रुपगर्विता

Submitted by @गजानन बाठे on 24 September, 2019 - 11:56

रुपगर्विता

भल्या पहाटे ओल्या अंगी,
रुपगर्विते येशिल का,
पाश बाहूंचे मजला देऊनी,
कवेत अलगद घेशिल का.

केस मोकळे रुप गोजीरे,
स्पर्श सुखाने भिजशील का,
दोन काया अधिर माया,
एकजीव तू होशील का.

नजरेवरती नजर रोखूनी,
ठाव काळजा घेशिल का,
मंद सुगंधी चंदन काया,
रंग तुझा मज देशिल का.

अदलाबदली करू मनाची,
फक्त माझी असशिल का,
अधरा वरती अधर टेकूनी,
श्वास माझा होशील का.....?

गजानन बाठे.

Group content visibility: 
Use group defaults