एक कृष्ण हवाच ना

Submitted by nimita on 24 August, 2019 - 14:09

*एक कृष्ण हवाच ना*

एक कृष्ण हवाच ना ?
मनातलं सांगायला
न बोललेलं कळायला
हृदयात साठवून
आठवणीत रमायला
प्रत्येक राधेला
एक कृष्ण हवाच ना?

तो समजूत काढेल
या खात्रीने उगीच रुसून बसायला
तिच्या लटक्या रागानेही
व्याकुळ व्हायला
रुसव्या फुगव्यात रात्र घालवायला
प्रत्येक राधेला
एक कृष्ण हवाच ना...

या रित्या आभाळात
रंग भरायला
कठीण कोरड्या वाटेवर
मोरपीस अंथरायला
आयुष्याच्या बासरीतून
सप्तसूर छेडायला
प्रत्येक राधेला
एक कृष्ण हवाच ना ?

-प्रिया जोशी
२४.८.२०१९

Group content visibility: 
Public - accessible to all site users