दसऱ्याचं सोनं

Submitted by Asu on 7 October, 2019 - 23:19

पाटील परिवारातर्फे सर्व आप्तेष्ट आणि रसिकांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !

*दसऱ्याचं सोनं*

दसरा सण आनंदाचा
सोनं द्या प्रेमाचं मोठं
देऊन पानं आपट्याची
नका देऊ सोनं खोटं

आलिंगन देऊन परस्परांना
सोनं म्हणून वृक्षबीज देऊ
झाडे जगवा झाडे वाचवा
वसा आज हा आपण घेऊ

हर्षाच्या या मंगल समयी
नका रडवू अबोल वृक्षा
रक्षण करती आपुले जीवन
आपण करूया त्यांची रक्षा

वृक्ष सदैव देतच असती
पाने-फुले किती संपदा
होऊ नकोस तू कृतघ्न
वृक्षाविन ओढवी आपदा

वृक्ष असती मित्र आपुले
आपटा, वड, पिंपळ, शमी
वृक्ष-मानव सहजीवनाने
करू साजरी विजयादशमी

- प्रा.अरूण सु.पाटील (असु)
© सर्व हक्क स्वाधीन
(दि.08.10.2019)
https://www.facebook.com/AsuChyaKavita

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults