मन

Submitted by रिना वाढई on 26 September, 2019 - 02:40

रेवा , तुला माहिती आहे का , साक्षी होती ना, आपल्या शेजारी राहायची ती . तिचा कॅम्पस सिलेक्शन झाला आहे, एका मोठ्या कंपनी मध्ये आणि package किती आहे माहिती आहे का ?
राज सकाळी उठल्या बरोबर रेवा ला सांगत होता. रेवा , तो असाच काहीतरी सांगत असेल म्हणून लक्ष देत नव्हती ,मात्र जेव्हा त्याने कॅम्पस सिलेक्शन म्हटलं तेव्हा ती कान देऊन ऐकू लागली .
किती आहे रे package तिला ? रेवा ने विचारलंच राज ला .
९ लाख आहे . रेवा, तू पण चांगल्या कंपनी साठी प्रयत्न का नाही करत .
अ रे तुला माहिती आहे ना, आता जमणार आहे का मला ?
एवढं बोलून रेवा आपलं किचन आवरू लागली . पण मनात एक गोष्ट सलत होतीच तिच्या . ९ लाख package .आणि माझा बघावा नाहीतर , एका engineer चा एवढा कमी पगार सांगायलाही लाज वाटते .

जाऊ दे रेवा, चल लवकर आटोप आधीच उशीर झाला आहे . स्वतःशीच बोलून ती श्लोक ची तयारी करू लागली आणि तो गेल्यावर ती सुद्धा ऑफिस ला पोहोचली . आज मात्र ती जिथे जिथे जॉब साठी apply करता येईल तिथे तिथे करत होती . एवढ्या दिवसांपासून राज तिला म्हणायचा कि तू नाही केलीस जॉब तरी चालेल . पण आजकाल मात्र तो जास्तच दबावात दिसत होता .
घरी आल्यावर प्रसन्नता नसायचीच त्याच्या चेहऱ्यावर पण सकाळी उठून ऑफिस ला जाताना सुद्धा तो आपल्याच विचारात गुंतलेला असायचा .
रेवा त्याला happy ठेवण्यासाठी जे जे करता येईल ते सगळं करत होती . ती सुद्धा जॉब करत होती पण थकवा हे तर तिच्या dictionary मध्येच नव्हता जणू .
सकाळी उठून सगळे काम आटोपून ऑफिस ला जाणे , सायंकाळी घरी आल्या आल्याचं चहाच पातेलं गॅस वर ठेवून घर आवरणे . घरी नाही म्हणायला चार पाच लोक असायचेच ,पण चहा च समीकरण जणू कोणाला जमतच नव्हतं .चहा साठी सुद्धा तिची वाट असायचीच . एकदाच सगळ्यांना चहा देऊन झालं कि मग मुले वाट बघतच असायचे तिच्या येण्याची . नुकताच तिने मुलांचे Dance क्लास घेणे सुरु केले होते . मुलं घरी गेली कि मग अजून kitchen मध्ये जाऊन स्वयंपाक , नंतर श्लोक चा अभ्यास आणि मग रात्रीच जेवण . एवढं करताना सुद्धा तिच्या चेहऱ्यावर कधी थकवा जाणवत नव्हता . किंवा ती कितीही थकली असली तरी आपलं दुखणं आपणच सहन करणे असा तिने सिद्धांत बनवला होता .
राज मात्र पूर्णतः वेगळा होता रेवाच्या . उशिरा झोपून उठला कि बस ऑफिस साठी तयार होऊन ऑफिस ला जाणे , कधी रेवा ने एक जरी काम सांगितलं तरी त्याच्या कपाळावर आठ्या येत होत्या . सायंकाळी घरी येऊन सुद्धा फक्त जेवणे आणि फिरून आलं कि मग झोप . कधी तिला थोडी मदत करावी हा विचार देखील त्याच्या मनात येत नसावा .
राज चा स्वभाव जरी शांत असला तरी त्याच असं वागणं रेवाला खटकायच .
ती त्याला कित्येकदा म्हणायची , नको काही करू पण निदान मनसोक्त बोलत तरी जा . शलोक चा रात्रीचा अभ्यास तरी घेत जा , एवढं करता करता मलाही त्रास होतोच रे , मी हि काही मशीन तर नाहीच आहे .... पण राज चा उत्तर एकच "तुझं नेहमीच हेच असते . " आणि तो निमूटपणे तिथून निघून जायचा .

