चंद्रावर भारतीय पाउल पडते पुढे..... चांद्रयान लाइव्ह वॉच.

Submitted by अश्विनीमामी on 6 September, 2019 - 12:36

आज रात्रीतून चंद्रावर आपल्या इस्रो चे मून लँ डर उतरणार. ट्वि टर वर सर्व माहिती उपलब्ध आहे.
# चांद्र यान २ व # इस्रो फॉलो, करा.

https://www.business-standard.com/article/current-affairs/chandrayaan-2-... इथे पण माहिती आहे.

मी आत्ता पडी मारून रात्री एक दोन ला उठून बघेन. नाही नाही म्हटले तरी देव पाण्यात घालून ठेवलेत. १९६९ मध्ये अमेरिकेने चंद्रावर माणुस उतरवायचे जगप्रसिद्ध घटना घडली तेव्हा मी चार वर्शा ची होते. पण कथा कल्पना कवितां मधून चंद्रावर व अंतरा ळा त जायचे स्वप्न तेव्हा पासून जिवंत आहे. माहिती, मते ह्या त्यात काये एव्ढे अमेरिका क्यानडा तर कधीच जाउन चंद्र जुना झालाय. चायना पण जाउन आलाय. सर्व प्रतिसादांचे स्वागत.

भारतीय मून लँडरचे नाव विक्रम असे आहे. गो विक्रम डू अ गुड जॉब नाव.

तांत्रिक माहिती उद्या अपडेट करीन धाग्यात नाहीतर प्रतिसा दात. पण एक्साइट मेंट इज माउंटिन्ग. रेट्रो थ्रस्टर्स........

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाईट वाटणे, इमोशनल होणे, चटकन डोळे ओले होणे आणि अश्रू गळणे वि. जे झालं तसं होणे... मोमेंटची वाट बघितल्या सारखं.
पाच एक वर्षानंतर मुलांनाही भावना काबूत ठेवायला शिकवतो, मुलांच्या मनाविरुद्ध काही होणं हे तर सर्वस्व गमावल्या सारखं असतं, तरी त्यांना कुठे कशा आणि किती भावना सांडायच्या हे शिवतोच ना? वर लोक 95% काय 99.99% असे काय काय आकडेमोड करून यश आहे म्हणय्येय.
असो... ट्रोलिंग ते कविता सगळाच वेड्याचा बाजार... काय झालं त्याचा analysis करायला शुभेच्छा.

सिवन रडले यात विशेष आश्चर्य नाही.11 वर्षं प्रयत्न करून, आपल्या सारख्या रिसर्च वर जास्त खर्च करण्याची ऐपत नसणाऱ्या देशात जे सक्सेस किंवा फेल्युअर प्रायव्हेट काही माणसांपुरतं असू शकलं असतं काही वर्षांपूर्वी ते आता मीडिया वाढल्याने क्षण नि क्षण सार्वजनिक होणार, फेल झालं त्यावर हजार रिपोर्टर फेल हा शब्द वापरून ओरडून प्रश्न विचारणार याने दुःख पण अश्रू बनणार यात नवल नाही.
लहान मुलाला स्टाफ रूम मध्ये बोलावून ओरडणे आणि 70 मुलांच्या क्लास समोर काहीतरी ओरडून विचारणे यात लहान मुलाच्या स्ट्रेस लेव्हल मध्ये फरक असेलच.
प्रत्येकाचा दुःख, ताण, निराशा, अँकसायटी यात व्यक्त होण्याचा मार्ग वेगवेगळा असतो.

