कचराच कचरा

Submitted by कोहंसोहं१० on 19 August, 2019 - 14:02

इथेही कचरा तिथेही कचरा
सगळीकडे फक्त कचराच कचरा

कोनाड्यात कचरा खोलीत कचरा
घरात कचरा घराबाहेर कचरा
सगळीकडे फक्त कचराच कचरा

रस्त्यात कचरा रस्त्याकडेला कचरा
पुलावर कचरा पुलाखाली कचरा
सगळीकडे फक्त कचराच कचरा

गायीच्या पोटात माश्याच्या घशात
कासवाच्या पाठीत मगरीच्या आतड्यात
सगळीकडे फक्त कचराच कचरा

जमिनीवर कचरा पाण्यात कचरा
हवेत कचरा अवकाशातही कचरा
सगळीकडे फक्त कचराच कचरा

देहात कचरा मनात कचरा
चित्तात कचरा नात्यात कचरा
सगळीकडे फक्त कचराच कचरा

एवढा कचरा पाहून मन गेले वेडावून
क्षणभरातच एक विचार गेला मनात डोकावून
कचऱ्यातच आयुष्य अन आयुष्यातच कचरा
कितीही झाले तरी न होऊ द्यावा मात्र या सुंदरआयुष्याचा कचरा

इथेही कचरा तिथेही कचरा
आपले आयुष्य मात्र आनंदाचे करा

~कोहं सोहं

Group content visibility: 
Use group defaults

कचरा लोकांना कविता कचरा वाटणार. कचरा रुपी प्रतिसाद ओलांडून जाणे आयुष्य सुंदर करण्यासाठी इथे आवश्यक आहे.