रेवा ला आता राज च्या या स्वभावाची सवय झाली होती , तरीही कधी कधी तिला वाटायचं कि त्याने आपली घरची जबाबदारी स्वीकारायला पाहिजे . ती एक दिवसासाठी जरी बाहेर गेली तर राजच जेवण बाहेरच असायचं , त्याला साधं आपल्या किचनमधल्या वस्तू कुठे ठेवून असतात , याची सुद्धा माहिती नसायचीच .

रेवा जेव्हा लग्न होऊन आली होती , तेव्हा राजचा पगार फार जास्त नव्हताच . आर्थिक मंदीमुळे त्या काळात कधी दोन दोन महिन्याचा पगार थांबलेला असायचा . रेवा चा स्वभाव राज ला चांगलाच माहिती होता , लग्न ठरल्यानंतर फोन वर बोलणे होत असल्याने त्याने तिच्याबद्दल सगळं जाणून घेतलं होत .
रेवाचा स्वभाव मनमोकळा असल्याने तिने स्वतःबद्दल सगळं च सांगितलं होत राजला . बाहेर राहून शिकत असल्यामुळे लेट नाईट पार्टीस , हॉटेल च जेवण हे दर आठवड्याला ठरलेलंच असायचं तीच . पण जेव्हा राज ने तिला लेट नाईट पार्टीस साठी नाही म्हटलं तेव्हा तिने शहाण्या मुलीसारखं मान्य केलं होत.
प्रत्येक मुलीचे काही स्वप्न असतात , त्याप्रमाणेच रेवाचे हि काही स्वप्न होते . तिला राज कडून काही नाही तरी एक चांगला मित्र तो बनवा असे नेहमी वाटायचे , आणि त्यामध्ये तो यशस्वी झाला . रेवाचा स्वभाव जरी अल्लड असला तरी राज मात्र समजदार होता. तिला प्रत्येक गोष्टींमध्ये तो समजून घ्यायचा .
सगळं एकदम व्यवस्थित चालू होत , पण काही दिवसातच राज चा पगार बरोबर होत नसल्याने कुठेतरी तडजोड होत होती .रेवाला या गोष्टीचा आधी खूप त्रास झाला पण जसे जसे दिवस जात होते तशी ती हि परीस्तीशी जुळवून घेऊ लागली . एक अल्लड स्वभाव असणारी मुलगी कधी एवढी समजदार झाली हे तिला देखील कळले नसावे .
तिने राजसाठी स्वतःला पुरत बदलून च टाकलं असं म्हणायला हरकत नाही . हा बदल तिला नाही जाणवला असला तरी तिच्या मैत्रिणींना जाणवत होता . लग्नानंतर कुणी घरी आले कि तिच्यामधला बदल पाहून अवाक होत असे . बाहेर फिरायला जाणे , शॉपिंग करणे याला तर जणू fullstop च लागला होता . या ऐवजी घरच्या जबाबदाऱ्या समजणे , सगळ्यांना काय हवं नको ते बघणे , ती एकदम टिपिकल house wife च बनली होती .
आजूबाजूचे शेजारी नेहमी रेवाचं कौतुक करायचे , "एवढ्या लहान वयात लग्न होऊन सुद्धा तिने किती छान प्रकारे सगळं संभाळल आहे , नाहीतर आजकालच्या मुली स्वतः शिवाय दुसर्यांचा विचार करायला देखील वेळ नसतोच .राज च्या एक काकू होत्या त्या घरी आल्या कि रेवा ला खूप बरं वाटे , कारण तिचे आई-वडील तर वर्षातून एकदा सुद्धा तिच्याकडे येत नव्हते .आलेच तरी एक दिवस राहून दुसऱ्या दिवशीच परतीची वाट असे.
ती आपल्या आई समोर हि आपलं मन मोकळं करू शकत नव्हती , कारण त्या एकाच दिवसासाठी यायच्या आणि अशातही आपण काय आपले गाऱ्हाणे त्यांना सांगायचे म्हणून ती शक्यतो खुश च राहत होती त्यांच्यासमोर . पण काकू आल्या कि तिचा बांध फुटत होता , ती त्यांच्यासोबत मनमोकळेपणाने बोलत होती आणि काकू हि तिला खूप साऱ्या गोष्टी समजावून सांगत होत्या .
रेवाने लग्नानंतर अभियांत्रिकी ला ऍडमिशन केली आणि यामध्ये राज ने तिला पुरेपूर सहयोग केला होता . फर्स्ट क्लास मध्ये तिने graduate पूर्ण केलं होत . सुरुवातीला सगळ्यांची कुणकुण असायची कि आता कशाला शिकायला पाहिजे , मुलं - बाळ याचा कधी विचार करणार आहात तुम्ही लोक असं घरच्यांचं म्हणणं असायचंच . पण राज पुढाकार घेऊन सगळी बाजू सांभाळत होता.
