इथे लिहिणाऱ्यांनी मायबोलीशीच एकनिष्ठ असावे की असू नये?

Submitted by सोमा वाटाणे on 4 October, 2019 - 21:12

अजून काही नवीन सुचलं नाही. तर म्हटलं एखादं पिल्लू सोडून देऊ या. बरेच ज्येष्ठ आणि माबोवर मान्यता पावलेले लेखकू आणि लेखिकू आपलं लिखाण फक्त इथेच प्रकाशित करताना मला आढळले आहेत. काही प्रसिध्दीला हपापलेले ( यात मी पण आलो, पण मी स्वत:ला लेखक समजत नाही, लिंबुटिंबू समजतो) इथलं लिखाण अन्यत्र सुध्दा प्रकाशित करत असतात.
मला वाटतं की आपण माबोप्रति एकनिष्ठ ( लॉयल की काय) असलं पाहिजे. तुम्हाला काय वाटतं लेखक/ लेखिका/वाचक मित्रांनो?
धागा आवडला नसल्यास माझा आगाऊपणा माफ करून लेखाला इग्नोर मारण्यास हरकत नाही.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

दोन्ही निर्णय पटण्यायोग्य आहेत
लिखाण एकाच ठिकाणी का:
बहुतांश ठिकाणी कॉमन मेम्बर आहेत.
अनेक ठिकाणी पब्लिश करण्यातला व्याप
अनेक ठिकाणी आपले सदस्य नाव वेगवेगळे असेल तर लोकांना 'तो तिकडे माझाच लेख आहे, ही चोरी नाही' समजवत बसण्याचा व्याप.

लिखाण एकापेक्षा जास्त ठिकाणी का:
वेगळे आऊटलूक मिळणे
काही उपयुक्त विषयावर असल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचणे
'अमुक एक ठिकाणी मी चांगले लिहिले तरी मुद्दाम मला टार्गेट करतात' असा ग्रह असल्यास दुसऱ्या ठिकाणी लिहून आपल्या लिखाणाबद्दल खऱ्या आणि वेगवेगळ्या प्रतिक्रिया घेऊन पडताळता येणे.

सध्या पेपरात विशेषतः परदेशी बातम्या मी 2 अगदी वेगळ्या पेपरमध्ये जवळ जवळ समान मजकुराच्या वाचते.बातम्यांत पण सध्या 'रिटन इन हाऊस' आणि 'आऊटसोर्सड/बॉट रेडिमेड' असे प्रकार असावेत.लोकसत्ता आणि सामना आणि सकाळ तिन्ही वरचे थोडे खालचे पान वाचल्यास मी काय म्हणते लक्षात येईल.
(मी एकदम सिरीयसली लिहिलंय.लेख फक्त मजेत लिहिला असल्यास माफी)

हे प्रसिद्धी युग आहे. किती जास्त प्रसिद्धी मिळवता येईल ते लोक बघतात. लोक काय काय प्रकार करतात प्रसिद्धी मिळवायला.
कुणी सिलिंग फॅन हा फाशीचा फ़ंदा आहे, त्यावर बंदी आणा म्हणुन टाहो फोडतात, कुणी चंद्रयानाची कुंडली मांडुन विक्रमशी सम्पर्क का तुटला आणि तो केव्हा होईल याचे व्हिडीओ बनवून पसरवतात.

तेव्हा स्वतःचेच लिखाण चार ठिकाणी प्रसिद्ध केलं तर काय हरकत आहे?

धन्यवाद मी अनू जी आणि मानव जी. अनु जी सहमत. मला माबोवर व मिपावर काही लेखांवर वेगळे अनुभव आले. इथे ज्याच्यावर टिका झाली, त्याला तिकडे चांगले म्हटलं होतं आणि एका लेखावर इकडे चांगले प्रतिसाद मिळाले तर तिकडे काहींनी लेव्हल सोडून प्रतिसाद दिले होते.

बरेचदा स्वतःचे लिखाण भारीच वाटत असावे ब्वॉ. अनलेस- अतिशय बाराखडी गिरवलेलं पहीलं पहीलं लिखाण. मग आपलं थोडं कुरुप मूल (जे आपल्या लक्षात येत नाही व आपल्याला गोंडसच वाटतं) ते १० ठिकाणी मिरवलं जातं.
प्रतिसादांना डोपमाइन व्हॅल्यु असतेच की. ताकाला जाउन भांडं कशाला लपवा? (The brain includes several distinct dopamine pathways, one of which plays a major role in the motivational component of reward-motivated behavior.)
____________
पण ..... हेही खरं आहे की माबोववर ललित लेख व कवितादेखील, ही आवडीने वाचले जातात.सगळीकडे तसं वॉर्म वेलकम होत नाही.

एकनिष्ठ??? म्हणजे नक्की काय म्हणायचे आहे?
फेबूवर टाकायचे नाही, ब्लॉग वर टाकायचे नाही, मिपावर टाकायचे नाही फक्त माबोवर टाकायचे लिखाण? याने एकनिष्ठता सिद्ध होते???
फेबू वर असाल तर ट्विटर वर लिहून तुम्ही फेबूशी गद्दारी केलीत, असे म्हणण्यासारखे आहे आहे हे.
आणि मुळात सोशल साईटशी एकनिष्ठ राहण्याची गरज असते का? ती केवळ प्रसारमाध्यमे असतात.
राहायचेच असेल तर आपल्या साहित्याशी, आपल्या मताशी एकनिष्ठ राहावे.

एकनिष्ठ पेक्षा नॉन रिपीटेशन या दृष्टीने बघता येईल.
अर्थात मग याने त्याच ठिकाणी का पब्लिश करायचे, अमक्या ठिकाणावर मी कधीच पब्लिश नाही करायचे का,आता इथे पब्लिश करणारे काय दर्जाचे असे जटिल प्रश्न प्रत्येकाच्या दृष्टिकोनातून येतील.
त्यापेक्षा सध्या चालू आहे हे चांगलं आहे.

तुमच्या या लेखाचा जबरा इफेक्ट होऊन एकनिष्ठा वाढवायला शब्देविण संवादु चे 6 लेख एकाच संकेतस्थळावर आले आहेत. > Lol

फेसबुक, ट्विटर वर लिखाण करणं म्हणजे दर्यात खसखस टाकल्यासारखं आहे इतकी त्या माध्यमांची व्यापकता मोठी आहे. मिपा वगैरे माबोची रिडक्शन केलेली झेरॉक्स प्रत म्हणता येईल. मायबोली मात्र या सर्वांहून वेगळी आहे. इथं आपलेपणा आहे. तसं व्हाटस् अप, फेबू, ट्विटरवर वाटत नाही.

मला तरी "एकनिष्ठ" राहण्याची काही गरज वाटत नाही... आणि माबोच्या मालकांनी आणि वाचकांनीही अशी अपेक्षा कधीच व्यक्त केलेली नाहीये...

पण ओळखणार कसे की तोच सेम ऑडियंस आहे दोन्हीकडे? अनेकदा आयडीही सेम मिळत नाहीत. कारण माझ्या एका ओळखीच्या व्यक्तीने प्रतिलिपीचा उल्लेख अनेकदा केला. पण त्याला माबो माहिती नव्हती, मिपाही माहिती नव्हते.

चांगले लक्षवेधी लेखन पेप्रात/पुस्तकात/ट्विटरवर केले जाते. तिकडे कुठूनकुठून नोंद घेतली जाते. बाकी हा सारा टैमपास आहे. बाकी एकनिष्ठ म्हणजे काय? प्रसिद्ध लेखकसुद्धा प्रकाशक बदलतात.

मलासुद्धा मायबोलीचा शोध अपघाताने गुगल बाबामुळं लागला, तिकडून मिपा माहिती झाले. फेसबुक वर प्रतिलिपीची जाहिरात येत असते. तेव्हा ते माहित पडले.

आव, परसिद्धीला हापापलेले लोग ना, काय बी करु शकतात राव

आता ह्या धाग्याच घ्या की... ज्येन्ना तुमी अमर ९९९, स्वप्निल ७७७ म्ह्णुन आवडीत नव्ता, त्ये बी ईकड याव लागले , तुमचेशी गप्पा मारु र्हायले ना

आता मी काय म्हणतो, जवा त्येन्ना काई पराब्लेम न्हाय त, तुमी तुमच्या त्या कथा पुर्या करुन सोडा की राव, म्हण्जी कस तुमची बी तुमच्या लिखाणाशी एकनीष्ठता सिद होइईल हाकानाका

अरे बापरे, आव तुमी सोदुन दिले म्हणता , मंग मजा कशी यील , आयडी संपले की काय व

मला त ब्बा आवडायच तुमी, मस्त मानुस एकदम

Pages