गुड मॉर्निंग

Submitted by रिना वाढई on 27 August, 2019 - 07:02

"गुड मॉर्निंग मॅडम "
ऑफिस मध्ये पोह्चल्याबरोबर ऑफिस बॉय ने रेवा ला गुड मॉर्निंग म्हटलं ."मी तिकडे येणार होतो तुम्हाला गुड मॉर्निंग म्हणायला पण तुम्हीच आल्या ". या वाक्यावर नकळत रेवा ला हसू आलं आणि ती खळखळून हसली . तिने सुद्धा त्याला गुड मॉर्निंग म्हटलं आणि पंच करायसाठी आत एन्ट्री केले तोच सेक्युरिटी गार्ड ने तिला अडवत म्हटलं , "मॅडम एक सांगू का ? तुम्ही रोज येताना बघतो मी, पण तुम्ही कधी हसताना दिसले नाही ... आज पहिल्यांदाच तुम्ही असे हसताना दिसत आहात . "
आज काही स्पेशल आहे का मॅडम , रेवाने त्याला उत्तर देत म्हटले कि ‘असं काही नाही हो काका’ , मी हसते कि रोज .. पण त्या गार्ड ला एवढी ख़ुशी झाली होती रेवाला हसताना बघून कि त्याने अजून तिला अडवत म्हटलं ,” नाही मॅडम आज नक्कीच खुश असणार तुम्ही म्हणूनच आज हसल्या ”. रेवा परत एकदा त्याच्याकडे बघून हसली आणि पंच करून निघून गेली आपल्या जागी.
आज जरा जास्तच उशीर झाला होता तिला ऑफिस मध्ये पोहचायला , तस रोजच ती ५ ते दहा १० मिनीटस लेट जाते पण आज मात्र तब्बल अर्धा तास उशीर झाला होता तिला . पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे रोडवर चिखलच चिखल झालं होत आणि नेमकी आज येताना तिची गाडी फसली होती चिखलात ,आता तर तिला चिखलाचा कमी आणि स्वतःचाच जास्त राग येऊ लागला होता . माहित होत आपल्याला रोड नक्कीच खराब असेल, तरीसुद्धा आपण ५ मिनिट लवकर निघायच्या ऐवजी १० मिनिट उशिराच निघतो . आज श्लोक तीन दिवसांनी स्कूल मध्ये जाणार होता ... तीन दिवस त्याची तब्बेत बरी नव्हती ,म्हणून रेवा ला जरा आराम होता , पण आज तो जाणार असल्यामुळे त्याच्या तयारीची जिम्मेदारी सुद्धा तिच्यावरच होती . ३ वर्षाचा आहे श्लोक पण त्याची तयारी करून देण्यासाठी ३ लोक सुद्धा कमी पडतात .
आजकाल रेवाला ला जरा बर नसते म्हणून तिने सकाळी उठून योगा किंवा व्यायाम करायचं असं ठरवलं होत . पण योगा आणि व्यायाम साठी लवकर उठणं जरा कठीणच झालं होत तिच्यासाठी . मग तिने त्यातून मार्ग काढला आणि तो म्हणजे झुंबा डान्स करायचा .. तस डान्स तिच्या आवडीचा म्हणून यासाठी ती लवकर उठत होती आणि ती डान्स करायला आपल्या नवऱ्याला सुद्धा सोबत घेऊ लागली . जेव्हापर्यंत श्लोक उठत असे तेव्हापर्यँत त्याच्यासाठी पोळी तयार असणे अनिर्वाय होते . तो उठून ब्रश केलं कि लगेच त्याला पोळीचा नाश्ता द्यावा लागायचा . घरात २ ,३ लोक राहिले कि त्यांचे कामे सुद्धा कमीच असतात , पण रेवाकडे चांगले ७,८ जण असायचे , सासू -सासरे वगळता बाकी कोणी शिकायला आलेले तर कोणी नोकरी करत असत . आणि पाहुणेनवाबी तर दर आठवड्याला लागलीच होती . सकाळी लवकर उठून ४,५ जणांचे डबे बनविणे आणि बाकी छोटीमोठी घरातील कामे आटोपून ,पूजा करून जाणे हे रोजचा नित्यक्रम ठरलेलं होत . आता शलोक स्कूल मध्ये जायला लागला, त्यामुळे त्याचे २ ,३ कामे जरा जास्तच वाढले होते . यासगळ्या गोष्टी करता करता रेवाला स्वतःसाठी वेळ काढणे थोडं कठीणच होते , पण तरी तिला भराभरा कामे आटोपायची सवय लागल्यामुळे ती आता स्वतः साठी थोडा तरी वेळ काढून सकाळी झुंबा करू लागली होती .
नवीन नवीन जेव्हा रेवाचं लग्न झालं होत तेव्हा तिचा नवरा रोज तिला bye केल्याशिवाय ऑफिस ला जात नव्हता , आणि तीसुद्धा आवर्जून त्याला बाहेर गेटपर्यंत सोडायला जायची. मात्र आता सगळं बदललं होत , घरात एवढे लोक वाढले होते कि तिचा नवरा केव्हा ऑफिस ला निघून जायचा हे कळत सुद्धा नव्हत तिला .
“ती आताही गेटपर्यँत सोडायला जायची, पण आता तिच्या नवऱ्याची जागा मुलाने घेतली होती” .
एवढी सगळी सकाळची धांदल करता करता रेवा कशीतरी ऑफिस ला पोहचत होती पण तिच्या चेहऱ्यावर तो आधीचा निस्तेज राहिला नव्हता .. तिच्या नकळत तिच्या चेहऱ्यावर नेहमी थकवा आणि काहीतरी दुखी भावना सगळ्यांना दिसत होते. “तिच्या चेहऱ्यावर थकव्याने केव्हा राज्य केले हे रेवाला कळले सुद्धा नव्हते” . कोणी तिला एवढे नोटीस करत असतील असे विचार देखील तिच्या मनात कधी आले नव्हते . त्या ऑफिस बॉय च्या गुड मॉर्निंग म्हणण्याने रेवा ला खरेच तिची सकाळ खूप सुंदर असल्यासारखं वाटलं, आज पहिल्यांदाच सकाळी कोणाशी बोलून ती हसली होती .
गाडीने येताना उडालेला चिखल आता पहिल्या पावसात नाव्हून निघालेल्या मातीचा सुगंध देऊ लागला होता . घरी जाता - येता पावसाची सुरु असणारी ती रिपरिप आता अंगावर फवारे उडविल्यासारखे वाटत होते .त्या एका गुड मॉर्निंग ने लक्ष वेधून घेतले होते रेवाचे . त्या सेक्युरिटी गार्ड च्या बोलण्याने रेवाला जाणवले कि ,"सगळ्या दुनियेच्या नजरा असतात च आपल्यावर , आपण कस बोलतो , कस वागतो हे सगळ्याच्या नजरेत येतच . आपण मात्र आपल्या च मनातल्या विचरांमध्येच मग्न असतो .
कशी सांगणार रेवा त्या सेक्युरिटी काका ला , कि काका मी खुश तर रोज च असते पण ती ख़ुशी व्यक्त करण्याइतका सुद्धा वेळ माझ्याकडे नसतो . सकाळच्या त्या कसरतीमध्ये हसण्यासाठी जागाच नसते .

पण काही का असेना रेवा ला त्या गुड मॉर्निंग शब्दामुळे स्पुर्ती मिळाली होती , तिने ठरवलं कि रोज आपण या सगळ्यांना गुड मॉर्निंग म्हणायचं . आपल्या किंवा कोणी आपल्याला गुड मॉर्निंग म्हटल्यामुळे कदाचित “सकाळ खरंच चांगली जाते” हे रेवा ला जाणवलं .

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

.

प्रयत्न चांगला आहे.
पण हिंदीचा पगडा जाणवतोय, मराठी वाचा म्हणजे शब्द संग्रह वाढेल.