मायबोलीवर वर्चस्व कुणाचं आहे?

Submitted by स्वप्नील ७७७ on 1 October, 2019 - 03:15

नुकताच अन्न, स्त्रीवाद आणि मी हा धागा वाचून त्यावर बरेच प्रतिसाद दिले. तिकडे पुरुष प्रतिसाकांना पालथा घडा क्लब मेंबर असे संबोधले गेले.
यावरून मला प्रश्न पडला आहे. मायबोलीवर स्त्रीया आणि पुरुष लेखक, प्रतिसाद देणारे वाचक यांपैकी चांगले प्रतिसाद देणारे, वाईट प्रतिसाद देणारे आणि फक्त ट्रोल करणारे वरचढ कोण आहे.
म्हणजेच मायबोलीवर पुरुष किंवा स्त्रिया कोणाचं वर्चस्व आहे.
खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा व्हावी, धागा भलतीकडेच भरकटवू नये ही नम्र विनंती. धन्यवाद.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

विचाराच्या उंची पेक्षा जे झुंडी नी कमेंट देतात .
त्यांचे वर्चस्व आहे .
त्यात स्त्रिया सुद्धा आहेत त्यांना सुद्धा विरोधी मत सहन होत नाही .त्यात
पुरुष पण आहेत .
आणि ह्या सर्वांपेक्षा trol
हा एक वेगळाच प्रकार आहे.

मतं कुणी लादत नाहीये. पण महिलांंचे लेख म्हणजे पुरुषांची लुडबूड नकोच. टिवी मालिका असो वा इतर बाद.

त्याही आधी Troll चं डेफिनेशन समजवायला लागेल. ज्यांना आपल्या कंपूकडून आरती करून घ्यायची सवय आहे त्यांची निगेटिव्ह फीडबॅक दिला की ट्रोल ट्रोल म्हणून ओरडायला सुरुवात होते. म्हणजे आवडो न आवडो पण प्रतिसाद मात्र कौतुकाचाच असायला हवा. त्यामुळे वर्चस्व ट्रोलर्स नाही तर कंपूबाज लोकांचं आहे.

मला वाटतं, जे उठसुठ माबोवर धागे काहीही काढतात ना.. त्यांचं वर्चस्व खरं तर असायला हवं, पण मुळात तसं का होतं नाही,यावर चर्चा करण्यासाठी एक धागा काढायला हवा

वा वा खूप छान पोस्ट .
अशी कमेंट दिली की काही जण खूप
खुश होतात.
त्यांच्या पोस्ट मधली चूक दाखवली की trol, आहे .संकुचित विचार आहेत अशी उत्तर चालू

काही लोकांना दुसऱ्यांनी चांगलं काय लिहिलेलं बघवत नाही, लगेच 130k view आणि 500 लाईक्स सारखी उदाहरणं दिली जातात.

त्याही आधी Troll चं डेफिनेशन समजवायला लागेल. ज्यांना आपल्या कंपूकडून आरती करून घ्यायची सवय आहे त्यांची निगेटिव्ह फीडबॅक दिला की ट्रोल ट्रोल म्हणून ओरडायला सुरुवात होते. म्हणजे आवडो न आवडो पण प्रतिसाद मात्र कौतुकाचाच असायला हवा. त्यामुळे वर्चस्व ट्रोलर्स नाही तर कंपूबाज लोकांचं आहे.

नवीन Submitted by मीरा.. on 1 October, 2019 - 13:39 >>> +११११

या लेखकाचा याआधीचा धागा व त्यावरील त्याचे प्रतिसाद वाचून ही शैली/कोणी काहीही म्हटले तरी आपल्या म्हणण्याला चिकटून राहणे हे वागणे बघून सतत हे सगळे आधी माबोवर कुठलीतरी आयडी करताना बघितले होते असे वाटत होते पण नेमके लक्षात येत नव्हते (वयाचा दोष, अजून काय). हा धागा वाचताना अचानक मोठी ट्यूब पेटून सर्वत्र प्रकाश पसरल्यासारखे झाले. असो. अवांतर खूप झाले.

