स्वार्थी

Submitted by यतीन on 19 August, 2019 - 04:01

कामे असताना गोड गोड बोलून कामे करून घेतली........
मला वाटली ती माझीच माणसे म्हणून मी करून टाकली.......

जवळ घेऊन हातोहात सार्थ साधला......
लहान म्हणता शहाणपणा शिकवला.....

वेडीवाकडी म्हणून समजावून मीच घेतले
पण आता तेच कानामागून तिखट झाले......

वाईट वाटले जेव्हा आपल्याच माणसांना आपणच का खुपतो.......
मुळात आपणच आपली माणसे, आपलीच आहेत असे का समजतो.......

हेच कळत नाही आता.....
वारा येतो आणिक जातो......

कधी सुखद गारवा देतो.......
कधी मधुर आठवणींना उजाळा देतो....

कधी ग्रीष्मात लाही लाही करतो......
कधीतर वादळा सारखा सैरावैरा करतो.....

वादळे शमले की सारे कसे ते लख्ख प्रकाशसारखे समोर येते......
कोण जिंकला अन् कोण हरला ह्यापेक्षा कोण कोणासाठी तरला हे कळते.......

हा असाच वारा आयुष्यात पहिल्यांदाच
आला तर माणसाला वेडापिसा करतो......

जे जे असेल ते ते आपण गमवतो
आपणच आपली वाताहत करून घेतो........

म्हणून साधे सरळ, जेव्हढे जमेल तेव्हढच आपल्या लोकांसाठी करा......
जीव ओतून, आटापिटा करून तहानभूक विसरून करा.......
पण फक्त आणि फक्त अपेक्षा न ठेवता करा........
मग नक्कीच आयुष्यला मिळेल किनारा........
*यश*

Group content visibility: 
Use group defaults

पुर्ण कविता आवडली आणि मनाला पटलीसुद्धा!

शेवटच्या काव्यपंक्ती वाचुन मात्र विं.दा. करंदीकरांची 'देणाय्राने देत जावे' हि कविता आठवली.

धन्यवाद
मन्या, Akku320 आणि नीत्सुश

आजपर्यंत इतक्यांदा अपेक्षाभंग झालाय, कि आता कुणाकडून अपेक्षा ठेवणंच जमत नाही. स्थितप्रज्ञ अवस्था आलीये असं वाटत.
Wink

Chan ahe .. and truth is always bitter... So don't expect anything from anyone..

धन्यवाद,
अज्ञातवासी - अगदी खरय
Urmila Mhatre - अपेक्षाभंग झालाय कि फार वाईट वाटते