रेवाचं स्वप्न होत कि मुलं-बाळ व्हायच्या आधी चांगलं वेल सेटल व्हायचं दोघेही ,म्हणजे आयुष्य सोपं होईल . पण BE च फायनल इयर असतानाच त्यांना कळलं होत कि घरात आता लवकरच पाळणा हलणार आहे .दोघांनाही आनंद झाला होता पण रेवाला मात्र कुठेतरी घाई होत आहे असं वाटत होत . आता राजचा हि पगार वाढला होता म्हणून राज तिला समजावत होता कि आता आपण याचा विचार करायलाच हवा . अजून उशीर करून चालणार नाही . आणि तुला कमवायची गरज हि नाही आता . त्यावेळेस रेवा ने राज च ऐकलं आणि समोर च्या प्रवासासाठी सज्ज झाली.
कॉलेज मध्ये एकदा चांगल्या कंपनी च कॅम्पस आलं होत आणि रेवा त्यासाठी eligible होती , प्रग्नेंसीचा ३ रा महिना असल्याने तिला थोडा त्रास होताच तरी ती त्या कॅम्पस साठी गेलीच होती . २ राउंड सुद्धा तिने क्लिअर केले मात्र ३ ऱ्या राउंड ला रात्रीचे ११ वाजले होते , आणि पोटात अन्न नसल्याने तिची तब्येत खराब झाली . ते कॅम्पस अर्धवट सोडून तिला घरी यावे लागले होते (राज तिला घ्यायला गेला होताच ).
घरी आल्यावर तिच्या मनात एक चिढ होती स्वतःबद्दलची , कि आपण एवढे अशक्त कसे पडू शकतो . राज च्या समजावण्यावरून तिने श्लोक होत पर्यंत तरी जॉब साठी apply केला नाही .
श्लोक अवघ्या चार महिन्याचा असतानाच तिने classes जॉईन केले , कारण तिला आधीच काही classes करायचे होते पण ते श्लोकमूळे possible नव्हते . classes संपताच तिने जॉब सुद्धा करायला सुरुवात केली , पण तिची जबाबदारी आधी पेक्षा वाढली होती . श्लोक, हि आता तिची पहिली responsibility असल्याने त्याला ठेवून दूर नोकरीसाठी जाणे शक्य नव्हते . तिने जवळपास ची कंपनी जॉईन केली मात्र तिथे पगार कमी . तरी तिला ते योग्य वाटत होत आणि राज ला हि काही फरक पडत नव्हता .
घर , राज आणि आता श्लोक यांना सांभाळत ती कशीतरी नोकरी करत होती .
जे मिळते त्याच्यातच सुख मानून ती आयुष्याशी तडजोड करत होती , पण या गोष्टीची कधी खंत हि नव्हती तिला जेव्हापर्यंत राज तिला समजून घेत होता . तिने कधी मोठ्या कंपनी साठी प्रयत्न केलाच नव्हता कारण तिला याची गरज वाटत नव्हती पण आजकाल राज च बोलणं तिला कुठेतरी सलत होत .
"तुझ्यासोबतच्या सगळ्या मुली चांगल्या मोठ्या कंपनी मध्ये रुजू झाल्या आणि तू मात्र तिथेच राहिलीस रेवा ", हे वाक्य तिला आतून टोचत होत . हे मी कुणासाठी केले राज , मला तर आधीच उंच भरारी घ्यायची होती पण तुला तेव्हा ती भरारी नको वाटली आणि आता तू म्हणतोस कि मी प्रयत्न नाही करत . लग्न झाल्यावर शिकणेच हे किती कठीण असते एका मुलीसाठी , आणि तरी मी शिकले, पण मुलं झाल्यावर आधीसारखी जिद्द नाही राहिली आता माझ्यात . लग्नाच्या आधीची गोष्ट वेगळी असते , आपल्याला जिथे जाऊन नोकरी करायची तिथे आपण करू शकतो , किमान लग्नानंतरही ठीक , जेव्हा दोघेच असतो तेव्हा जास्त फरक नाही पडत . पण पूर्ण फॅमिली जेव्हा आपल्याकडे राहायला आली आहे आणि आता श्लोक हि आहे तर मी स्वतंत्र कुठे आहे विचार करायला ? बाकीच्या मुलीत आणि माझ्यात काही फरक आहे ते तुला कस दिसत नाही राज ?
तुझे म्हणणे मला पटत असले तरी माझ्या पंखांमध्ये आता बळ नाही आहे . मला जेवढं जमेल तेवढं करते आहेच मी तुझ्यासाठी . पण तू माझ्यासाठी काय करतोस हे एकदा स्वतःला विचारून बघ .... रेवा फक्त बोलत होती , समोर राज असल्याचं तिला भास होता पण तिचे बोलणे ऐकायला नव्हताच तो .
मनातल्या विचारांना कितीही उकळी आली असली तरी ते गिळून समोर जाणे हा आता तिचा स्वभावच बनला होता!!!!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुढचा भाग आहे का?
रेवाच्या मनातली चलबिचल छान मांडलीये.. पु.ले.शु!

