बालमुद्रा - छोट्या मित्रांसाठी अनोखा उपक्रम (मुदत १५ सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे.)

Submitted by संयोजक on 1 September, 2019 - 22:59

logo 2.jpg"बालमुद्रा"

लहान मुलांच्यात प्रचंड सृजनशीलता असते. आपल्याला वेगळा विचार करण्यासाठी प्रयत्नपूर्वक चाकोरीबाहेर जावे लागते पण लहान मुलांसाठी ती चाकोरीच अस्तित्वात नसते.
आपल्या मोठ्यांचे विचार जेंव्हा प्यादे होवून पटावरच्या चौकटीत एकेक घर मागे पुढे करत असतात तेंव्हा मुलांच्या कल्पनांचे वारू वजीरासारखे आडवे-तिडवे बिनघोर विहरत असतात!
अश्यावेळी आपल्या मोठ्यांचे कर्तव्य असते की त्यांचे रंग मावतील इतका मोठ्ठा कॅनव्हास त्यांना मिळावा. त्यांच्या कल्पनांना संधीचे पंख मिळावेत
असाच हेतू मनात ठेवून मायबोलीकर छोट्या दोस्तांसाठी घेवून येत आहोत एक नवीन उपक्रम,
"बालमुद्रा" - एखाद्या वस्तू किंवा संकल्पनेसाठी बोधचिन्ह (लोगो) रेखाटण्याचा उपक्रम.
यासाठी विषय आहेत
१) भारतीय बालविज्ञान संग्रहालय
२) तारांबळ (kids adventure park)
३) बालवाचनालय
४) 'थंड'र (मुलांसाठीचा आईसक्रीम ब्रॅंड)

उपक्रमाचे नियम:
१) छोट्या दोस्तांसाठीचा हा उपक्रम आहे, स्पर्धा नाही.
२) हा उपक्रम फक्त मायबोलीकरांच्या मुलामुलींकरता आहे.
३) कार्यक्रमात आपल्या पालकांच्या आयडी नेच भाग घ्यायचा आहे.
४) बोधचिन्ह हाताने किंवा संगणकाच्या मदतीने बनवलेले चालू शकते (संगणकावर बोधचिन्ह बनवताना कुठल्याही प्रकारच्या तयार इमेजेस वापरू नयेत, शेप्स किंवा क्लिपआर्ट चालतील)
५) वयोगट - १० ते १६ वर्षे
६) चित्रे पाठवण्यासाठी 'मायबोली गणेशोत्सव २०१९' या ग्रूपचे सदस्य असणे आवश्यक आहे. हा ग्रूप सदस्य नोंदणीकरता २ सप्टेंबर रोजी खुला करण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी.
७) 'मायबोली गणेशोत्सव २०१९' ह्या ग्रूपचे सदस्यत्व घेण्यासाठी या पानाच्या उजवीकडे दिसणाऱ्या 'मायबोली गणेशोत्सव २०१९' या निळ्या शब्दांवर टिचकी मारा. नंतर 'सामील व्हा' या शब्दांवर टिचकी मारा.
८) याच ग्रूपमध्ये उजवीकडे 'नवीन लेखनाचा धागा' या शब्दांवर टिचकी मारा. (गणेशोत्सव २०१९ ग्रूप मधले गप्पांचे पान, नवीन कार्यक्रम हे पर्याय वापरायचे नाहीत.)
९)
१. मायबोलीवरील प्रकाशचित्रांबद्दल धोरण
https://www.maayboli.com/node/47635
२.पिकासा ते मायबोली फोटो देणे
https://www.maayboli.com/node/43465
१०) प्रवेशिका "बालमुद्रा - पाल्याचे नाव" या नावाने द्यावी.
११ ) प्रवेशिका गणेश चतुर्थीपासून २ सप्टेंबर २०१९ (भारतीय प्रमाण वेळ) ते अनंत चतुर्दशीपर्यंत १५ सप्टेंबर २०१९ (अमेरिकेची पश्चिम किनाऱ्यावरची प्रमाणवेळ) पाठवता येतील.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

संयोजक,
हे बालगोपाळांचं उपक्रमासाठीचं वय कमी नाही करता येणार का ?
किंवा मग नाव बदलून किशोरमुद्रा वगैरे काहीतरी करा.
माझ्या चिंकीला भाग घ्यायचा होता स्पर्धेत. Happy