खडतर आयुष्य ! तीच-११

Submitted by रिना वाढई on 11 October, 2019 - 07:08

सगळं काही विसरून ती आता नव्याने सुरुवात करणार होती . राजीव खूप समजदार होता , तिला प्रत्येक गोष्टीत तो समजून घेत होता . म्हणून तिला त्याच्याशी लग्न करायला काही हरकत नव्हती . लग्नाचा दिवस आला . ती जगाला दिसत होती तेवढी आंनदी तर नव्हतीच .
पण कोणासाठी आपलं आयुष्य थांबत नाही हे तिला कळलं होत आणि म्हणून तिला आपल्या आयुष्यामध्ये समोर जावंच लागणार होत .
लग्नाच्या चहलपहल मध्येही तिची नजर त्याला शोधत होतीच . तिला कुठेतरी माहित होत कि तो नाही येणार लग्नाला पण राहून राहून तिचे डोळे त्याला शोधू लागले होते . शेवटी नाहीच आला होता तो . तिच्या लग्नाच्या दिवशीच तो परत गेला होता .
एकदाच लग्न पार पडलं , ती सासरी आली . प्रत्येक नवऱ्या मुलीच्या स्वप्नासारखे तिचेही काही नवखे स्वप्न होते . गृहप्रवेश झाला आणि तिचे स्वप्न एक एक करून तिथेच चूरर्रर्रर्र होत गेले .
पाहुण्यांनी घर गच्च भरलं होत . सोबत म्हणून तिच्या एक दोन मैत्रिणी आल्या होत्या . ती घरात येताच सगळ्यांचे ऑर्डर देणे चालू झाले होते . कुणाला चहा , कुणाला जेवण वाढणे तर कुणासाठी नाश्ता . नवीन घर , नवीन माणसे तसेच हे कामसुद्धा तिच्यासाठी नवीनच होते म्हणायला हरकत नाही . तिला घरकामाची सवय नव्हतीच .
ती हळूहळू सगळं शिकणार होती , पण आल्या आल्याचं किचन तिच्यामार्फत सोपविण्यात आलं . नवीन नवरी घरी येण्याच्या खुशीपेक्षा सगळ्यांना त्यांच्या कामाच्या जबाबदारीतून मुक्त झाल्याची ख़ुशी जास्त दिसत होती . तरी तिने सगळी बाजू सांभाळत जे जमेल , जस जमेल तस केलं होत . सोबतीला मैत्रिणी होत्याच .
सगळे जमेल तिथे लोळत होते , पण ह्यांना मात्र कोणी विचारात सुद्धा नव्हतं झोपण्यासाठी . घर तस मोठं होत , त्यात राजीव ची स्वतंत्र खोली होतीच पण पाहुण्यांनी ती खोलीसुद्धा सोडली नव्हती झोपण्यासाठी .
राजीव चा स्वभाव जरा शांत असल्याने त्याने कोणाला काहीच बोलल नाही . ती आणि तिच्या मैत्रिणीसाठी त्याने स्टोर रूम मध्ये झोपण्याची व्यवस्था केली . स्टोर रूम हे जरा विचित्रच वाटलं होत तिला पण उपाय काहीच नसल्याने तिथे मुकाट्याने जाऊन झोपावचं लागलं . लग्नाच्या पहिल्याच दिवशी असा अनुभव येईल अशे अपेक्षित नव्हतेच तिला .
राजीवच्या घरच्यांना देखील नव्या नवरीची तिळमात्र काळजी नव्हती वाटली . दमले असतील सगळे , म्हणून आपल्याकडे लक्ष नसेल कुणाचं असं वाटून तीने स्वतःच्या मनाला समजविले .
राजीव शहरात नोकरी करत असल्याने तो लवकरच गेला, तिला सासरी एकटीला ठेवून . एक महिना तिने सासरी काढला , नंतर राजीव तिला आपल्या सोबत घेऊन आला . तिला वाटलं आता तरी किमान आपल्याला निवांत दोघेच राहता येणार .
ज्या गोष्टी अजून नाही कळल्या राजीवच्या त्या समजून घेता येईल पण त्याच्यावर सुद्धा पाणी फेरल . या दोघांसोबत अख्खी पलटनच आली होती .