चंद्र यान 2, ह्याचे प्रक्षेपण नियोजन केल्या प्रमाणे यशस्वी रित्या झाले .
पृथ्वी ची कक्षा चांद्रयान नी नियोजन प्रमाणेच भेदली .
चंद्रा च्या कशेत नियोजन प्रमाणेच प्रवेश केला
आणि ही सर्व काम अतिशय महत्त्वाची आणि जोखमीची आहेत .
त्या नंतर चंद्रा वर उतरण्यासाठी लँडर तयार झाले सर्व काही नियोजन प्रमाणेच होत होत 2 km अंतर चंद्र भूमी पासून शिल्लक राहिले होते आणि संपर्क तुटला .
चंद्रा chya ह्या भागात जगातील कोणत्याच देशाने यान उतरवले नव्हते.
ते काम भारताने केले .
भले शेवटचा टप्पा यशस्वी झाला नाही .
नासा सहित जगभरातील मीडिया नी भारताचे आणि मोहिमेत सहभागी असणाऱ्या संशोधकांचे कौतुक केले .
कारण त्यांना त्यातील तांत्रिक अडचणी माहीत आहेत .
हे काम किती अवघड आहे ह्याची जाणीव त्यांना आहे आणि त्यांची वैचारिक लेवल उच्च दर्जाची आहे ,म्हणून इस्रो प्रमुख भावना विवेष
झाले ह्याला महत्व न देता त्यांच्या कार्याला त्यांनी महत्त्व दिले .
ह्या सर्व मोहिमेचा नेतृत्व इस्रो प्रमुख करत होते त्यांच्या वरच बिनडोक लोक टीका करत आहेत .
टीका करण्या साठी बुध्दी ची बिलकुल आवशक्यात नाही .
आणि फक्त वैचारिक लेवल नीच दर्जाची असावी लागते.
काही व्यक्ती कठोर असतात बाप मला तरी रडत नाहीत तर काही हळवे असतात.
इस्रो प्रमुखांना भावना अनावर झाल्या हे ते सवेदांशील आहेत हे दर्शवत .
मनाने कमजोर आहेत म्हणून रडले हा निष्कर्ष शत मूर्ख लोकच काढू शकतात .
कारण इस्रो प्रमुख रडले भावना विवेश झाले म्हणून जे टीका करत आहेत कारण ते स्वतः नक्की निर्लज्ज असतील .
इस्रो प्रमुखांनी त्यांना दिलेली जबाबदारी व्यवस्थित पार पाडली आहे त्यांचे मनापासून अभिनंदन .
आणि निर्लज्ज लोकांचा निषेध

सीमा +१
बाकी इथेही राजकिय धुळवड बघुन उबग वाटला आणि सोशल मिडिया तर माकडाच्या हाती कोलित.

>>प्रत्येकाचा दुःख, ताण, निराशा, अँकसायटी यात व्यक्त होण्याचा मार्ग वेगवेगळा असतो.<<. +१
आणि काहिंनी यावरुन ऑर्डर फॉलो केली, रडण्याचं नाटक केलं वगैरे निष्कर्श काढुन आपापल्या क्ल्पनाशक्तिची दिवाळखोरी जगजाहिर केली. डिजगस्टिंग...

आणि काहिंनी यावरुन ऑर्डर फॉलो केली, रडण्याचं नाटक केलं वगैरे निष्कर्श काढुन आपापल्या क्ल्पनाशक्तिची दिवाळखोरी जगजाहिर केली. डिजगस्टिंग... >>> शिक्कामोर्तब म्हणा. रडा अशी ऑर्डर होती काय त्यांच्या मते? मग संपर्क तुटला असं जाहीर करा अशीही ऑर्डर असेल नैका? कारण कारणाशिवाय कसं रडणार? असो.... ज्यांना कुठल्याही निराशेच्या क्षणी पाठीवरून हात फिरवणारं कुणी मिळतं ते नशिबवान असतात. त्याक्षणी हौसला द्यायचं काम करून त्यात गुरफटून न राहता आपल्या कामाला पुढे निघून जातो माणूस. हृदय, कर्तव्य आणि कर्तव्यनिष्ठूरता एकाच ठिकाणी. आणि ते पोहोचतंय लोकांपर्यंत.

एडिसन हा हाडाचा वैज्ञानिक होता. प्रयोगशाळा आगीत भस्मसात झाली तरी म्हणाला बरं झालं सर्व चूकाही जळून गेल्या. >>>> निकोला टेस्ला .... नॉट एडिसन

मला तरी वैयक्तिक चांद्रयानाचं काही कौतुक नाही व नव्हतं. माझ्या गावात व आजूबाजूच्या पन्नास किलोमीटर परिसरात अनेक रस्ते कच्चे आहेत. पावसाळ्यात फार हाल होतात. चांद्रयान यशस्वी झाले असते तरी मला आनंद झाला नसता. मी इंडियाच्या भारतात राहतो.