पुढचा भाग आहे का?>>नाही ...
रेवाच्या मनातली चलबिचल छान मांडलीये.. पु.ले.शु!>> धन्यवाद !!

मस्त जमली आहे कथा .

रेवा फक्त बोलत होती , समोर राज असल्याचं तिला भास होता पण तिचे बोलणे ऐकायला नव्हताच तो .???

राज चे काय झाले मग ? ? ? ? राज कुठे गेला ? ? ?

खूपच आवडली ही कथा. असेच होते काही जणींचे, खरं तर बर्‍याच जणींचे. उमेदीची वर्षे त्यागात जातात. आज करु-उद्या करु पण तेव्हा हे कुठे माहीत असते की उद्या जिद्द जाणार, अनंत व्यवधानं येणार, तब्येत मी-मी म्हणणार. अपेक्षा संपत नाहीत.
यामध्ये रेवाची चूकी आहेच. तिला सुपरमॉम, सुपरवुमन बनायचे होते जे ती बनली. कधी अश्रू दिसू दिले नाहीत, याचे फळ अजुन काय मिळणार होते? Sad Sad

खूपच आवडली ही कथा. >> धन्यवाद सामो
असेच होते काही जणींचे, खरं तर बर्‍याच जणींचे. उमेदीची वर्षे त्यागात जातात. आज करु-उद्या करु पण तेव्हा हे कुठे माहीत असते की उद्या जिद्द जाणार, अनंत व्यवधानं येणार, तब्येत मी-मी म्हणणार. अपेक्षा संपत नाहीत.
यामध्ये रेवाची चूकी आहेच. तिला सुपरमॉम, सुपरवुमन बनायचे होते जे ती बनली. कधी अश्रू दिसू दिले नाहीत, याचे फळ अजुन काय मिळणार होते? >>अगदी बरोबर आहे तुमचं . तुमच्या प्रतिक्रिया बद्दल मनापासून आभार तुमचे ..