खडतर आयुष्य ! तीच-१०

Submitted by रिना वाढई on 9 October, 2019 - 08:23

पाच - सहा महिन्यांनी तिला एक स्थळ आलं लग्नासाठी . तिची मानसिक तयारी नसली तरी घरच्यांच्या विरोधात जाणे जमणार नव्हतेच तिला . छानशी साडी नेसून आली ती त्या मुलासमोर . अगदी समोरासमोर बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती . गुलाबी रंगाची साडी , हातात दोन कंगन ,कपाळावर छोटुसी टिकली .
अगदी सिम्पल आणि सोबर तयारी केलेली होती तिने . राजीव, तिला पाहताक्षणीच हिच्याशीच लग्न करायचं असं ठरवलं त्याने . राजीवने तिला काही प्रश्न विचारले त्यानंतर तिलाही प्रश्न विचारायची संधी देण्यात आली .
तिचा एकच प्रश्न होता . घरच्यांनी तिला आधी बजावून ठेवल असल तरी तिला ते राजीव ला विचारायचं होतच .
ती-मला लग्नानंतरही शिकायची आवड आहे . मला इंजिनीरिंग पूर्ण करायची आहे .
राजीव - ऑफकोर्स .. माझा विरोध नाही राहणार . तुला हवं तेवढं शिकू शकतेस तू .
अभय ची इच्छा होती कि तिने इंजिनीरिंग पूर्ण करायला पाहिजे .तिला अजून अभय ची आठवण झाली . या पाच -सहा महिन्यात अभयने एकदाही तिला फोन केला नव्हता . त्यादिवसापासून त्यांच्यात बोलणं झालंच नाही .
--------------------------------------------------------------
सुदैवाने अभय त्यादिवशी वाचला होता . पण या गोष्टीचा त्याच्या मनावर विपरीत परिणाम झाला होता . ज्या दिवशी आपण तिच्याशी साखरपुडा करणार होतो त्याच दिवशी हे असं संकट यावं !!!!
म्हणजे नक्कीच तिच्यामध्ये काहीतरी खोट असेल आणि म्हणूनच कि काय त्यानेसुद्धा तिला नाकारलं होत . तिने सांगितल्याप्रमाणे "तो" हि तिच्या प्रेमात होता हे कळत होत, पण त्याला समोर जायचं नव्हतं .
तिच्याशी लग्न करायचं नव्हतं त्याला . कदाचित त्याच्यासोबत हि असच काहीस घडलं तर नसेल ना .
अभय च्या मनात नको नको ते विचार यायला लागले होते आणि इकडे त्याच्या घरी हि बातमी कळल्यावर अभयच्या घरच्यांनी जाऊन तिच्या घरी सरळ नकार कळविला होता .
या सगळ्या गोष्टीनंतर तिच्यामध्ये अभय ला समजवायची हिम्मत उरली नव्हती . आधीही तिच्यासोबत त्याने relation
तोडलं होत तेव्हा तिने त्याला समजावण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता, पण सगळं व्यर्थ झालं होत .
म्हणून तिने आता नियतीवर सोडलं होत सगळं .
अभयने त्या अपघातानंतर दोन महिन्यात दुसऱ्या मुलीशी लग्न केलं होत . अभय आणि तिच्या वाटा वेगवेगळ्या झाल्या होत्या पण क्षणोक्षणी तिला अभयची आठवण येत होती .
खूप विचार करूनही ती स्वतःला सावरू शकत नव्हती .
या मधल्या काळामध्ये तिने त्याच्याशी साधा संपर्क हि केला नव्हता . पण राजीव च स्थळ येऊन गेल्यावर तिने त्याला एकदा फोन केला होता .
"तो , तिच्या टीनएज पासून आतापर्यंत मनातल्या एका कोपऱ्यात असलेला तो ". अभयमुळे ती त्याला काही काळासाठी विसरली जरी होती तरी त्याची जागा कधी अभय सुद्धा घेऊ शकला नव्हताच .
तिने फ़ोन केल्यावर त्याने आश्चर्यानेच फोन उचलला होता.
हाय , मी बोलते .
तो - तुला नाव सांगायची गरज नाही , मी ओळखू शकतो तुझा आवाज .
ती- माझा लग्न जमलं आहे . तुला सांगावस वाटलं म्हणून फोन केला .
तो - अभिनंदन !
ती-मला लग्नाच्या आधी एकदा भेटशील का ?
तो - हो , का नाही . सांग कधी भेटू आपण ? तू खुश आहेस ना . म्हणजे एवढ्या लवकर लग्न करत आहे म्हणून म्हटलं .
ती - हो मी खुश आहे . आणि नसली तरी आता काही उपयोग नाही . येत्या एका महिन्यात माझा लग्न आहे .
राजीव एका चांगल्या कंपनीत engineer आहे . घरच्यांना खूप आवडलं हे स्थळ .
म्हणून मी नाही म्हणायचं काही भाग च नव्हता .
एवढं बोलून तिने फोन ठेवला .
