खडतर आयुष्य ! तीच-७

Submitted by रिना वाढई on 30 September, 2019 - 07:53

ती सुट्ट्यांमध्ये गावी आली होती. तिच्या एका मैत्रिणीचा लग्न असल्यामुळे तिला लग्नाला जावेच लागणार होते , पण एक प्रश्न समोर होताच !
तो म्हणजे तिची मैत्रीण हि "त्याची" बहीण होती . बहिणीच्या लग्नात तो तर राहणारच होता . पण हे अभय ला पटत नव्हते , त्याला तिचे लग्नाला जाणे आवडत नव्हते .कारण तिथे "तो " राहणार आणि मग पुन्हा तू त्याच्या प्रेमात पडशील तर ?
हि भीती सारखीच अभय च्या मनात असायची .ती अभय ला समजवायची कि असे प्रसंग येणारच आहे आयुष्यात , तो मला एखाद्या कार्यक्रमात भेटेल याला टाळता नाही येणार आणि तो तिथे राहणार म्हणून मी सगळ्या कार्यक्रमाला जाणे सोडू शकत नाही.
शेवटी ती अभय च न ऐकता गेलीच लग्नाला . त्याची आणि तिची नजरानजर झाली, पण तो हि येऊन बोलत नव्हता आणि ती हि समोर जाऊन बोलत नव्हती त्याच्याशी . ती थोड्या वेळ साठी तिथून बाहेर गेली , तेव्हा मात्र त्याची नजर तिला शोधत होती.
एक दोन घंट्यानंतर ती आली आणि तिच्या मैत्रिणीला लग्नाच्या शुभेच्छा देऊन परत जाणार तेवढ्यात तो आला तिच्याजवळ .
त्याला आपल्यासमोर बघून तिला ख़ुशी झाली होती पण कुठेतरी त्याने जे केले होते तिच्यासोबत हि गोष्ट तिला सलत होती , ती त्याला जास्त भाव नव्हतीच देत.तो स्वतःहून बोलायला आला म्हटल्यावर ती थांबली .
कुठे गेली होती एवढा वेळ, दिसत नव्हती तू ?
त्याची प्रश्नार्थक नजर तिला विचारत होती . जवळच एका मैत्रिणीला भेटायला गेली होती . तिने त्याला उत्तर दिल .
एवढ्या गर्दीमध्ये हा मला च बघत होता कि काय तिने मनातच पुटपुटल आणि येते म्हणून ती गेली . मनात एक सुखी समाधान होता कि त्याने आपल्याशी येऊन निदान बोललं तरी .
पण जाऊ दे ना आता काय उपयोग त्याच्या बोलण्याचा किंवा न बोलण्याचा . ती घरी आली आणि अभय ला घडलेला प्रकार सांगितली .
तिला अभय पासून कुठलीही गोष्ट लपवायची नव्हती . सुरुवातीला अभय सुद्धा तिला समजून घेत होता . त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी तर, आपण त्याला साध विश नाही करू शकत हे दुखणे सुद्धा ती अभय शी शेअर करायची आणि जाऊ दे ना जास्त विचार नको करुस म्हणून अभय हि तिला समजावत होता .

एक-दोनदा अभय आणि तिने सोबतच प्रवास केला होता . गाव एकच असल्यामुळे सोबत जाणे - येणे होत होते . एकदा तर त्यांना जास्तच उशीर झाला निघायला , अभय बरोबर पोहोचला होता तिला घ्यायला पण तीच कॉलेज च काम बाकी असल्यामुळे तिला च उशीर झाला होता बस स्टॉप वर पोहोचायला .
त्यांच्या गावी डायरेक्ट बस जात नसल्याने मधातच उतरून ऑटो पकडावा लागत होता . यायला आधीच उशीर झाला आणि ऑटो हि मिळत नव्हता , तेव्हा एक गाडी आली पण त्यात फक्त एकाच सीट ची जागा असल्याने अभय ने तिला जायला सांगितले . ती जाणार होती पण त्याला येण्यासाठी साधन नसल्याने तिला अभय ची काळजी होत होती . बराच अंधार झाल्याने ती गेली .
गाडीमधून उतरल्याबरोबर तिच्या घरचे आणि अभय च्या घरचे एकत्र जमले होते . त्यांच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती . त्यांचे असे चेहरे बघून ती तर घाबरूनच गेली कि सगळ्यांना अभय आणि माझ्याबद्दल कळलं कि काय ?
तेवढ्यात अभय च्या आईने तिला विचारलं , "तुला अभय दिसला का ? तो हि आजच येणार होता आणि मघाशीच निघाला म्हणून त्याने सांगितलं होत . " आता त्याचा फोन लागतच नाही आहे .
तिने सुटकेचा एक निश्वास सोडला आणि हो तो दिसला मला तिथे पण यायला काही गाडी नव्हती मिळत त्याला . तिचे उत्तर ऐकून अभय च्या आईला बरं वाटलं .
इतक्यातच अभय आला म्हणून त्याची बहीण सांगू लागली आणि त्याची आई सुद्धा गेली .
तरी तिच्या घरच्यांच्या चेहऱ्यावरचे भाव मात्र बदलले नव्हते .
बापरे ... आता यांना कळलं तर नसेल ना आम्ही सोबतच आलोय ते ?
ती स्वतःच्या मनालाच विचारत होती .
तेवढ्यात तिच्या बाबाने मौनव्रत तोडत , तुझा फोन कुठे आहे ?
किती वेळचे तुला फोन करून राहिलो आम्ही पण तुझा फोन मात्र बंद . आणि यायला इतका उशीर का?
बाबा , मला निघायलाच उशीर झाला होता , ती जमेल तेवढ्या कमी आवाजात बोलत होती .
उशीर झाला तर उद्या यायचीस आणि निदान फोन तरी चालू ठेवायच होत .
अरे यार मोबाइल कडे तर माझा लक्षच नव्हता . अभय समोर असतो ना तेव्हा काहीच दुसरं लक्षात येत नाही . तिने अजून मनातच बोललं , आणि बाबा sorry नेक्स्ट टाइम असं नाही वागणार मी असं म्हणत आत गेली .
घरच्यांचाहि राग थोड्या वेळात विझून गेला .
दुसऱ्या दिवशी सकाळी अभय आणि त्याचा भाऊ फिरायला गेले होते . येताना वाटेतच एका ट्रक च्या समोर त्यांची गाडी आली आणि दोघेही गाडीवरून पडले . अभय ला ड्रायविंग चा खूप वेड असल्याने अभयच गाडी चालवत होता आणि गाडीवरून पडल्यावर अभय चे दोन्ही हात शिलून निघाले होते .

तो गाडीवरून पडल्यावर पहिला फोन त्याने तिलाच केला . अभय चा Accident झाला हे कळताच तिला अभय ला भेटायचे होते , पण अभय बाहेरगावी गेला असल्याने तो च रात्री तिला भेटायला येणार होता . ती अभय येण्याची आतुरतेने वाट पाहत होती . कधी एकदाच आपण त्याला बघतो असं झालं होत तिला .
चौकात सगळे जमले होते , थंडीचे दिवस असल्याने एका ठिकाणी शेकोटी पेटवून त्याच्या भोवती सगळे बसले होते . तेवढ्यात अभय आला , पण त्याचे दोन्ही हात चांगलेच खरचटले होते . सगळ्यांनी तो येताच प्रश्नांचा वार च केला त्याच्यावर .
कस झालं ,केव्हा झालं आणि बरं झालं तुला जास्त लागलं नाही . तिच्या आईने तिला अभय साठी पाणी आणण्यास सांगितले . ती पाण्याच ग्लास त्याला देत त्याचा हात निरखू लागली होती . काही वेळ आपल्या आजूबाजूला लोक आहेत हे विसरून ते दोघेही फक्त एकमेकांकडे बघत होते . अभय ने ग्लास परत द्यायच्या निमित्त्याने हळुवार तिचा हात हातात घेतला आणि मी खरचं बरा आहे जास्त काळजी नको करू म्हणून तिला सांगू लागला .
पण त्याचे ते गोरे गोरे हात रक्तानी लाल झालेले बघून तिच्या डोळ्यातून अश्रू निघत होते . ती स्वतःला सावरत तिथून निघून गेली . अभय ला तिची त्याच्यासाठी काळजी करणे आवडले होते .

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users