मायबोलीला लोक डंपिंग ग्राउंड समजतात काय?

Submitted by स्वप्नील ७७७ on 28 September, 2019 - 13:45

थोड्याच दिवसांपूर्वी एका डॉक्टरने धाडधाड लेख इकडे टाकले. परत गायप झाले. अगोदरच इतर ठिकाणी प्रकाशित केलेले लेखन लोक इकडे धपाधप टाकतात. क्वालिटी कंट्रोल काही तरी असलं पाहिजे असे मला वाटते. असे काही लोक उन्मादाच्या भरात लेख टाकतात. प्रतिसादांना उत्तरंही देत नाही. उन्माद ओसरला की लेखक/लेखिका गायबतात हे बघायला मिळते.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

अगोदरच इतर ठिकाणी प्रकाशित केलेले लेखन लोक इकडे धपाधप टाकतात.
>>>

त्या लिखाणाची क्वालिटी चांगली असेल तरीही हरकत घ्यायची का?

स्वप्रकाशन असणे, एका ठिकाणी लेख दिल्यावर तो दुसरीकडे देताना संस्थळाची अनुमती घ्यावी न लागणे याचा पुरेपूर वापर केला जातो.
एका वर्तमानपत्रात लेख दिल्यावर तोच दुसऱ्यात दिला जात नाही. वाचकही सर्व पेपरस वाचत नाहीत म्हणजे ते इतर पेप्रातील साहित्यापासून वंचितच राहतात.

हे ट्रॅक करणं खूप कठीण आहे.आता एक त्यातल्या त्यात उओआय सुचतो
1. आलेले नवे साहित्य पूर्व प्रकाशित/चोरीचे/सांगून दुसऱ्याचे असेल तर वाचकांनी ते पुरावे देऊन स्पष्ट करावे
2. स्वतः लिहिलेले पूर्व प्रकाशित: खरे आहे हे सिद्ध झाल्यावर पूर्व प्रकाशित असा टॅग देऊन ते सर्व एका वेगळ्या टॅब मध्ये जावे आणि सर्व नव्या लेखनात दिसू नये.
3. दुसऱ्या ने लिहिलेले आणि 'तो इथे नाही म्हणून मी लिहिले' वाल्या लेखनावर मूळ लेखकाचे सही निशी छोटे स्कॅन पत्र (अमुक माझे लेखन प्रकाशित करतो आहे आणि मला माहिती आहे आणि माझा विरोध नाही) मूळ लेखकाच्या सहीसह जोडणे बंधन कारक.इतकी उचापत करण्यात अडचण आल्याने मूळ लेखक स्वतः मायबोलीवर सदस्य बनून लेखन टाकतील.असे निवेदन नसल्यास बॅकअप घेण्याची सूचना देऊन लेख उडवला जाईल.
4. न सांगता दुसऱ्याचे ढापलेले लेख/व्हॉट्सऍप पोस्ट सरळ उडवणे.
5. स्वतः लिहिलेले पूर्व प्रकाशित आणि तरीही जिथे पूर्व प्रकाशित होतं तिथे वाचलं न जाणारे/वाचलेलं नसणारे वाचक त्या टॅब वर जाऊन सर्व लेखन वाचतील.
6. नवे मेम्बर मायबोलीवर येतात ते इतर संकेतस्थळावरून येतात.तिथे त्यांनी 6-10 वर्ष लिहिलेले लेखन ड्राफ्ट आयता तयार असल्याने ते मायबोली वाचकांना धडाधड पोस्ट टाकून 6 दिवसात गळी उतरवतात.बाकी कोणाचेही धागे दिसत नाहीत. हे टाळायला सदस्य लेखनावर (मदत/कोतबो धागे सोडून) 15 दिवसातून एकदा अशी टेक्निकल मर्यादा टाकता येईल.प्रकाशित करताना 'तुम्ही कालच लेख टाकला आहे, हा लेख अजून 14 दिवसांनी प्रकाशित होईल' असा मेसेज.

हे सर्व व्याप न करता वाचकालाही डोळे आणि डोकं वापरता येईलच, पण करता आल्यास उत्तम.

यातल्या काही गोष्टी सध्या द्रुपल मध्ये सहज करण्या योग्य आहेत.

#६ मला अॅप्लिकेबल आहे. प्रतिसाद दिलाच पाहीजे असा आग्रह नाही. वाचक इतर लेख वरती काढू शकतातच.

एका व्यक्तीचे बरेच धागे पहिल्या पानावर कधी कधी दिसले,
पण यात काही त्रासदायक मला स्वतःला वाटले नाही, पण जर हा इश्यु असेल तर १५ दिवसातून एक लेख ही मर्यादा जास्तच कडक वाटते.
दिवसातून एक ठीक राहील.

