ते दिवस

Submitted by रिना वाढई on 10 October, 2019 - 03:45

कुणी देतील का ते दिवस परत , त्या राती आणि ती तळमळ
कुठे शोधू मी ते दिवस , ज्यामध्ये होतास तू
आठवण आली कि उगाचच मन , असा कासावीस का होतो
माझ्या डोळ्यातलं पाणी होतास तू , जणू हे ओरडून सांगतो .

क्षणभर वाटत , एक पाऊल टाकावे मागे
ज्या क्षणात होतास तू , श्वास माझ्या हृदयाचा
राहून गेलेली ती अबोल प्रीत , अबोल शब्द आणि अबोल मी ....
शोधू पाहते मी आज या क्षणी , हरवलेल्या त्या दिवसांत .

देशील का तू साथ , वाट माझी शोधायला
राहून गेलेले ते क्षण, तुझ्यासंगे जगायला
घेशील का हातात हात , नेशील का त्या जगात
जिथे कधी होते मी , तुझ्या हृदयातल्या एका कोपऱ्यात
हृदयातल्या एका कोपऱ्यात ....

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users