दोन-तीन दिवसावर तिचा लग्न आलं होत . त्याला सुट्या असल्यामुळे तो हि गावाकडेच होता .
दोघांचं भेटायचं ठरलं आणि ठिकाणही ठरलं . यावेळेस ती एकटी भेटायला जाणार नव्हती . तिची जिवलग मैत्रीण तिच्या सोबत होती . त्याला येऊन बराच वेळ झाला होता , त्या दोघी आल्या .
हि कोण ?
माझी मैत्रीण , याआधीही सांगितली आहे मी तुला हिच्याबद्दल पण लक्षात नसेल तुझ्या .
ती ओळख सांगताच पटकन त्याच्या ध्यानात आलं .
हो , आता ओळखलो मी . पण कधी भेट झाली नव्हती ना म्हणून थोडा वेळ लागला ओळखायला .
तिची मैत्रीण आणि तो समोरासमोर पहिल्यांदाच एकमेकांना भेटत होते . तिच्या मैत्रिणीला दुसरं काम असल्यामुळे ती तिथून लवकरच गेली . आता हे दोघेच कॅफे मध्ये होते . आजूबाजूचे होते पण दोघांनाही त्याच भान नव्हतंच .
का एवढ्या लवकर लग्न करत आहे तू . त्याने शांतता भंग करत म्हटलं .
ती -एवढ्या लवकर म्हणजे ?
तो-काही नाही . सहजच बोललो .
ती- लग्नाला येशील ना माझ्या ? ती बोलत होती . सगळं काही व्यवस्थित आहे असं दाखवत होती पण आतून ती खूप उदास होती .
हे त्याच्या डोळ्यातून सुटणार नव्हतंच .
तिला दिलासा देण्यासाठी तो "हो येईल ना लग्नाला तुझ्या "
असं म्हणत होता .
हि आपली शेवटची भेट असेल , यानंतर कधी आपण भेटू कि नाही माहित नाही .
पण मला खूप बरं वाटत आहे तुला भेटून . ती आपल्या मनातलं बोलून दाखवत होती .
तुला एक विचारायचं होत .
तो- विचार ना
ती- मी तुझ्यासाठी थांबायला पाहिजे होती का ?
तो- आता या सगळ्या गोष्टींचा काय उपयोग . लग्न जुळायच्या आधी विचारली असतीस तर कदाचित मी तुला "हो" थांब म्हटलं असत .
पण जी गोष्ट आपल्या हातात नाही त्या गोष्टीचा विचार करून काय उपयोग आता .
तो बोलण्याच्या , वागण्याच्या बाबतीत खूप प्रोफेशनल होता हे तिला माहित होत .
पण तिला तो "हो थांबायला पाहिजे" असं हा कधी बोलेल असं वाटलं नव्हतं .
त्याच बोलणं थांबवत ती त्याला विचारत होती , खरचं मी थांबली असती तर तू माझ्याशी लग्नाला होकार देणार होतास . मग असं होत तर आधीच का नाही आपलं relation टिकवलास .
तो- आधीचे ध्येय काही वेगळे होते माझे , आयुष्यात काहीतरी करायचं होत . त्यावेळेस मला असं वाटत होत कि माझं प्रेम माझ्या ध्येयाच्या आड येणार आणि तेच मला नको होत .
आड येणार असं कस म्हणू शकतोस रे तू , मी तुला चांगली नोकरी मिळावी यासाठी रोज प्रार्थना करत होती .
जाऊ दे आता या सगळ्या गोष्टी खरच निरर्थक आहेत . ती रडवलेल्या सुरात बोलत होती .
आता निघायला हवं मला , तू येणार ना नक्की लग्नाला माझ्या तिने अजून एकदा त्याला विचारलं .
हो येईल म्हणून त्याने तिला आश्वासन दिल . बसस्टॉप पर्यंत तिला तो त्याच्या बाईक ने सोडला . एकदा शेवटचं म्हणून दोघांनीही हातात हात मिळवलं .
तिचा हात त्याने घट्ट पकडला आणि तिलाही त्याने आपला हात सोडावा असे वाटले नाही .
हि भेट शेवटची असली तरी खूप काही देऊन गेली होती तिला . एक मात्र सल होती आपण याची रिप्लेसमेंट म्हणून अभय ला हो म्हटलं होत ती आपली चूक होती कि .......

To Be Continue

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पण अभयने तिला का सगळ्याचा दोष द्यावा हे कळाले नाही>>काही लोकांची प्रवूत्ती असते अशी ,आपल्या सोबत जरा काही वाईट घडलं कि त्याची खापर लगेच दुसऱ्यांच्या डोक्यावर फुटते .

या 'तो' ला काही नाव नाहीये?>> सध्यातरी या "तो " ला नाव द्यावं असं वाटलं नाही , जशी "ती " तिलापण काही नाव दिलेलं नाही आहे .
वाचकांना अडचण होत असेल तर पुढच्या भागात "तो " ला नाव देता येईल .
बाकी तुमच्या प्रतिक्रिया बद्दल धन्यवाद shraddha.

अडचण नाही काही. मला वाटलं नावं आलं असेल त्याचं आधी मी मिस केलं.
छान आहे कथा नियमित भाग टाकत राहा.