You Who Never Arrived

Submitted by सामो on 20 September, 2019 - 10:00


.
रिल्के नामक कविची, अतिशय अतिशय सुंदर कविता "You Who Never Arrived" वाचनात आली. पाण्यातील चंद्रबिंब जसे जाळ्यात येत नाही ,तसे या कवितेत कविला काय म्हणायचय ते हातात येत नाही. ही elusive कविता सुरुवातीपासूनच मनाचा "वेध" घेत गेली. कोण्या प्रियकराने त्याच्या अमूर्त आणि आभासी प्रेयसीस उद्देश्युन लिहील्ली की विश्वाचा आत्मा असलेल्या सर्वसाक्षी अशा ईश्वरास उद्देश्युन लिहीली नकळे. हे जे कोणी अमूर्त व्यक्तीमत्व आहे ते कविच्याच wistful longing चे उत्कट प्रतिबिंब असू शकते, कदाचित ती व्यक्ती कवितच दडलेली आहे.
कविचे म्हणणे आहे, मी कित्येक गाणी शोधली, पण तुला कोणते गाणे आवडेल हे मला कळलेच नाही. मला ज्या काही तीव्र, उत्कट, सुंदर, दिव्य अनुभूती लाभल्या, मग ते ऊंच प्रासादांची आकाशात गेलेली शिखरे पाहताना असो की, दूरवर पसरलेले विस्तीर्ण माळरान पहातेवेळी मला अचानक जाणवलेली विश्वाच्या पसार्‍यातील खुजेपणाची जाणीव असो की आयुष्यात झपकन ऊभी ठाकलेले भले-बुरे प्रसंग असोत प्रत्येक क्षणी माझा आत्मा तुलाच आणि फक्त तुलाच साद घालत राहीला पण तू मात्र अलिप्तच राहीलास.तू माझ्या कधीच माझ्या कवेत आला नाहीस. प्रत्येक सुंदर, लावण्यमय बगीच्यात मी तुलाच शोधत राहीलो. जसा कस्तुरीमृग स्वतःच्याच नाभीतील कस्तुरीच्या सुगंधाने वेडावुन जाऊन भटकत रहातो तसा मी तुझा ध्यास घेत वणवण करतच राहीलो. प्रत्येक वळणावर मी पोचायचो आणि मला ऐकू यायचा तो तुझा दूरदूर जाणारा पायरव. मंत्रचळ लागल्यागत, चकवा लागल्यागत मी तुझा फक्त तुझा शोध घेत गेलो आणि तू प्रत्येकवेळी ओझरते दर्शन देऊन नाहीसा होत राहीलास.
कवितेत एक प्रचंड हुरहूर आहे. तहानलेल्या कविला मृगजळ, मिराज खुणावत राहीलं आहे.या कवितेचे विश्लेषण मुद्दाम शोधले असता एक सुंदर वाक्य सापडले -

In life we settle for approximations (we better settle for them if we are to have any relationships at all).
.
आपल्या मनातील प्रतिमेशी १००% तादात्म्य पावणारी व्यक्ती आपल्याला कधीच भेटत नाही मग ती प्रतिमा प्रेमविषयाची असो वा मैत्राची. पण जे काही मिळतं ते आपण गोड मानून घ्यायला शिकतो. अगदी अगदी दुर्मिळ असे क्षण येतात नाही असे नाही - जेव्हा "जगी सर्वसुखी असा कोण आहे?" या प्रश्नाचे उत्तर आपल्या मनात "मी" असे उस्फूर्त निघते पण असे क्षण प्रचंड फार & बिटवीन असतात, दुर्मिळ असतात. क्वचित एखादी कविता वाचताना असे क्षण झपकन येऊन पूर्णत्वाच्या अनुभवाचे दान देऊन जातात. बाकी जास्त काळ तहानलेले असण्याचा अनुभवच अस्तित्व व्यापून ऊरतो. आपण सारेजण दुभंगलेलो आहोत, आपण पूर्ण नाही, ही ती जी तृष्णा आहे ती तृष्णा रिल्केच्या या कवितेतून समर्पक रीतीने व्यक्त होते.
.

You who never arrived
in my arms, Beloved,
you who were lost from the start,
I don’t even know what songs
would please you. I have given up
trying to recognize you in the surging wave
of the next moment. All the immense
images in me – the deeply felt
faraway landscape, cities, towers, bridges,
unsuspected turns in the path,
and those powerful lands that were once
pulsing with the life of the gods –
all rise within me to mean
you, who forever elude me.
.
You who are all the gardens
I have ever gazed at.
An open window in a country house –
and you almost stepped out to meet me.
Streets that I chanced upon –
you had just walked down them and vanished.
And sometimes, in a shop, the mirrors
were still dizzy with your presence and,
startled, gave back my too-sudden image.
Who knows? Perhaps the same bird
echoed through both of us
yesterday, separate, in the evening . . .
.
~ Rainer Maria Rilke, 1875-1926

Group content visibility: 
Use group defaults

शब्द वाचले भावना वाचायच्या बाकी आहेत.
खुप सुंदर कविता आहे.
अजुन काही निवडक कविता तुमच्या संग्रहात असतील तर येऊद्या.

अक्कु आपले खूप आभार!
एक ल्युसिल क्लिफ्टन यांच्या कविते वरती लहान लेख लिहीला आहे पण ती कविता चाइल्ड अ‍ॅब्युझ या फार डार्क विषयावरची आहे. नंतर टाकेन. प्लूटोचा लेख + ती कविता ओव्हरडोस होइल.
पुनरएकवार धन्यवाद.

Just outstanding writing!
मायबोलीवर स्वागत!!! आणि थॅंक्यु!

सुंदर रसग्रहण केलंय तुम्ही..माझ्या निवडक 10त.

या कवितेचा अर्थ प्रत्येक व्यक्तीच्या स्वभावानुसार बदलत असावा असं मला वाटतंय.. Happy पुलेशु!