Submitted by यतीन on 21 August, 2019 - 00:08
बायको.............
आहे हा एककल्ली राव चिडका।
काहीही निर्णय घेतो तडकफडका।।
रोजच्या नवनवीन मारतो गप्पा।
एकतरी गाठला का चांगला टप्पा।।
दिसणे साधे हासणे गालातल्या गालात।
नाही मिशा पिळायल, ताकद फक्त बातात।।
खाण्या पिण्यात नाही कसली आवड।
खरवड खाऊन म्हणतो किती गोड गोड।।
राजे म्हणतात स्वतःला या घरचे।
खरतर रिकामे आहे खोके वरचे।।
कवीता करता करता नाकीनऊ येतात।
फक्त यमंक जुळवून फुशारकी मारतात।।
दिसा गोड बोलतात, रात्रीत वेगळ्याच चालीत चालता।
चमचाभर घेता अण बाटलीभर रिझवली म्हणून सांगता।।
याचा काही नेम नाही तसा।
आज आसा तर उद्या कसा।।
पण आवडतो याचा मला।
भरपूर भरलेला पैशाचा खिसा।।
असतील कसेही वागतील कसेही।
स्मरुन सांगते राहातील ते या देही।।
घेतला मी ह्या हि-या चा वसा।
कारण याच्या वर माझा भरवसा।।
यश
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
छान लिहिलीये
प्रसादासारखं हातात पडलाय
प्रसादासारखं हातात पडलाय म्हणुन गोड माणुन घ्यायचं असतं.
भारीच
भारीच
धन्यवाद मन्या, सुपु आणि अककू
धन्यवाद
मन्या, सुपु आणि अककू