जोकर - नैराश्याचं तांडवनृत्य! (चित्रपट परीक्षण)

Submitted by अज्ञातवासी on 7 October, 2019 - 12:40

हॉलिवूडची कुठलीही सुपरहिरो अथवा कॉमिक बुकवर आधारित मुव्ही म्हटली, की सर्वप्रथम माझ्या डोळ्यासमोर एक ठराविक साचा येतो. एक सुपरहिरो, एक सुपरव्हिलन आणि सुपरहिरोच सामान्य लोकांचं त्यापासून रक्षण करणे. सगळ्या मुविज मध्ये कितीही वैविध्य आणलं, तरी या मुविज याच मार्गाने जातात. म्हणून मीही दोन घटका डोकं बाजूला ठेवून करमणूक म्हणूनच आजपर्यंत या मुविज बघितल्या.
मात्र, जोकरची घोषणा झाल्यापासुनच मी थोडा उत्साही होतो आणि नर्वसदेखील. कारण कितीही झालं तरी 'द डार्क नाईट' मधला जोकर, त्याची फिलॉसॉफी, आणि त्याने बॅटमॅनला दिलेला वैचारिक शह, यांनी मनावर कुठंतरी एक खोल ठसा उमटवलाय.
...आणि जोकर हा ठसा आणखी गडद करतो...
ढोबलपणाने पहायला गेलं, तर जोकर एक सायकॉलॉजीकल थ्रिलर म्हणा, किंवा कॉमिक बुक मुवि म्हणा, सगळ्या कसोट्यांवर उतरतो. पण त्याचबरोबर एक विचारधारा, समाजातील विषमता, 'आहे रे' वर्गाचा सर्वसमावेशकतेचा आणि सर्वज्ञानाचा अहं आणि त्यावरून 'नाही रे' वर्गात येणारी निराशा आणि त्यानंतर येणारी वेडसर आक्रमकता या सर्व गोष्टींवर जोकर भाष्य करतो.
जोकर हा चित्रपट बघताना आनंद होत नाही, किंबहुना बऱ्याचदा मनावर एक अनामिक दडपण येतं. जोकर आपल्याला गुंतवून ठेवतो, जोकर आपल्या भावनांशी खेळतो, आणि शेवटी चित्रपटगृह सोडताना एक रितेपण येतं.
कथा - एका जोकरचीच ही कथा. मात्र या कथेला अनेक कंगोरे, अनेक पदर आहेत. भीती, असुरक्षितता, मानसिक आजार सगळं यात येतं आणि प्रत्येक वेळी ही कथा प्रेक्षकाला हलवून सोडते. ही कथा मानवी अंतर्मनाचा ठाव घेतेच पण त्याचबरोबर जागतिक विचारधारेवरही भाष्य करते.
पटकथा आणि संवाद - संवादापेक्षा देहबोलीवर जास्त भर हे चित्रपटाच वैशिष्ट्य. मात्र संवादही दर्जेदार आहेत, आणि पटकथा खिळवून ठेवण्यात यशस्वी होते.
अभिनय - मला तरी सध्या दोन ऑस्कर नामांकने दिसतायेत. बेस्ट ऍक्टर - वाअकिन फिनिक्स आणि बेस्ट सपोर्टींग ऍक्टर - रॉबर्ट दे निरो. हित लेजरच्या जोकरला अक्षरशः टफ फाईट देणारा जोकर फिनिक्सने साकारलाय. निराशा, भ्रम, त्याचं हळूहळू वेडेपणात होणारं रूपांतर आणि बंडखोरी या सर्व छटा फिनिक्स अक्षरशः जगलाय. हॅट्स ऑफ!!!
चित्रीकरण - अप्रतिम झालंय. एक मळभ असलेलं, निराश, बकाल गोथम पावलोपावली दिसतं. तसंच जोकरच ट्रान्सफॉर्मेशनही परफेकटली जाणवतं.
जोकर बघताना अजून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवत होती, ती म्हणजे यातल्या अनेक गोष्टी सध्याच्या जागतिक परिस्थितीशी रिलेट करतात. भारताशी तर खूप जास्त! भारतातही सत्ताधारी स्वतःला सर्वज्ञानी समजून निर्णय घेतायेत, जनतेच्या भल्यासाठी, मात्र त्यासाठी जनतेला विचारात घेतले जात नाही. परिणाम उलटेच होतायेत. लोकांमध्येही असुरीक्षततेची भावना आहे, मंदीमध्ये नोकऱ्या जातायेत, बकालपण वाढतंय, आणि या असुरक्षिततेबरोबर एक आक्रमकताही येतेय....
....फक्त भारत गोथमच्या मार्गाने जाऊ नये, हीच आशा!

रेटिंग : *****

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारताशी तुलना जरा जास्त होतय. बाकी परिक्षण मस्त. सिनेमा अभिनय दिग्दर्शन सगळं म हा न... I was really stunned by the negativity.
मला आवडलेली कॉमेंट
This 'Joker' wiped out all my memories about 'Mera Naam Joker' Happy

ह्म्म. ट्रेलर पाहून... ‘स्स.. नको पहायला हा‘ असं काहीसं वाटलं होतं तेच दिसतंय. बघु, तरीही वाटलं तर पाहीन.

समस्त BATMAN फॅन्सची क्षमा मागून...

दोन्ही चित्रपट अजून पाहीले नाहीत...पण बरीच तारीफ ऐकलीय..
सो पाहीन आरामात....

परीक्षण छान लिहलयं..

पाहिला चित्रपट. थेटरात बाकी काही पहाण्यासारखे पण नव्हते. पहिल्या सेकंदापासुनच गडद उदासी. शेवटपर्यंत तशीच. काय अभिनय केलाय त्या फिनिक्सने! डायरेक्टरचीही कमाल आहे. कॅमेरा वगैरे वेगळाच फिरवलाय काही दृश्यात. ऑस्कर जाणार वाटतंय आर्थरला. शेजारणीचे काय झाले कळले नाही.

खरच छान लिहलय

ऑस्कर जाणार वाटतंय आर्थरला. + ११११

जोकरच्या अनुषंगाने तुलनेसाठी मी द डार्क नाईट आणि सायलेन्स ऑफ द lambs पुन्हा बघितला. जोकर सायलेन्स ऑफ द lambsच्या जास्त जवळ जाणार वाटतो.
मला वाटलेली काही साम्यस्थळे.
१. दोन्ही चित्रपटांच्या सुरुवातीपासून एक विचित्र उदास फिलिंग येत राहते. आणि, ते वातावरण चित्रपट संपेपर्यंत कायम राहत.
२. दोघांचंही लीड कॅरेक्टर निगेटिव्ह शेड मध्ये आहे, पण तरीही त्या कॅरेक्टरचा प्रचंड प्रभाव पडतो.
३. हे कॅरेक्टर निगेटिव्ह जरी असले, तरीही कंवेशनल व्हिलन नाहीयेत. फक्त देहबोलीनेच दोघांनी आपापलं कॅटेक्टर अक्षरशः जिवंत केले आहेत.
४. दोन्ही चित्रपटात विनाकारण अनावश्यक वळणे अथवा धक्कातंत्र नाहीये, पण तरीही प्रेक्षक पावलोपावली हादरवण्याचं सामर्थ्य या चित्रपटात आहे.
५. दोन्ही चित्रपटात फक्त मेन प्लॉटवर फोकस आहे, अनावश्यक सब प्लॉट नाहीत.
६. दोन्ही चित्रपट सायकोलॉजिकल थ्रिलर म्हणता येतील. प्रेक्षकांच्या मनावर डीप इम्पॅक्ट करतात. आणि त्यासाठी अनावश्यक हिंसा, रक्तपात याचा उपयोग नाहीच.

अज्ञातवासी, +१११
मला देखिल सायलेन्स ऑफ द लॅंब्स आठवला जोकर पाहिल्यावर. तितकाच समर्थ अभिनय दोघांचाही.

>>समस्त BATMAN फॅन्सची क्षमा मागून.<<
बॅटमॅन बच्चा आहे या सिनेमात, कथानक त्याच्या वडिलांच्या (थॉमस वेन) काळात घडतं. बाय्दवे, जोकर इज इन्कंप्लीट विदाउट बॅटमॅन, तेंव्हा सिक्वेल येणार...

ओवरऑल उगाचंच हाइप केलेला सिनेमा आहे. वर सायलेंस ऑफ दि लँबची तुलना सायकोपॅथ पर्यंत ठिक आहे, पण सिनेमॅटिक वॅल्युमध्ये सायलेंस ऑफ दि लँबचा क्लास खुप वरचा आहे. कथानकात मांडलेला जोकर फायनांशली, सोशली, आणि मेंटली अन्स्टेबल आहे. आणि या परिस्थितीला बर्‍याअंशी कारणीभूत त्याचा पास्ट (चाइल्डहुड अब्युज) आहे. यात सध्याच्या काळातलं साधर्म्य किंवा साम्यस्थळं शोधणं हे अतिशय फारफेच्ड आहे.

माझा फुकटचा सल्ला - एचबिओवर येइस्तोवर थांबायची तयारी असेल तर $१७ आणि सव्वा दोन तास वाचवु शकाल...

काल वेळ न मिळाल्याने आता काही फरकांविषयी लिहितो.

१. सायलेन्स ऑफ द lambs बघताना सुरुवातीपासूनच एक सेन्स ऑफ अर्जन्सी जाणवतो. जोकरमद्धे मात्र तसं न होता चित्रपट शांतपणे आपल्या फ्लोनुसार जातो.
२. सायलेन्स ऑफ द lambs इज मोर लाईक अ मिशन. टू हंट बिल. मात्र जोकर एका माणसाचा प्रवास उलगडत जातो.
३. सायलेन्स ऑफ द lambs मध्ये फोस्टरची ट्रॉमामधून बाहेर येण्याची प्रोसेस होते, तर फिनिक्स नैराश्याच्या गर्तेत खेचला जातो, आणि मनोरुग्ण होतो.
४. जितका प्रभाव जोकर सव्वादोन तासात पाडतो, तितकाच हॅनिबल फक्त १६ मिनिटात पाडतो. Lol

जोकर हा DC Black या बॅनरखाली बनलाय, आणि फिनिक्सनेही सांगितलंय की ही stand alone मुवि असेल. पण DC Black विल फोकस ऑन मोर unconventional, आर रेटेड, निओ नोयर थ्रिलर्स.
उतावीळ झालोय मी अजून मुविज बघायला!

अपडेट -
जोकर ठरला आजपर्यंतचा सगळ्यात जास्त कमावणारा R रेटेड चित्रपट.
चायनात चालला असता, तर १ बिलियन ही कमावले असते.
ग्रेट माईलस्टोन!!