ऋतू येत होते,

Submitted by avi.appa on 29 August, 2019 - 12:47

ऋतू येत होते, ऋतू जात होते
तुझे बहरणे, सखे सुरुच होते
*
नव्हते जरी कोरले, काजळ नेत्रास.
शरसंधान मात्र तुझे, चालुच होते.
*
आणलास आव कितिहि आलिप्तपणाचा
तरी बघुन मला लाजणे चालुच होते.
*
कितिहि नकारले तरी, मला बघता
तुझे अल्लड्पणे हसणे ,चालुच होते
*
पुरे सोस सजवण्याचा.तो गुलाबी चेहेरा
बघुन शशिबिंब मेघपल्लवि लाजले होते
*
नको न्याहळुस,सारखे देखणे रुप दर्पणात,
कित्येक आइने,तव कटाक्षानेच भंगले होते
*
नाहि भेटणार.,जरी म्हणाली निर्धाराने
रोज स्वप्नात येणे मात्र चालुच होते
*
भाळलो..चुक माझ्या एकट्याचिच नव्हति
तुझे मधाळ तारुण्य हि जबाबदार होते
*
आपले मधुर नाते युगायुगाचे आहे
प्राक्तन बदलणे तुलाहि अशक्य होते.

Avinash

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults