उद्या माझ्या आनंदाचा दिवस आहे!!

Submitted by सोमा वाटाणे on 7 October, 2019 - 12:01

उद्या दसरा सण आहे. दसरा सण मोठा नाही आनंदा तोटा. राव मी लैच वाट पाहिली दसऱ्याची. कारण.. कारण काय तर राव गटारी आमुश्याला खारं कालवण खाल्लं होतं. ते आता दसऱ्याला खायला मिळेल. म्हणून मला आनंद झाला आहे.
श्रावणात खायचं नाही, गणपती, गौरीच्या काळात खायचं नाही, नवरात्रात खायचं नाही. किती बंधनं टाकून ठेवली आमच्या आज्या पणज्यांनी. तसं तरुणपणात बाहेर खाल्लेलं वशाट,पण अपराधीपणाची भावना आतापतोर छळते आहे. जाऊ दे. जे झालं ते झालं. उद्या दसरा आहे. माझ्या आनंदाचा दिवस आहे.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults