स्फूट - आभाळ

Submitted by सुप्रिया जाधव. on 26 August, 2019 - 07:40

आभाळाच बर असत न ?

अधांतरी तरंगायच !
वारं वाहेल तिकड भरकटायच !

टक लावून बसलेल्या धरतीला
सकाळ-संध्याकाळ विलोभनिय रंगांनी पछाडायच !

वाट्टेल तेव्हा भरून यायच अन कोसळेल कोसळेल म्हणेतो गुंगारा देवून पसार व्हायच !

अस्स गरजायच ! अस्स गरजायच ! की वाटाव प्रलय येणार !!

वेळ मारून नेण तर कुणी याच्याकडूनच शिकाव !

मनमानी तर अशी की नको तिथ नको तेव्हा धुमाकूळ घालायचा अन हव तिथे हवा तेव्हा ठण-ठणाट !!

असो बापुडं !

डोक्यावर छत धरतय, लांबून का होईना न्याहाळता येतय हे ही नसे थोडके !!

सुप्रिया मिलिंद जाधव

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान