तुझे स्वप्न

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 17 September, 2019 - 11:59

तुझे स्वप्न
**********
तुझे स्वप्न हे
अर्धे अधूरे
तरी साजरे
आहे काही
.
डंख तुझा तो
मधू विखारी
तया निवारी
औषध ना
.
प्रेमातून त्या
होता सुटका
घट फुटका
माझ्या हाती
.
लखलखते
तप्त सुवर्ण
गेलो होऊन
जरी काही
.
मूर्त जाहलो
सुवर्ण राशित
परि बंदिस्त
कर्मगती
.
म्हणतो आता
ये सोडव रे
अवधूता रे
विक्रांत या
.

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ही कविता फेसबुकवर वाचली होती.
>>प्रेमातून त्या होता सुटका
घट फुटका माझ्या हाती>>
या ओळी सर्वाधिक आवडल्या. कविता आवडली हेवेसांन.

मुर्त जाहलो
सुवर्ण राशीत
परि बंदीस्त
कर्मगती>> नितांत सुंदर कडवं!
आवडली कविता.. Happy