बरेच जण क्रमशः कथा टाकतात व मध्येच ती अर्धवट सोडून गायब होतात त्यावर काही उपाय सुचवा. मी कंटाळून आताशा क्रमशः कथा दिसली तर वाचायचे सोडूनच दिले आहे.

मी कोल्ड्रिंक पार्लर मध्ये गेले.समोर कोकाकोला च्या 200 बाटल्या आहेत.
"मालक, सगळं कोकाकोलाच आहे का?"
"नाही हो,पण कोकाकोला ताजा ताजा आणि भरपूर आलाय.घ्या ना."
"एखादा घेते, पण मला ताक, कोकम,सोलकढी,गोल्ड स्पॉट,माझा मँगो पण हवाय."
"हो हो घ्या ना.दुकानात आता कोणी मदतीला नाही, जरा 200 बाटल्या उचलून बाजूला काढून ठेवता का?मागे सगळं आहे.सोलकढी,गोल्ड स्पॉट, पेप्सी,थम्स अप,ताक"
"बरं बरं.उचलते हां."

(हे आर्ग्युमेंट एकदम गंडलेलं आहे.यात "दुकानात तुम्ही पैसे न देता फुकट माल घेऊन जाता" हा मुद्दा नक्की येणार आहे ☺️☺️पण भावना समजून घ्या.)

कोकाकोला आर्ग्युमेंट गंडलेले नाही. बरोबरच आहे. डम्पिंग करणाऱ्याला डम्पिंगमध्ये गैर वाटत नाही. फक्त वाचनमात्र असणाऱ्याला किंवा लॉगिन ना करता वाचन करणाऱयांना मात्र प्रचंड इरिटेटिंग होते हे मात्र खरे.

लेखाचे नाव - लेखक - प्रकाशन दिनांक _वेळ हे अनुक्रमणिका/नवीन लेखन मध्ये आल्यास सर्वच प्रश्न सुटतील. नंतर नवीन प्रतिसाद_वेळ.

> 6. नवे मेम्बर मायबोलीवर येतात ते इतर संकेतस्थळावरून येतात.तिथे त्यांनी 6-10 वर्ष लिहिलेले लेखन ड्राफ्ट आयता तयार असल्याने ते मायबोली वाचकांना धडाधड पोस्ट टाकून 6 दिवसात गळी उतरवतात.बाकी कोणाचेही धागे दिसत नाहीत. हे टाळायला सदस्य लेखनावर (मदत/कोतबो धागे सोडून) 15 दिवसातून एकदा अशी टेक्निकल मर्यादा टाकता येईल.प्रकाशित करताना 'तुम्ही कालच लेख टाकला आहे, हा लेख अजून 14 दिवसांनी प्रकाशित होईल' असा मेसेज. > ही चांगली कल्पना आहे.

सतत स्वतःच प्रतिसाद देऊन स्वतःचे लेख वर ठेवणाऱ्यांचंपण काहीतरी करायला हवं.
===

> त्या लिखाणाची क्वालिटी चांगली असेल तरीही हरकत घ्यायची का? > हो कारण एका लेखकाचे विषय, स्टाईल साधारण सेमच राहतात. चांगले असले तरी सतत तशाच प्रकारच वाचन शक्य नाही. समजा स्टिफन किंग तुम्हाला फार्फार आवडतो, पण म्हणून त्याची किती पुस्तकं सलग वाचू शकता?

अगदी 15 दिवस नाही तरी 1 आठवडा=सेम लेखकाचा एक लेख हे प्रमाण योग्य वाटते.
साधारण एक ए4(टाईप केलेला) लेख लिहायला 2-3 दिवस लागतात म्हटले तर एक आठवडा एक लेख हे प्रमाण योग्य वाटते.
बाकी प्रतिसाद आणि वर लेख: द्रुपल बेस्ड पहिली मराठी साईट मनोगत वर आधी असे होते.मग लेख वर आणायला लोक(मी पण यात आले) हं वगैरे प्रतिसाद द्यायला लागले, ते पाहून इतर लेखावर पण लेखक हे करायला लागले आणि इंडेक्स म्हणजे पिसलेल्या पत्त्याचा कॅट बनू लागला. मग 'फक्त रिसेन्ट प्रकाशित लेख वर, रिसेन्ट प्रतिसाद वाला वर नाही' चालू होते.पण यात तोटा हा की कधी काळी ड्राफ्ट करायला घेतलेला लेख काही दिवसांनी पूर्ण झाल्यावर टाकला तर तो सुरू केल्या तारखेला जाऊन मागे जात असे आणि दिसत नसे.
सध्या कसे आहे माहीत नाही.
प्रत्येकाला सेपरेट प्रतिसाद लिहून फक्त धन्यवाद म्हणू नये यावर सहमत.(प्रतिसादात क्वेरी/वादाचा मुद्दा आल्यास तिथल्या तिथे उत्तर देणे साहजिक आहे)
नाव न घेता 20 प्रतिसादानंतर एकदम आभार मानले तर लोक रुसणार नाहीत.

समजा स्टिफन किंग तुम्हाला फार्फार आवडतो, पण म्हणून त्याची किती पुस्तकं सलग वाचू शकता?
>>>>
अहो पण सक्ती कुठेय?
किंवा असेही नाही की नवीन लेखन अल्याने आधीचे लेखन गायबच होते... ते फ्क्त मागच्या पानावर जाते ईतकेच.. अर्थात प्रतिसाद मिळताच पुन्हा पहिल्या पानावर येतेच.. आणि पहिले पान म्हणजे काही दोनचार लेखांचे असे नसते. तिथेही बरेच लेख असतात. याऊपर आता मायबोलीने माझ्यासाठी नवीन, ग्रूपवर नवीन. तसेच चहत्यांचे लेख अश्या बरेच सुविधा दिल्या आहेत. ..
ओवरऑल मला तरी हे ओवर रिॲक्ट करणे वाटते..

नाव न घेता 20 प्रतिसादानंतर एकदम आभार मानले तर लोक रुसणार नाहीत हो ना.
आणि नाव घ्यायचेच असेल तर एकाच प्रतिसादात अनेकांचे नाव घेऊन आभार मानता येईल, काही लोक असे करतातही.

मला हा लेख लिहावा वाटला याला कारण राजू कसंबे नावाचा लेखक. अतिशय कमी काळात खूप सारे लेख, कविता ( जिलब्या) पाडल्या व नंतर अज्ञातवासात गेले आहेत. किमान वैज्ञानिक लेखांवर सांगोपांग चर्चा झाली पाहिजे. राजकारणाचा धागा सहज चार पाचशे प्रतिसाद ओलांडून जातो. तसं इतर धागे दुसऱ्या पानावर गेले की परत उघडले क्वचितच जातात.

सक्ती नाहीचय पण क्वालिटी चांगली असेल तर जेवढे जास्त लोकं लेख वाचतील तेवढं लेखक-वाचक दोघांसाठी चांगलंय.

राजू कसंबेच उदा घ्या. त्यांचे लेखन चांगले, माहितीपूर्ण होते. मला वाचायलादेखील आवडत होते. पण इतका ओवरडोस झाला की मी वाचणे बंद केले. त्यांचे-माझे दोघांचे नुकसान झाले की! त्यांच्या प्रोफाइलवर जाऊन परत त्यांचे लेखन शोधून वाचू शकते पण एवढ्या उचापती कोण करणार.

काळ हेच उत्तर आहे,

कधीतरी वर्षा दोन वर्षातून अशी टोळधाड येते आणि पोट भरले की आपोआप नाहीशी होते, पुरकर गझलवाले, चारोळीवाले , पक्षीवाले , आता हे

चाहत्यांचे लेखन वाचायला नक्कीच आवडते पण प्रत्येक प्रतिसादानंतर ते लेख वर येतात. मग पहिल्या पानावरची नवीन लेखाची जागा अजून अजून कमी होते. ह्यावर काय उपाय. 1 वीक मध्ये 1 नवीन लेख हा उपाय मला बरोबर वाटतो आहे.

एका दिवसाच्या काही तासात ९०+ धागे एका आय डी ने काढले होते... मला तर धक्काच बसला होता. पहिले ३ -४ पाने हे याच नव्या आय डी च्या धाग्याने व्यापले होते... शतकी धाव निघाली का त्या आधीच हिट विकेट बाद हे माहित नाही. Happy

<< 1 वीक मध्ये 1 नवीन लेख हा उपाय मला बरोबर वाटतो आहे.>>
----- अशाने प्रतिभासंपन्न लेखक, कवी, गझलाकार यांच्या प्रतिभेची गळचेपी होणार.

>>> आणि नाव घ्यायचेच असेल तर एकाच प्रतिसादात अनेकांचे नाव घेऊन आभार मानता येईल, काही लोक असे करतातही. >>>>> @मानव, हे मान्य आहे. या निर्णयाचे स्वागतच आहे.

बाकी अति लेख एकदम टाकू नयेत, नियम आदि माबोच्या धोरणात वाचले नव्हते. अर्थात तारतम्य नावाची काही गोष्ट असते हे मान्यच आहे. परंतु मला गैर वाटले नव्हते.