अमर तुला नाही समजणार चांद्रयान 2 चे महत्व .
उगाच तुझी नसलेली बुध्दी इथे पाजाळू नको .
त्या पेक्षा तुझ्या गावातील लोकांना एकत्र करून जो रस्ता खराब आहे तो श्रम दानाने दुरुस्त करून घे .
ते काम सुधा तुला जमेल असे वाटत नाही .
कारण गावात तुझ्या शब्द ला काही किंमत असेल असे मला तरी वाटत नाही

माध्यमांनी काय दाखवायचे काय नाही ह्याचे भान ठेवले असते तर हा विषय चर्चेतही आला नसता. कुणाच्या भावना बघायला आम्ही रात्र जागवली नव्हती.
१९९५ च्या खग्रास सूर्यग्रहणाचे दूरदर्शनवर थेट प्रक्षेपण चालू असताना नेमके ग्रहण लागताना कॅमेरा भलतेच निसर्ग सौदर्य दाखवत होते, तेव्हा स्टुडिओत प्रोफेसर यशपाल भडकले होते, त्यांनी सूर्यावर कॅमेरा केंद्रित करायची सूचना केली होती . खरंच लोकांना अशा गोष्टींमध्ये रस नसतो. ज्यांना सहानुभूती वाटते ते व्यक्त होतात, ज्यांना खटकते तेही व्यक्त होणार.ह्यावरून कोणालाही नावं ठेवायची गरज नाही.

http://madraswanderer.blogspot.com/2009/07/neem-ka-thana-memories.html?m=1

प्रो. यशपाल यांचा तो रागीट अवतार आजही आठवतो. डायमंड रिंग वगैरे खूप छान दिसली होती. पण ते केस का कापत नव्हते?

इस्रो प्रमुखांनी भावनेला
वाट मोकळी करून दिली हे ज्यांना घटकले असेल तर त्यांनी व्यक्त होताना प्रसार माध्यमावर टीका केली असती पण तसे न करता इस्रो प्रमुखां न ची खिल्ली मोदी द्वेष मुळे त्या लोकांनी उडवली आणि ती बिलकुल स्वीकारता येणार नाही .

<<आणि काहिंनी यावरुन ऑर्डर फॉलो केली, रडण्याचं नाटक केलं वगैरे निष्कर्श काढुन आपापल्या क्ल्पनाशक्तिची दिवाळखोरी जगजाहिर केली. डिजगस्टिंग... >>> शिक्कामोर्तब म्हणा. रडा अशी ऑर्डर होती काय त्यांच्या मते? मग संपर्क तुटला असं जाहीर करा अशीही ऑर्डर असेल नैका? कारण कारणाशिवाय कसं रडणार? असो.... ज्यांना कुठल्याही निराशेच्या क्षणी पाठीवरून हात फिरवणारं कुणी मिळतं ते नशिबवान असतात. त्याक्षणी हौसला द्यायचं काम करून त्यात गुरफटून न राहता आपल्या कामाला पुढे निघून जातो माणूस. हृदय, कर्तव्य आणि कर्तव्यनिष्ठूरता एकाच ठिकाणी. आणि ते पोहोचतंय लोकांपर्यंत. >>

------- प्रत्येकाचा दृष्टीकोन वेगळा असतो.

आईचा आशीर्वाद घेतांना, आईला नमस्कार करतांना किंवा आईच्या हाताने मिठाई भरवतांना.... ज्यांना सोबत कॅमेरा/ फोटोग्राफर लागतो आणि वर जोडीला उत्तम अभिनय क्षमता असेल तर अशा घटनेचा event न केल्यास मला आश्वर्य वाटेल. मोदी यांनी कुठलिही निराशा केली नाही.

