स्टोरीटेल ऍप

Submitted by radhanisha on 5 October, 2019 - 10:34

इथला " हा खेळ बाहुल्यांचा हा" धागा वाचण्यासाठी उघडला , थोडासा वाचल्यावर आवडला नाही म्हणून बंद केला पण त्यानिमित्ताने झपाटलेल्या बाहुलीची लेखक हृषीकेश गुप्ते यांची "मोठी तिची सावली" ही सुरेख कथा आठवली ... वाचनालयातुन आणलेल्या धनंजयच्या जुन्या अंकात होती .. त्यावेळी चांगल्या कॅमेऱ्याचा फोन घेतलेला नव्हता नाहीतर फोटो काढून संग्रहात ठेवली असती .. कुठल्या कथासंग्रहातही नाही बहुधा .. पण इंटरनेटवर जरा शोधाशोध केल्यावर स्टोरीटेल ऍपवर प्रतीक्षा लोणकर यांच्या आवाजात ऑडिओबुक स्वरूपात असल्याचं दिसून आलं .. स्टोरीटेल ऍपमध्ये बरेच प्लॅन्स दिलेले आहेत , 299 रु महिना मध्ये एक महिना अनलिमिटेड पुस्तकं ऐका हा प्लॅन घेण्याचा विचार आहे .. सुशि वगैरे खूप चांगल्या लेखकांची खूप पुस्तकं दिसली तिथे ... नेट बँकिंगचा 0 अनुभव असल्याने सायबर कॅफे किंवा मोबाईलच्या दुकानात जाऊन तिथे रोख पैसे आणि इमेल ऍड्रेस देऊन मोबाईलमध्ये ऍप घेण्याचा किचकट उद्योग करावा लागेल बहुधा पण बहुतेक इट्स वर्थ इट असं वाटत आहे ...

तुमचं स्टोरीटेल वर अकाऊंट असेल आणि भयकथांंची आवड असेल तर ही कथा आवडते का पाहा ...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान माहिती!

बादवे तुमच्या हॅरी पॉटरच्या माहितीचा पुढचा भाग कधी येणार आहे?

धन्यवाद रीया , अज्ञातवासी ... रीया नंदिनी यांचं लेखन अजून वाचलेलं नाही , मायबोलीवर अकाउंट 4 - 5 वर्षांपूर्वी तयार करून विसरून गेले होते , हल्ली 1 - 2 महिन्यांपूर्वीच इकडे ऍक्टिव्ह झाले .. मधून मधून जुने धागे शोधून वाचत असते इथले .. इथे एवढा साहित्य खजिना आहे , प्रतिक्रिया वाचत बसलं तरी खूप ज्ञानात भर - मनोरंजन होतं .. नंदिनी यांचं लेखन शोधून वाचेन आता .

अज्ञातवासी , राग मानून घेऊ नका हं कथा आवडली नाही म्हटलं त्याचा .. नारायण धारपांच्या कथांची पारायणं केली आहेत अनेक वर्षं त्यामुळे नैसर्गिकरित्या भयकथांबाबतीत काही विशिष्ट अपेक्षा निर्माण झाल्या आहेत , वेगळ्या प्रकारच्या धाटणीच्या चटकन रुचत नाहीत ...

अज्ञातवासी , राग मानून घेऊ नका हं कथा आवडली नाही म्हटलं त्याचा .. नारायण धारपांच्या कथांची पारायणं केली आहेत अनेक वर्षं त्यामुळे नैसर्गिकरित्या भयकथांबाबतीत काही विशिष्ट अपेक्षा निर्माण झाल्या आहेत , वेगळ्या प्रकारच्या धाटणीच्या चटकन रुचत नाहीत ...
>>>>
बिलकुल नाही, खरं सांगायला गेलं तर जेन्यून निगेटिव्ह प्रतिसाद आला ना, मलाच छान वाटतं. इम्पृवमेन्ट करता येते. आणि नारायण धारपांच्या कथांची पारायणे केलेल्या वाचकाचा फीडबॅक मिळणं ही खरंच मोलाची गोष्ट आहे. त्यामुळे नो वरीज, उलट मी फायद्यात आहे. Lol

"मोठी तिची सावली" ही सुरेख कथा आठवली ... वाचनालयातुन आणलेल्या धनंजयच्या जुन्या अंकात होती .>>>>
यासाठी धन्यवाद! माझ्या लायब्ररीत धनंजयचे अलमोस्ट सगळे अंक आहेत, शोधून वाचावीच लागेल.
Happy

गुप्ते यांची ही

http://bhutbanglaa.blogspot.com/2015/05/blog-post.html?m=1

कथा कुणीतरी बऱ्याच काळापूर्वी इंटरनेटवर पोस्ट केली आहे .. बहुधा कॉपीराईट कायद्याचा भंग करून ... आय होप त्याची लिंक इथे देणं म्हणजे त्यात सामील झाल्यासारखं होत नाही .. ही त्यांच्या अंधारवारी या कथासंग्रहात आहे , आधी वाचली नसेल / कथासंग्रह माहीत नसेल आणि कथा आवडली तर तुमच्या संग्रहात भर घालू शकता ....गुप्ते छान लिहितात तरी आवडते लेखक म्हणण्याएवढ्या त्यांच्याही सगळ्या कथा मला आवडत नाहीत .. अंधारवारी मधलीच शेवटची एक तर अजिबात आवडली नव्हती ... पण 3 - 4 कथांमध्ये त्यांची शैली धारपांच्या शैलीच्या बरीच जवळ गेली आहे किंवा त्यांच्यापेक्षाही भय रस निर्माण करण्यात गुप्ते यशस्वी झाले आहेत .... एकदा पहाटे जाग आली असताना पुन्हा झोपेचा प्रयत्न करत असताना ही कथा आठवली आणि घाम फुटला होता ... धारपांच्या लुचाईने बऱ्याच रात्री खराब केल्या होत्या ... बाकी धारप किंवा अन्य कोणाच लेखकाच्या इतर कुठल्या कथांनी भीती अशी वाटलेली नाही .. पण तरी भयकथा आवडतात ..

भयकथा हा माझाही आवडता प्रांत, पण भयकथा लिहिण्याच्या बाबतीत मात्र लेखणी रुसलेलीच राहिली, हे खेदाने नमूद करावेसे वाटते.
बादवे, लुचाई ही कथा कुठल्या संग्रहात आहे??

हो रत्नाकर मतकरींचे 7 - 8 कथासंग्रह तरी वाचले असतील .. एकदा आमच्या शाळेत विज्ञान प्रदर्शन होतं , त्यात एका वर्गात पुस्तक प्रदर्शनही होतं .. मला वेगळ्या वर्गावर नेमलं होतं आणखी 2 - 3 जणांसोबत , येणाऱ्या प्रेक्षकांना मुलांनी केलेले प्रोजेक्ट दाखवायला ... पण मी पुस्तक प्रदर्शनाच्या वर्गातच ठाण मांडून बसले होते आणि शिक्षक आले तर रागावतील म्हणून भराभर पुस्तक वाचत होते .. घरून 1 हजार बजेट दिलं होतं पुस्तकं खरेदी करायला आणि त्यातून शिवाजी सावंतांची युगंधर आणि आणखी कुठलीतरी एक - दोन लहान पुस्तकं घेतली होती .... उरलेली तिथल्यातिथे फुकट वाचण्यासाठी आणि नेमलेल्या वर्गावर का नाहीस असा ओरडा टाळण्यासाठी खूप स्पीडने वाचली .. त्यावेळी रत्नाकर मतकरींचच पुस्तक वाचत होते अजून आठवतं इतक्या वर्षांनी ... लायब्ररीत वाचली होतीच पूर्वी , लायब्ररीत नसलेलं कुठलंतरी एक वाचत होते .. आमचे क्लासटीचर आले पण ओरडणार वाटत असताना हसले उलट आणि सांगितलं मला माहीत होतं तू इथेच येणार Happy तू वाच , एन्जॉय कर ... मग रिलॅक्स मध्ये वाचली .. आणि नंतर गोड बोलून एक हजार शिवाय आणखी तीन चारशे रुपयांची पुस्तकं घ्यायला सुद्धा घरी कनविन्स केलं Lol

लुचाई कादंबरी आहे .. बराच काळ आऊट ऑफ प्रिंट होती फक्त वाचनालयांंतूनच जुन्या प्रती उपलब्ध होत्या पण आता परत मार्केटमध्ये आली आहे , बहुधा साकेत प्रकाशनने आणली आहे ... धारपांची बरीच आऊट ऑफ स्टॉक पुस्तकं आता नव्याने मार्केटमध्ये आली आहेत ... अमेझॉन - फ्लिपकार्ट वर मिळेल बहुतेक .. बुकगंगा वरही असावी .

पण बऱ्याच जणांना आवडतं तुमचं लिखाण .. प्रयत्न तरी चांगले आहेत ... आमच्यासारख्या चार ओळी स्वतःच्या लिहायला न जमणाऱ्यांपेक्षा तरी चांगलं आहे ना ... Happy पुढे सुधारेल आणखी ...

नंतर गोड बोलून एक हजार शिवाय आणखी तीन चारशे रुपयांची पुस्तकं घ्यायला सुद्धा घरी कनविन्स केलं>>>
Lol मस्त आठवण.
आमच्या गावी प्रचंड मोठी लायब्ररी आहे. लहानपणी तिथे किती पुस्तके वाचली असतील गणती नाही. उन्हाळ्याच्या सुट्टीत तर सकाळी १० लाच घरून लायब्ररीत निघालो, की संध्याकाळी ५ ला क्रिकेटच्या मैदानावरच दिसत असे. पण धारप, मतकरी यांचं लेखन कधी वाचल्याचं आठवत नाही. महाभारताच्या पुस्तकांची मात्र पारायणे केलीत. लॉर्ड ऑफ द रिंग्ज, The Hobbit ही खूप वेळा वाचून झालं. भयकथा दुर्लक्षितच राहिल्यात.
मध्यंतरी काळी जोगतीन ही कादंबरी वाचली होती, आणि अजून एक कथासंग्रह वाचला होता.
बादवे, धारपांची एक गुरुजीवर कथा आहे, जो कुठल्यातरी पाण्याने मरतो, ती कोणती?

पण बऱ्याच जणांना आवडतं तुमचं लिखाण .. प्रयत्न तरी चांगले आहेत ... आमच्यासारख्या चार ओळी स्वतःच्या लिहायला न जमणाऱ्यांपेक्षा तरी चांगलं आहे ना ... Happy पुढे सुधारेल आणखी ...>>>>>
धन्यवाद!!! Lol

मी तरूणपणात समर्थ पुस्तक वाचलं होतं, बरेच दिवस तो अजस्र पंजा डोळ्यासमोर येत होता. लेखक आठवत नाहीत, पण धारप किंवा मतकरीच असावेत.

लुचाई हे अमे झॉनच्या किं डल अ‍ॅप वर उपलब्ध आहे. मी आताच घेणार आहे.

अ‍ॅप वापरता तर नेट ब्यांकींग शिकूनच घ्या. पर्सनल डीटेल सायबर केफे मधे शेअर करण या पेक्षा बरे.

स्टोरी टेल अ‍ॅप शोधून बघते.

धारपांची एक गुरुजीवर कथा आहे, जो कुठल्यातरी पाण्याने मरतो, ती कोणती? >>>>

मला वाटतं तुम्ही ज्या कथेबद्दल म्हणत आहात ती रत्नाकर मतकरींची विहीर ही कथा असावी .. ती त्यांच्या संभ्रमाच्या लाटा या कथासंग्रहात आहे ... धारपांची अशी कुठली कथा मला आठवत नाही पण असेलही आणि मला आठवत नाही असंही असू शकेल .. त्यांच्या 2 कथा आहेत ज्यात वेगवेगळ्या प्रकारच्या अमानवी शक्तीने निर्माण केलेल्या पाण्याने 2 लोकांचा मृत्यू होतो , पण मला त्यांची नावं आठवत नाहीत ..

बादवे, धारपांची एक गुरुजीवर कथा आहे, जो कुठल्यातरी पाण्याने मरतो, ती कोणती?>>>
आताच लुचाई वाचली, आणि बापरे, काय प्रचंड भयप्रद वातावरणनिर्मिती आहे. पण फक्त शेवट गुंडाळल्यासारखा वाटला.
आणि केरकर गुरुजी गोमुखाच्या पाण्याखाली स्वतः दहन करून घेतात, हेच मला म्हणायचं होतं. ते लुचाईमध्येच सापडलं.
बादवे आता समग्र धारप कलेक्शन डाउनलोड केलंय, एक एक वाचून बघतो.

बादवे आता समग्र धारप कलेक्शन डाउनलोड केलंय >>> कुठुन? मी स्टोरीटेलच्या साइटवर पाहिलं पण मला धारपांची पुस्तकं नाही सापडली.

हो किंडल वरूनच! Happy
@radhanisha - माणकाचे डोळे वाचावस वाटतंय नेक्स्ट बुक. कसं आहे?

मला त्यांची सगळीच छान वाटतात त्यामुळे मी सांगणं बरोबर नाही कदाचित ... बुकगंगा वर 7 - 8 पानं वाचून तुम्हीच ठरवा ☺️ https://www.bookganga.com/Preview/BookPreview.aspx?BookId=50672200326535...

खरं सांगायला गेलं तर कुठल्याही पुस्तकाची पहिली चार पाच पाने वाचून मलातरी जजमेंट येत नाही Happy
पण आता वाचूनच काढतो.

लुचाईचं नवं कव्हर पेज काय भंगार आहे Sad .. त्यांच्या आधीच्या पुस्तकांची अशीच भडक - दर्जाहीन असायची त्यामुळे किती दर्जेदार लेखनाचा आग्रह असणाऱ्या उच्च अभिरुची वगैरे बाळगणाऱ्या वाचकांनी दुकानात / वाचनालयात हात मागे घेतला असेल उघडण्यापूर्वी देव जाणे .... तरी मुळातच लेखनाचा दर्जा भक्कम ग्रेट होता म्हणून इतके वाचक मिळाले ... मतकरींनी सुरुवातीपासून आपल्या पुस्तकांची कव्हर पेज ऍस्थेटिक असावीत हे जातीने बघितलं ... धारपांना ते का महत्वाचं वाटलं नाही देवच जाणे ..

तरी साकेत प्रकाशन नव्याने पब्लिश करत असलेल्या पुस्तकांची कव्हर्स खूप डिसेंट आहेत ... लुचाई आणि समर्थ सिरीज मधली 1 - 2 पुस्तकं पाहून मात्र आर्टीस्टची कुणीतरी चपलेने पूजा केली तर बरं होईल असं वाटलं ... या घाणेरड्या कव्हर पेक्षा तर जुनं कव्हर सुद्धा चांगलं होतं ...

IMG_20191013_002510.jpg

हे असलं कव्हर बघून तर कुणीही सी ग्रेड पुस्तक म्हणून सोडून देईल. मधलं तर वाचायलच नको.
Sad
पण प्रकाशक भांग पिऊन ही असली कव्हर अप्रुव करतात का??

हो मलाही तेच वाटलं.लुचाई च्या आताच्या कव्हर वरचा निळा हिरवा चेहरा भीतीदायक न वाटता विनोदी वाटतो.
स्वाहा, अनोळखी दिशा , समर्थांची ओळख, समर्थांचा विजय यांची कव्हर्स त्या मानाने अभिरुची पूर्ण होती.

स्वाहा, अनोळखी दिशा , समर्थांचा विजय चांगली आहेत . समर्थांची ओळख आणि समर्थांना आव्हान यांची अजून खूप चांगली करता आली असती ... लिंबू मिरची - काळी बाहुली वगैरे बी ग्रेड वाटतात ... तरी हल्ली घेणारे लेखक माहीत आहे म्हणून घेणारेच जास्त आहेत त्यामुळे फार नुकसान होणार नाही ... या वाचकांच्या "परत छापा" या मागणीमुळेच जुनी पुस्तकं पुन्हा बाजारपेठेत येत आहेत . . ते वाचक कव्हर कडे कानाडोळा करून घेतात धारपांची पुस्तकं म्हणून ... पण पुस्तकं संग्रहासाठी विकत घेणारा नवीन अपरिचित वाचक हे कव्हर बघून लांबच राहील बहुधा ..

Pages