माबोवरती एस्टॅब्लिश होण्याचे विविध मार्ग असतील, मी हा निवडला.

माझीही एक लेखक या नात्याने, एक अपेक्षा आहे - प्रत्येकवेळी , दर वेळी 'आवडली', 'छान', एवढेच प्रतिसाद देउ नयेत. काय आवडले ते कळवावे. काय आवडले नाही हेदेखील कळवावे. अर्थात मी सुद्धा असे एक शब्दी प्रतिसाद खूप दिलेले आहेत परंतु इन जनरल, सविस्तर मुद्दे मांडण्याने लेखकाला फायदा होउ शकेल, तसा वाचकांनाही होइल.

<@भरत, हे मान्य आहे. या निर्णयाचे स्वागतच आहे.>

मानव आणि मी वेगवेगळे आहोत हो.

मायबोलीवर एसटेबलिश वगैरे काही नसते,
उद्या थेटरात इस्टेबलिश व्हायला सगळी तिकिटे तुम्हीच काढून बसणार का ?

गावभर पोस्टर लावले म्हणजे एका दिवसात कुणी नेहरू होत नाही

<< अरेच्च्या मी आजपर्यंत खरच त्यांचे नाव भरत पृथ्वीकर असे वाचत आलेले आहे. Sad >>
------- भरत पृथ्वीकर आणि मानव मयेकर हे दोन भिन्न व्यक्ती आहेत. Happy

सध्या वरती तीन टॅब दिसतात -
माझ्यासाठी नवीन
ग्रुपमध्ये नवीन
मायबोलीवर नवीन

त्यापैकी माझ्यासाठी नवीन चा वापर कोण, कितपत करतं? मीतरी फक्त ग्रुपमध्ये नवीन आणि मायबोलीवर नवीन या दोनच टॅब वापरते. त्याऐवजी

मायबोलीवर नवीन प्रतिसाद आलेले लेखन
मायबोलीवर नवीन लिहलेले लेखन
तुमच्या ग्रुपमध्ये नवीन प्रतिसाद आलेले लेखन

∆ असे तीन टॅब केले तर?

तुमच्या ग्रुपमध्ये नवीन प्रतिसाद आलेले लेखन = माझ्यासाठी नवीन

तुम्ही ज्या ज्या ग्रूपचे सभासद आहात त्या ग्रूपमधल्या ज्या लेखांवर प्रतिसाद येतात ते लेख आणि त्या ग्रूप मध्ये नविन लिहिले गेलेले लेख या विभागात दिसतात.

तसं नाही.

तुमच्या ग्रुपमध्ये नवीन प्रतिसाद आलेले लेखन = ग्रुपमध्ये नवीन
मायबोलीवर नवीन प्रतिसाद आलेले लेखन = मायबोलीवर नवीन
म्हणजे दोन टॅब सध्या आहेत तशाच राहुदेत म्हणतेय मी.

सध्या माझ्यासाठी नवीन टॅबमध्ये मी ज्यांची चाहती आहे त्यांचे लेखन+ ग्रुपमध्ये नवीन हे दिसतंय.
त्याला मायबोलीवर नवीन लिहलेले लेखन याने रिप्लेस करायचं सुचवतेय. अनुने वरती एका प्रतिसादात लिहलं आहे > मग 'फक्त रिसेन्ट प्रकाशित लेख वर, रिसेन्ट प्रतिसाद वाला वर नाही' चालू होते.पण यात तोटा हा की कधी काळी ड्राफ्ट करायला घेतलेला लेख काही दिवसांनी पूर्ण झाल्यावर टाकला तर तो सुरू केल्या तारखेला जाऊन मागे जात असे आणि दिसत नसे. > तसं.

तुमच्या ग्रुपमध्ये नवीन प्रतिसाद आलेले लेखन = ग्रुपमध्ये नवीन >>> नाही. या टॅबमध्ये मला माझ्या ग्रूपमधले सगळे बाफ दिसतात.

समजा माझ्या ग्रूपमधल्या एखाद्या बाफवर कुणी प्रतिसाद दिला तर तो मला 'माझ्यासाठी नवीन' आणि 'ग्रुपमध्ये नवीन' या दोन्ही टॅबमध्ये दिसतो. जेंव्हा तो बाफ उघडतो तेंव्हा तो बाफ फक्त माझ्या करता जुना होतो. तेंव्हा तो 'माझ्यासाठी नवीन' मधून दिसेनासा होतो. पण तरीही 'ग्रुपमध्ये नवीन' मध्ये दिसत राहतो. तिथे दिसण्याचा क्रम शेवटच्या प्रतिसादाच्या वेळेवर अवलंबून असतो.

थोडासाच फरक आहे पण फरक आहे.

Pages