मायबोलीवर कंपू आहेत, एकमेकांवर वर्चस्व गाजवायचा प्रयत्न करतात. पण खरे वर्चस्व मात्र फक्त अडमीनचे आहे.

अॅडमीन साहेब पुरुष आहेत म्हणजे पुरुषांचे वर्चस्व आहे काय? साधना जी या पसाऱ्याचं करायचं काय या धाग्यावर चांगले सल्ले मला आवडले होते. आणि मी चांगले सल्ले देणारांचे आभार मानले होते व सल्ला अंगिकार करणार आहे.

अडमीन ही ताकद आहे, ती स्त्री पुरुष कोणीही असू शकते. इथले अडमीन पुरुष आहेत म्हणून ती पुरुष होत नाही. मनात आणले तर अडमीन एका फटक्यात धाग्यांसकट आयडी उडवू शकतात म्हणजे आपले वर्चस्व आहे मानणारे आयडी जमीनदोस्त. Happy

मायबोलीवरती वरचष्मा कुणाचा का असेना, वाचकांच्या मनावरती येथिल उत्तमोत्तम कवि आणि लेखकांचे वर्चस्व आहे आणि त्याकरता आपण सगळे वाचक या नात्याने गप्पा मारतो.

मला तर माबो किंवा फॉर दॅट मॅटर कोणतेही संस्थळ/आभासी प्लॅटफॉर्म हा 'Great equalizer' वाटतो. ऑफिसात आपण हुद्द्यावरुन कमी-अधिक ठरतो. समाजाता अजुनही लोक होय अमेरीकेतही बरेच मराठी लोकं (अमअमराठीही)पहील्या भेटीत, आधी लग्नाआधीचं आडनाव विचारतात. का ते कळत नाही का आपल्याला? पण निर्लज्जपणे विचारतात. ऑफिसात अजुनही "आप सबकुछ खाते हो? पोर्क/बीफ?" असं विचारतात त्यांच्या डोळ्यातून तुच्छता कळून येते. तर वास्तव जगात हे असे असते.

याउलट, आभासी जगच एक आहे जिथे सर्वजण समान आहेत. हां ट्रोलिंग वगैरे उणीदुणी आहेत पण समतेचा, अभिव्यक्त होण्याचा एक मोठ्ठा फायदाही आहे.

नाही वाटत मला तसं. निदान माबोवरील महिला वर्ग इतर महिलांच्या प्रतिसादाला बरोबर, अगदी बरोबर, सहमत, छान, आवडलं असे प्रतिसाद देतात. पुरुषांवर अन्यायच होतो. फक्त दिनेश दा, सारख्या जुन्या लोकांना छान छान म्हटले जाते.
तात्पर्य - स्त्रियांचं एकमत लवकर होते.

स्त्रिया जरी वास्तवात भेटल्या तरी त्या आधी एकमेकींना कॉम्प्लिमेन्ट देतात. डुल मस्त आहेत, छान दिसते आहेस, ड्रेस काय सुंदर आहे वगैरे. तेच इथे रिफ्लेक्ट होतं. अजुन एक मी आवर्जुन नवोदितांना प्रोत्साहन देते कारण इथे पोषक वातावरण आहे. अजुन एक उत्तम लेखकांची फळी येवो या दृष्टीने खारीचा वाटा. माझ्यासारखे बरेच असतील.

देवकी Sad मी नेहमी लोकं म्हणते Sad
मे बी दॅट्स राँग???
_________________________
मला वाटतं भू, भुवः आणि स्वः हे ३ लोक आहेत. ........................ इथे लोक चे अनेकवचन लोक
अनेक लोकांची गर्दी असते. खूप माणसे असतात ............. इथे लोकं
आय मे बी राँग!!

