हैदराबादमध्ये महाराष्ट्रात वापरला जाणारा तांदूळ व इतर किराणा (ब्रॅण्ड्स) कुठे मिळेल?

Submitted by Cuty on 13 October, 2019 - 09:02

हैदराबाद,सिकंदराबादला इंद्रायणी, बासमती मोगरा यासारखा महाराष्ट्रात वापरला जाणारा तांदूळ, जेमिनी ऑईल ब्रॅण्ड व ईतर मसाल्याचे ब्रॅण्ड (सुहाना, प्रविण वगैरे) कोठे मिळतील?
मी अजुन इथल्या डि मार्ट ,बिग बझार वगैरे मध्ये गेली नाहिये मात्र कुणाला याबद्दल माहिती असेल मला जास्त शोधाशोध करावी लागणार नाही. कृपया कोणाला माहीत असेल तर सांगावे.
तसेच दिवाळी खरेदीसाठी(कपडे, cookwear इ.) पुण्यातील रविवार पेठ,तुळशीबाग यासारखी ईथे कोणती ठिकाणे आहेत?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुम्ही कुठल्या भागात राहता? मसब टॅ़ क भागात एक चांगले किराणा दुकान आहे. खरे दी साठी बडी चौडी इथे जोशी मसाले इथे सर्व मराठी पदार्थ मिळतील. इथे जास्त करून सोना मसूरी वापरतात भाताला.

आणि तुळशीबाग / रविवार पेठ म्हणजे सिकंदराबादचे मोंढा मार्केट. किंवा बडी चावडी जवळ सुलतान बझार.

हैदराबादचं माहिती नाही पण बंगलोरला जीरा राईस नावाचा तांदूळ मिळतो त्याला आंबेमोहोरासारखाच वास असतो. इथे मोअर मधे मिळतो. तिथेही कुठे मिळत असेल तर बघा.

अमा,मानवजी ,वावे धन्यवाद!
मी सिकंदराबाद जवळ राहते.
अमा, तुम्ही सांगता तो मसब टॅक म्हणजे कोणता भाग आहे?कुठे आहे?