पार्कातला GTG

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago
Time to
read
<1’

शुक्रवारी पार्कातल्या BBला अचानक जाग आली ती किर्ती कॉलेजच्या वडापाव आणि उद्यान गणेशच्या गरमागरम भजीच्या आठवणीने... या गरमागरम भजीने योगीच्या सुपिक डोक्यात रविवारी मेगा GTG करायची ठिंणगी पाडली... लागलीच तशी दवंडी समस्त मुंबईकर मायबोलीकरांना समस द्वारे पाठविण्यात आली. (जल्ला पार्कातली भजी खायची हौस होती तर मग एकट्यानेच यायचे ना... सगळ्यांना जमा करून, फोनाफोनी करून जिवाला का ताप करून घ्यायचा... पण तसं वागेल तर तो मायबोलीकर कसला... ठरवलं मेगा GTG...)

रविवारी सुपुत्राला पार्काची सफर घडवायची म्हणून मी वेळे आधीच हजर होतो. पण वेळेवर येण्याच्या नादात दुरसंचार खातं घरीच विसरून आलो होतो... ("ही ह्यांची अक्कल हुशारी" इती सौ.चा टोमणा मनातल्या कानात.) (मग मी पण मनातल्या कोपर्‍यात "आहेच मुळ्ळी हुशार" ) म्हणत पाकिटातून मुंबईकर मायबोलीकरांची यादी काढली आणि सौ.च्या आप्तकालीन संचारध्वनी वरून शक्य तितक्या सगळ्यांशी संपर्क साधला... येतोय... नाही जमणार... आजारी आहे... पाहूणे आले आहेत... साला आज पण ऑफिस आहे यार... कित्ती वाजता निघणार? कोण कोण येणार? काय खाणार?... प्रश्ण अनेक उत्तर एक... लवकर या...

मध्य रेल्वेचा नेहमीचा मेगा ब्लॉक त्यात हा मेगा GTG... कल्याण, डोंबिवली, ठाणे, नविमुंबईतून येणार्‍या सदस्यांनी योग्याचा मनोमन उद्धार केला असणार यात शंकाच नाही... संध्याकाळी ५.३०ची वेळ ठरलेली... म्हणजे १ तास इकडेतिकडे... त्यात रविवार, परिवार, मेगा ब्लॉक हे सगळं सांभाळत किशोर मुंडे सहकुटुंब हजर... त्या आधी अश्विन एक (गोड?) बातमी घेऊन आला होता... मागोमाग भ्रमा, योग्या, अमर चक्क ६.०० ला उद्यान गणेशला हजर... या सर्वांची उत्सुकता बघून GTG मेगा होणार याची योगीला खात्री वाटू लागली... अर्धा तास झाला तरी उपस्थीतांची संख्या काही केल्या पुढे वाढत नाही हे पाहून मेगा GTGची चिंता योग्याला सतावू लागली... संकष्टी असल्याने देवळात बरीच गर्दी होती... मेगा GTG साठी त्यांचा पाठिंबा घ्यावा का? याची विचारणा योग्या करत होता... टांगारू लोकांना संपर्क करत होता... पण गाडी पुढे सरकत नव्हती... संकष्टी असली तरी रविवार फुकट जाऊ द्यायचा नाही हे भ्रमाचे मालवणी तत्वज्ञान ऐकून आम्ही मंदिरापासून दूर उभे रहाण्याचा निर्णय घेतला...

