नदीतीर

Submitted by Mrudu on 25 September, 2019 - 07:30

किरणांचा लेऊनी साज नदीतीर चमकता होई
लहरींचे निळसर कंपन जणू नक्षी उठवून जाई।

किनार्‍यावरी वृक्ष एक तो वाकून पाहे जलि
धारांना नटविण्यास त्याने पर्णभेट ती दिली।

अशी सजली नटली,झाला साजिरा श्रृंगार
नगकन्येस भेटण्या होई दरिया आतुर।

धावे खळाळून ओघ, आस लागली जीवाची
जल मिळे जलधीला खूण निःशब्द प्रेमाची॥

Group content visibility: 
Use group defaults

छान कविता...
३र्‍या कडव्यातील दुसरी ओळ वाचताना अडखळतोय... काहीतरी बदल हवा असं वाटतंय!

प्सर्वांना धन्यवाद !
>>३र्‍या कडव्यातील दुसरी ओळ वाचताना अडखळतोय... काहीतरी बदल हवा असं वाटतंय!
कदाचित प्रत्येक कडवं वेगळ्या मीटरमधे असल्यामुळे वाटलं असावं.