बंड्याची टपरी

Submitted by जिद्दु on 2 September, 2019 - 02:04

वडाच्या झाडाखाली बंड्याची चहाची टपरी होती. रोज संध्याकाळी चहा पिऊनच मी रात्रपाळीला कामाला जात असे. मागच्या महिन्यात त्याचा अपघाती मृत्यु झाल्याने रोज रस्त्यावरून जाताना ती बंद पडलेली टपरी पाहून काळजात धस्स व्हायचं. काही दिवसांनी अमावस्येच्या संध्याकाळी तिथून जाताना पाहतोय तर बंड्या चहाची तयारी करत होता. मी त्याकडे पाहत चाललोय आणि तो माझ्याकडे डोळे फाडून बघत होता. भुताखेतांवर विश्वास नसला तरी माझी हिम्मत दाद द्यायला लागली होती. कसाबसा कामावर पोहोचलो तर तिथं कोणी त्याला पाहिलं नव्हतं. रात्री उशिरा भीतभीतच तिथून यायला लागलो तर टपरीवर चहाच्या भांड्यातून वाफा चाललेल्या दिसत होत्या पण बंड्याचा तपास नाही. धाडस करून गाडीवरून उतरलो आणि टपरीजवळ गेलो. तेवढ्यात पाठीवर मागून थंड हाताचा स्पर्श झाला. माग वळून बंड्याला पाहिल्यावर मी उडालोच. तसं तो म्हणाला,"अहो मी बंड्याचा जुळा भाऊ राहुल आहे."

(हि शशक नसल्याने मी धागा संपादित केलाय )

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Lol
बंड्याचा भाउ गुंड्या असतं तर अजुन जमलं असतं Lol

सर्व प्रतिसादकांचे आभार
सस्मित, मी आधी धोंड्या नावाचा विचार केला होता पण आधीच कमी शब्दातील रहस्यकथेचा गम्भीर टोन मेंटेन करायचा प्रश्न होता त्यात लेखकानेच विनोदनिर्मिती नको करायला म्हणून आवर घातला त्या नावाला Lol
बाकी, ही गोष्ट आधी दोनशे शब्दांची होती पण नन्तर १०० शब्दांची अट पाहिली; आता लिहिलीच होती तर काटछाट करून दिली डकवून.

तू लिहू शकतोस शंभर शब्दांत. अजून वेळ घे आणि लिही. उत्तम कथा बिज आहे. नेमक्या शब्दात मांड. जमेल.

आणि बदल करून धागा गणेशोत्सव २०१९ मध्ये काढ. Happy

धन्यवाद मधुराजी , ही गोष्ट आता शिळी झाली पण दुसरी चांगली कल्पना सुचली तर नक्की लिहितो. कल्पना तश्या बऱ्याच आहेत डोक्यात पण शशक बनवताना त्या कल्पनांवर अन्याय होऊ शकतो.