सुपुत्राला छोट्यांच्या पार्कातून घेऊन येताना साधनाची भेट झाली... तो पर्यंत मनी पण हजर झाली होती... मागोमाग स्वाती एकटीच आली... दरम्यान एक डु.ID अगरबत्तीचे पुडे घेऊन साधनाच्या मागे लागला होता.... विचारपुसीच्या फेरी झडल्यावर मोर्चा पार्कातील भजी वाल्याकडे वळला... कोण खाणार, किती खाणार, काय खाणार, तेलकट खाणार, उपवासाची खाणार की डाईट भजी खाणार... 'कोणी गोविंद घ्या... कोणी गोपाळ घ्या' या चालीवर प्रत्येक जण हातातील भजी प्लेट एकमेकां समोर नाचवत होते... 'देनेवाला जब भी देता... देता चटणी डाल के...' अमर आणि मी मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा घेतला... तेव्हढ्यात स्वाकांतचे आगमन झाले. या वेळेस स्वाकांतने मायबोली करांसाठी दुधीची मिठाई आणली होती... तेव्हढ्यात स्वातीला अफजल खानच्या बहिणीचा फोन आला... एका मिनिटात पोहचतेय... तुम्ही कोणत्या झावळीत आहात वगैरे वगैरे... येणार्‍या वादळाच्या धास्तीने सगळ्यांनी मिठाई क्षणात फस्त केली... आणि मंजुडीचे आगमन झाले... या धडाकेबाज आगमनाने झोपलेला श्रीशैल जागा होऊन रडू लागला... Proud वेळेचे भान ठेवत अस्मादिकांनी तिथून काढता पाय घेतला...

त.टी. : या GTG मागे पार्कातल्या BBवरील उपास, गौरी आणि अरूणचाही सुप्त सहभाग होता... त्यांचे खूप खूप आभार Happy

विषय: 
प्रकार: 

स्सही रे इंद्रा Happy

शेवटी जीटीजी यशस्वी झाल्याशी मतलब Happy
************
To get something you never had, you have to do something you never did.

खरंच मेगा होता हा जीटीजी.. मी मेगा शब्द वाचुन मंदिरापासुन जरा दुर बसलेल्या ४० जणांच्या घोळक्याकडे संशयाने पाहात होते. माबोकर तर नसावेत??? पण एकही बाई नव्हती ना त्यात, त्यामुळे नसावेत असाच संशय येत होता.. शेवटी सगळे मेंबर भेटल्यावर, मेगा मेगा म्हणतात ते इतके मेगा असते काय असा प्रश्न पडला...

पण भजी मात्र एकदम झक्कास.. चटणीही मस्त.. इंद्रा तु माझ्यासाठी कीर्तीचा वडापाव का नाही आणला?? किती वर्षात खाल्ला नाही Sad

*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...

इंद्रा, कमी मेंबर आले तरी काय झालं? जमणं महत्वाचं. नाहितर आपण सगळे कोण कुठले ! या आंतरजालावरची ओळख. पण निर्माण झालेली आपुलकीच आपल्याला भेटायची इच्छा निर्माण करते Happy मी मिसलं, पण पुढच्या वेळी नक्की Happy
************
ॐ श्रीरामदूताय हनुमंताय महाप्राणाय महाबलाय नमो नमः |

सहीच इंद्रा.. सुप्त सहभाग होताच पण संकष्टीचा 'उपास' असल्याने भज्यांवर ताव मारता आला नाही, तुम्ही सगळ्यांनी मनसोक्त भजी खाऊन घेतली पार्कात ह्याचा आनंद आहेच Happy

नेहमीप्रंमाणेच लै जबरी रे !! मस्तय Happy

("ही ह्यांची अक्कल हुशारी" इती सौ.चा टोमणा मनातल्या कानात.) (मग मी पण मनातल्या कोपर्‍यात "आहेच मुळ्ळी हुशार" ) >> Lol
'कोणी गोविंद घ्या... कोणी गोपाळ घ्या' या चालीवर प्रत्येक जण हातातील भजी प्लेट एकमेकां समोर नाचवत होते..
>> Lol

चला यानिमित्ताने का होइना रंगीबेरंगीची पान हलले तर Happy

इन्द्रदेवा, छानच लिहलय! Happy

त्या अश्विनला सहनुभुतीपुर्वक शुभेच्छा!! Proud

इन्द्रा Lol

जल्लां मी आल्यावरच स्वाकांतांनी मिठाई वाटली रे सगळ्यांना.........

ईन्द्रा ... मनापासुन धन्यवाद ... पुढिल ग ट ग ला नक्कि येणार... आणि जागा पण आताच सांगते.. नविन झालेल चौपाटी जवळ्च उद्यान ..किती सुन्दर जागा आहे...

ईंद्रा, मस्त व्रु, मी मिसलं बघ...