ज्याप्रमाणे देवाला नवस करुन, गणपतीला नमस्कार करुन त्याचा आपल्या संशोधनात यश मिळण्यास उपयोग होईल अशी अपेक्षा ठेवणारे हे "हाडाचे शास्त्रज्ञ " नसतात तसेच संशोधन मोहिमेची सांगता अपेक्षेप्रमाणे झाली नाही म्हणून रडणारे हे पण शास्त्रज्ञ नसतात.... ते शास्त्राची डिग्री असलेले प्रशासकीय अधिकारी आहेत.

गेला महिनाभर मायबोलीवर राजकारणी धागे थंड पडले होते. मोदींनाच दया आली शेवटी..... दिले एकदाचे कोलीत हाती. आता अजून किती दिवस कोलीत जळत राहते ते पहायचे.

सीमाला अनुमोदन.
इनामदार वगैरे सारख्यांचे प्रतिसाद खरंच वाईट आहेत. दुर्लक्ष करा.

उदय तुम्हाला मी हुशार समजत होतो .
पण तुमची मत अत्यंत कनिष्ठ दर्जाची आहेत
रडणाऱ्या इस्रो प्रमुखांनी 95 percent योजना पूर्ण केली आहे हे तुमच्या डोक्यात शिरले नाही का .
कोण गणपती ची पूजा करत कोण अल्ला ची पूजा करत कोण बुध्द ची पूजा करत ह्याचा इथे काय संबंध .

सिवन यांचं भावनाविवश होणं नैसर्गिकच असणार आणि साहेबांनी दिलेली मिठीही कदाचीत त्याची उत्स्फूर्त प्रतिक्रिया असेल, पण साहेब थोडे जास्तच कॅमेरा फ्रेंडली असून त्यांचा याबाबत आधीचा ट्रॅकरेकॉर्ड पाहता कोणाला या नैसर्गिक प्रसंगात कृत्रिमतेचा भास झाल्यास नवल नाही.

एक उदाहरण - फेब्रुवारीत काश्मीर दौऱ्यावर असताना महाकाय दल सरोवरात दूरपर्यंत कोणीही नसताना(सर्व शहर बंद होतं ) कोणाला हात दाखवून अभिवादन करत होते त्यांनाच माहिती.
https://youtu.be/cx6lpHS4ReE
https://www.news18.com/news/buzz/people-left-puzzled-after-pm-waves-at-e...

प्रत्येकाचा दृष्टीकोन वेगळा असतो. >>>> बरोबर. तुमचा माझ्यापेक्षा वेगळा आहे.

आईचा आशीर्वाद घेतांना, आईला नमस्कार करतांना किंवा आईच्या हाताने मिठाई भरवतांना.... ज्यांना सोबत कॅमेरा/ फोटोग्राफर लागतो >>>> फोटोग्राफरशिवायही ते मातोश्रींना भेटत असतील की. जज का करताय?

<<<ज्याप्रमाणे देवाला नवस करुन, गणपतीला नमस्कार करुन त्याचा आपल्या संशोधनात यश मिळण्यास उपयोग होईल अशी अपेक्षा ठेवणारे हे "हाडाचे शास्त्रज्ञ " नसतात तसेच संशोधन मोहिमेची संगता अपेक्षेप्रमाणे झाली नाही म्हणून रडणारे हे पण शास्त्रज्ञ नसतात.... ते शास्त्राची डिग्री असलेले प्रशासकीय अधिकारी आहेत.>>>> हा झाला तुमचा दृष्टीकोन. आणि तोच सत्य आहे हा अट्टाहास.

माझे मत मी वरती मांडलय, थेट प्रक्षेपण नसते तर ते रडले नसते. ही मोहीम किती यशस्वी झाली ह्याचा त्यांच्या रडण्याशी काहीही संबंध नाही . प्रसार माध्यमांनी लाजच सोडली आहे, निदान इस्रोला त्याची लागण लागू नये असे मनापासून वाटते.

कोणाला हात दाखवून अभिवादन करत होते त्यांनाच माहिती. >>> दिसतायत की दाल लेक मध्ये होड्या फिरताना. आणि त्यांना नसतील करत तर कॅमेऱ्यातून आपल्याला करत असतील हात Lol .

Pages