काल एक इंग्रजी लेख वाचत होते ज्यात लेखकाचे म्हणणे होते - देवाच्या दरबारात सर्वजण समान असतात. पण आपण मात्र व्यर्थ एकमेकांची खूषमस्करी करण्याच्या नादात, ईश्वरापासून फारकत घेत जातो, आत्मा गहाण टाकत जातो. 'स्तुती करावी ईश्वराची, व्यर्थ करु नये नराची' ..... तशा प्रकारचे विवेचन दिलेले होते.
.
आपल्यापैकी प्रत्येकजणाने हा गुन्हा केलेला असतो. स्वतःच्या फायद्याकरता खोटी स्तुती करणे, लेखनाचा दर्जा उत्तम उत्तम असला तरी कोणी (तथाकथित) मातबार मंडळी खोट्या लाथाळ्या करत असतील तर हो ला हो करणे.....
.
असो. तर असे प्रकार निंद्यच.
------- या धाग्याला धरुन आहे ना हे विवेचन? माझे विचार प्रकट करते आहे (लाऊड थिंकिंग)

स्वतःच्या फायद्याकरता खोटी स्तुती करणे, लेखनाचा दर्जा उत्तम उत्तम असला तरी कोणी (तथाकथित) मातबार मंडळी खोट्या लाथाळ्या करत असतील तर हो ला हो करणे.....
.
असो. तर असे प्रकार निंद्यच.
>>> हे नेहमीच दिसतं. जर कुणी भारी,टॉप लिहित असलं ( मी नाही हं) तर काहींना असुरक्षित वाटायला लागतं. मग उखाळ्या पाखाळ्या काढून धागे भरकटवले जातात.

ह्या समस्त वांझोट्या चर्चा आहेत, अस माझं पक्के मत आहे. इथं कळफलक बडवून कायएक होत नाही. ट्विटर फेसबुकवर फॉलोविंग असणारे बदल घडवू शकत नाहीत, तिथं लाखाच्या आसपास सदस्य संख्या असणारे अन त्यातही 30 40 लोकं चर्चा काढून काय प्रभाव पाडणार?

तेव्हा हे रिकामटेकड्या लोकांचे काम ए!! जो जास्त रिकामा, त्याचा जास्त प्रभाव Wink

स्क्युज मी..

मी अधे मधेच येतो, पण मला स्त्री-पुरुष असा भेद दिसला नाही.
किंवा नोंदवावे असाही भेद दिसला नाही.

मला ते बिफिकरपणे लिहिलेल गझला असतात
त्याचा खुप त्रास होतो. पण मी इग्नोर करतो.

कशा कशाचा त्रास करुन घ्यायचा माणसांनी तरी.

-दिलीप बिरुटे

पुरुषांचे की स्त्रियांचे?
ब्राह्नणांचे की बहुनजनांचे?
मोदी समर्थकांचे की विरोधकांचे?
विचारवंतांचे की विचारजंतांचे?
लेखकांचे की प्रतिसादकांचे?
ॲडमिनचे की डुआयडींचे?

वेगवेगळ्या कॅटेगरीत वेगवेगळी ऊत्तरे निघतील
एकच व्यक्ती वेगवेगळ्या कॅटेगरीत सापडतील

पण ज्याने आपल्या मनावर मोहावर क्रोधावर वर्चस्व प्रस्थापित केले आहे तोच कुठेही केव्हाही अनंत काळापर्यंत कुणाच्याही वर्चस्वाची पर्वा तेरवा न करता टिकून राहू शकतो.

ऋन्मेऽऽष,

ते आपलं शाकाहारींच की मांसाहारींच राहिलंच की! :ड

पुरुषांचे की स्त्रियांचे?
ब्राह्नणांचे की बहुनजनांचे?
मोदी समर्थकांचे की विरोधकांचे?
विचारवंतांचे की विचारजंतांचे?
लेखकांचे की प्रतिसादकांचे?
ॲडमिनचे की डुआयडींचे?
माझी उत्तरं
१) स्रियांचे
२) ब्राह्मणांचे
३) दोन्ही समसमान
४) विचारजंतांचे
५) प्रतिसादकांचे
६) डुआयडींचे
कृपया हलके घेता आले तर घ्या.

कृपया हलके घेता आले तर घ्या.
>>>
हे कोणासाठी लिहिलेय..
उत्तरात ज्यांचे नाव घेतलेय त्यांच्यासाठी की न घेतलेल्यांसाठी?

Pages