राजीव ची आई , बाबा , बहीण आणि बहिणींचे दोन मुलं . सगळं खटलाच तिथे आला होता . नवीन नवीन असल्याने ती काही बोलू शकत नव्हती . पण राजीव तर बोलू शकला असता पण त्याने घरच्यांना नाही म्हणण्यापेक्षा तिलाच समजविणे पसंत केले .
"थोड्या दिवसाची गोष्ट आहे , सगळे आठ - दहा दिवस राहून जातील परत" . राजीवने तिला सांगितलं .
आठ - दहा दिवस केव्हाच संपले पण कोणी जायचं नावच घेत नव्हते . शेवटी अजून आठ दिवसांनी ते सगळे गेले . ते सगळे गेल्यानंतर आपण दोघेच राहू , मस्त फिरायला जाता येईल , बाहेर हॉटेलचे जेवण आणि काय काय तिने मनातच सगळं ठरवलं होत . पण ते सगळे गेल्यावर मात्र तिला एकटीला घरात राहावसंच वाटत नव्हतं . आजपर्यंत घर किती भरलं होत आणि आता अगदी रिकामा झाला ती राजीव ला सांगत होती .
पण कितीही झालं तरी काही क्षण दोघांनाही हवे होतेच .
दोन - चार महिने अगदी नवलाईचे गेले , दोघेही एकमेकांना समजून घेत होते . त्यांनतर त्यांच्याकडे एक एक जण यायला लागले होते . पाहुणे म्हणून नाही तर नेहमीसाठी . कोणी शिकायला , तर कोणी कामाच्या शोधात . आणि राजीव ला कोणालाही "नाही " म्हणणे जमत नव्हते . राजीव लहानपणापासूनच समजदार होता .
आपली कशीही परिस्थिती राहिली तरी दुसर्यांना मदत करणे हा त्याचा मूळ स्वभावच होता . एक एक करत चांगले चार पाच लोक त्यांच्याकडे ठिय्या करून राहू लागले होते . तिने इंजिनीरिंग ला ऍडमिशन केली त्यामुळे तिला सकाळी च सगळ्यांचं आवरून कॉलेज ला जावे लागत होते . कामाची सवय नसलेली ती आता सगळे काम शिकू लागली होती .
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
एकदा तिच्याकडे एक लग्न होत , तिच्या लग्नानंतर ती पहिल्यांदाच दुसऱ्या कुणाच्या लग्नात जात होती . त्या लग्नात तिचा सगळा आप्तपरिवार येणार होता म्हणून राजीव आणि ती त्या लग्नात गेले होते . लग्नाच्या आधी फक्त जीन्स आणि टी-शर्ट घालण्याची सवय असल्याने हा साडी प्रकार थोडा अवघड च जात होता तिला . पण लग्न समारंभ असल्याने तिथे साडी घालणे अनिर्वायच होते .
कशीबशी साडी नेसून ती मंडपात पोहचली . साडीमध्ये ती शोभूनच दिसत होती . सगळे खूप दिवसांनी भेटले होते म्हणून त्यांच्या गप्पा जरा चांगल्याच रंगल्या होत्या . तेवढ्यात तिच्या समोर "तो " येऊन उभा झाला .
त्याला पाहताच तिला आश्चर्याचा जोरदार धक्का बसला , तो असा कधी दिसेल असे वाटले नव्हते तिला . राजीव हि तिथे आला , तिच्या घरचे त्याला राजीव ची ओळख करून देऊ लागले.
तो आणि राजीव बराच वेळ बोलले . ती त्या दोघांना बघत दूरच उभी होती . राजीवने तिला आवाज देताच ती जवळ गेली . त्याला ती अजून राजीव ची ओळखी करून देत म्हटली , हा राजीव.
हो ओळख झाली आमची आधीच म्हणून दोघेही हसू लागले .
तिला त्याच्याशी काय बोलावं हे सुचतच नव्हतं , आणि तोच राजीवला फोन आल्यामुळे तो जरा दूर गेला . सगळा घोळका आजूबाजूला होताच मात्र ती आणि तो एकमेकांकडे एकटक नजर लावून बघत उभे होते . शेवटी तिने काहीतरी बोलायचं म्हणून बोलायला सुरुवात केली .
