणूस असेन व मला स्पेशल प्रिमिअरसाठी जर डायरेक्टरने बोलवला असेल तर कदाचित तसं असू शकतं )

चार ऑक्‍टोबरला मी पहिला भाग लिहिला होता आणि 2 नोव्हेंबरला शेवटचा भाग .. 4 ऑक्टोबर च्या अगोदर मी कथा लिहायला सुरु करण्यापूर्वी blood punch नावाचा एक हॉलिवूड चित्रपट पाहिला होता , ज्यामध्ये टाईम loop concept होती . तो चित्रपट माझ्या डोक्यातून हटत नव्हता . त्यामुळे मला तशीच एक स्टोरी लिहायची होती , पण त्या चित्रपटाची concept थोडीशी वेगळी होती. एका native american चा श्राप असलेल्या जमिनिवर तीन लोक जमलेले असतात . त्या जमिनीला असा शाप असतो की जर तिथे एखादा माणूस मेला तर जेवढे माणसे जमली आहेत त्यातील जोपर्यंत एक जणच जिवंत राहत नाही व बाकीचे मरत नाहीत तोपर्यंत कोणीच त्या टाईम लूप मधून बाहेर पडू शकणार नसतात .

Time lapse , the time trap , edge of tomorrow , project almanac , back to future trilogy , terminator , source code , blood punch , time bandits , deja vu , arrival , arq , happy death duology , before I fall , predestination , time crimes , looper , triangle , premature , groundhog day , naked , the endless , coherence , butterfly effect , about time ,hot tub time machine , the time machine ....

असे बरेच हॉलिवूडचे चित्रपट जे टाईम ट्रॅव्हल , टाईम लुप , पारेलल डायमेन्शन या संकल्पनांवर आधारित आहेत . ते मी पाहिलेले आहेत. त्या चित्रपटांचा परिणाम कथावर आहे हे मी मान्य करतो , पण विकी वेलिंगकर याचा मुळीच नाही हे मला सांगायचं आहे .

मला विकी वेलिंगकर चित्रपटाविषयी मुळीच माहिती नव्हती .. प्रतिलिपी वरती मी कथा पोस्ट करत होतो . मला मध्यंतरी कमेंट आली ज्यामध्ये माझी कथा विकी वेलींगकर चित्रपटासारखी आहे असं सांगितलं होतं. त्यानंतर मी चित्रपट डाऊनलोड करून पाहिला....

टाइम ट्रॅव्हल किंवा टाईम लूप या संकल्पनेभोवती फिरणारा मराठीतील हा पहिला चित्रपट आहे . त्यामुळे चित्रपटाचे कौतुक करायलाच हव , पण कितीही केलं तरी फारसा साधलेला नाही हेही तेवढंच खरं...

मराठीमधे सायन्स फिक्शन चित्रपट फारशे नाहीत. फुंत्रु आणि हा सोडला तरी दुसरे सायन्स फिक्शन चित्रपट मी तरी पाहिले नाहीत. विकी वेलिंगकर चित्रपटांमध्ये विकी हे पात्र फारच मूर्ख वाटतं , हे मी स्पष्ट शब्दात बोलतोय आणि माझी कथा त्यावरून सुचली असं मला म्हटल्यानंतर जरा विचित्र वाटतं . मी लिहिलेली पत्रे फारशी शहाणी किंवा हुशार आहेत असे म्हणत नाही . माझी सुरुवात आहे लिहिण्याचा प्रयत्न करतोय . पण एखादा चित्रपट जर लिहायचा असेल तर त्यामागची कथा एकदम चांगली असावी कारण ते किती तरी लाखो लोक पाहणार असतात .

मला ही कथा सुचली ती हॉलिवूडचे भरपूर चित्रपट पाहिले त्यामुळे . त्या चित्रपटावरून सुचली असं म्हटलं तरी हरकत नाही . पण विकी वेलिंगकरवरुं सुचली नाही एवढ मात्र खरं....

ओके शुभम Happy
साम्य जाणवले म्हणून लिहीले होते. तो सिनेमा मला आवडला नव्हताच

तसं नाही....
सुचलेलं आहे म्हणा , पण तो चित्रपट तर भारी असावा , सुचनण्यासारखा...... Lol Lol Lol
तो चित्रपटच पुर्ण सुचलेला आहे...
Blood punch वरूण सुचलंय हे मी मान्यच करतोय