रात्र सावळी .कळी कोवळी

Submitted by avi.appa on 31 August, 2019 - 06:21

मोकळ्या कुंतलात माळतोस स्वप्नांची सुमने..
सांग ना,सख्या कुठुन आणतोस ती सुमने?
*
निद्रेत अनावृत देहावर कसा माळतोस तो चंद्र्मा
सांग ना? जागेपणी कशी उमटते नखक्षतांची रांगोळी?
*
अरे धसमुसळ्या..मीठीत घेत चुरगाळतोस देह माझा
सांग ना..उरात कसे भरतोस? ते टिपुर चांदणे
*
मिलनाची अधीर ती रात्र सावळी .कळी कोवळी
सांग ना.कशी काचते.मधुघटानी भरलेली चोळी??

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults