जगायचे गेले राहुनी

Submitted by @गजानन बाठे on 26 September, 2019 - 06:43

जगायचे गेले राहुनी

खंत बोचरी सांगुनी गेली,
आज या क्षणी बघता वळूनी,
जमा खर्च तव बेरिज केली,
जगायचे गेले राहुनी.

खूपदा वाटे तुज भेटावे,
तुज सांगावे 'तू माझी राणी',
हसण्यावरी तू मज घ्यावे,
सांगायचे गेले राहुनी.

काळ तेवढा उनाड होता,
गात बसलो मी रडगाणी,
नुसती करीत होतो चिंता,
हसायचे गेले राहुनी.

अव्यक्त जरी मी फार राहीलो,
विवाद नव्हता कसली वाणी,
स्वकियांस मी परका झालो,
बोलायचे गेले राहुनी....

गजानन बाठे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मनाला भिडली कविता!

खरंच जगणं राहून जातं आणि केंव्हा वेळ संपते, सांगता येत नाही...
... मला तर वाटायचं आयुष्य ना हे एका सेमिस्टर सारखं आहे.. सुरुवात सुरुवात म्हणता म्हणता शेवट येऊन जातो आणि तेंव्हा डोळे उघडतात.. (ही माझी कल्पना आहे. Proud )

पुनःश्च एकदा अभिनंदन! छान कविता... Happy

गजानन बाठे सर.........
आता बोलायचे आहे
मायबोली वर व्यक्त होयचं आहे

वा छानच आहे कविता.
>>>>>>>>मला तर वाटायचं आयुष्य ना हे एका सेमिस्टर सारखं आहे.. सुरुवात सुरुवात म्हणता म्हणता शेवट येऊन जातो आणि तेंव्हा डोळे उघडतात.. (ही माझी कल्पना आहे. Proud )>>>>>>>> ही कल्पना देखील आवडली. खरच असे होते.