केव्हा आलास , इकडे लग्नात कस काय ? आणि शेवट ,"माझ्या लग्नाला का नाही आलास" ?
तो - सुट्ट्या संपल्या होत्या आणि शाळेचा पहिला दिवस तोच असल्याने त्या दिवशी जाणे टाळता नाही आले .
तेवढ्यात राजीव आला , चला निघू आपण , उशीर झाला आहे . असं म्हणताच ती त्याला bye करून निघून गेली .
परत जाताना तिने राजीव कडे पाहिलं त्याचा चेहरा थोडा उदास वाटला तिला .
काय झालं राजीव? काही बोलत का नाही आहे तू . तिने न राहवून राजीव ला विचारलं .
काही नाही ग , हा तोच होता ना ज्याला तू आधी खूप like करायचीस .
तिने राजीवला त्याच्याबद्दल आणि अभय बद्दल सुद्धा आधीच सांगितलं होत . एक नवा नातं जोडताना त्यामध्ये काही फसवेगिरी वाटायला नाही पाहिजे असं तिला वाटायचं , आणि म्हणूनच तिने राजीव ला निसंकोच आपल्या मनातले बोलून दाखविले होते . राजीव ला तिचा हा स्वभाव खूप भावला होता . लोक प्रेम करतात पण त्यामध्ये यश नाही आलं कि मग खोटे हि बोलतात , पण तिने तसे केले नव्हते . तिचा स्पष्ट बोलण्याचा स्वभाव राजीव ला खूप आवडत होता .
पण प्रत्यक्षात त्याला भेटून राजीवच्या मनात अपराधी पणाची भावना निर्माण झाली होती . आणि म्हणूनच तो उदास होता . राजीव अजून तिला त्याच्याबद्दल विचारू लागला होता , तिला कळत नव्हते , कधी नव्हे तो आज राजीव असा का बोलत आहे .
राजीव - तू त्याला पूर्णपणे खरचं विसरलीस काय ?
ती - राजीव, त्याच्यानंतर माझ्या आयुष्यामध्ये अभय ला स्थान दिले होते मी , कुठेतरी मनातल्या एका कोपऱ्यात त्याची जागा होतीच तेव्हा . आणि म्हणूनच अभय हि मला मिळाला नाही . आणि आता तू हि तेच परत परत विचारू नकोस .
मी मनापासून त्याच्यावर प्रेम केले होते , हा काय गुन्हा होता का माझा . माझे मन त्याला कधीच विसरू शकत नाही, त्याला काय करू शकते मी . पण आता तुझ्याशी लग्न झालं माझं . मी तुझ्याशी कधी खोटे बोलणार नाही राजीव .
जरी त्याला विसरणे माझ्यासाठी अशक्य असले तरी त्याची ओढ नाही आता मला . मी तुझ्याशी प्रामाणिक राहणार राजीव .
तेवढ्यात राजीव बोलला , तुझ्यावर विश्वास आहे माझा . पण मलाच कुठेतरी तुमच्या दोघांच्या मध्ये आल्यासारखे वाटत आहे , तुला असं बंधनात नाही ठेवायचं आहे मला .
ती- नेमकं म्हणायचं काय तुला ?
राजीव - खूप भावुक होऊन तो बोलला "तूला जेव्हा हि त्याच्याकडे परत जावेसे वाटणार तेव्हा तू जाऊ शकतेस ".
त्याच्या या बोलण्याने ती स्वतःही खूप भावुक झाली होती , तुला त्याच्याबद्दल सांगून मी काही चुकी तर नाही केली ना राजीव ?तू मला समजू शकतोस ना ?आणि तिने अलगद आपलं डोकं राजीवच्या खांद्यावर टेकलं .
मला कधीच त्याच्याकडे परत जायची इच्छा होणार नाही राजीव . आता मी फक्त तुझ्यासाठीच आहे , आणि सदैव तुझीच राहणार .
तिच्या बोलण्याने राजीव ला आपल्या मनातील अपराधी भावना धूसर वाटू लागली . त्याने तिला आपल्या बाहुपाशात घेतले आणि तिच्या माथ्यावर आपले ओठ टेकले .
राजीवच्या ओठांचा स्पर्श होताच ती लाजली आणि अलगद त्याच्या मिठीत शिरली .

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Thank you