माझं गाव

Submitted by अर्मोह on 30 August, 2019 - 02:37

उन्मळुन टाकलेस तु.. हळव्या त्या क्षणांना,
निरागस मनांचे आता.. फक्त अवशेष मागे राहिले,
कधी.. कसे.. ना कळले.. कोवळ्या त्या जीवांना,
आसवांचे पूर त्यांच्या, निशब्द पावसाने जे पाहिले ।।

क्षणभर विसरु पहातो.. त्या रक्तरंजित चुलींना,
चित्कार पाखरांचा आता.. तो चिखलात माखलेला,
कोपली धरणी माता.. ना कळले त्या सरींना,
आठवणीतला गाव माझा.. आता आठवणीतच राहिलेला ।।

Group content visibility: 
Use group defaults