पहा, विचार करा.

Submitted by अमर ९९ on 18 August, 2019 - 03:01

https://www.facebook.com/groups/1452678998345060/permalink/2426590177620...
आजकाल आपण सर्वच बाहेर खायला सोकावलो आहे. आईबापांच्या जैविक गरजेतून निर्माण झालेली प्रजा आईबाप एकदमच गरिब असल्याने पैसा मिळवण्यासाठी काहीही धंदे करते. कमीतकमी भांडवलात जास्त मार्जिन असलेले धंदे म्हणजे चहा, वडापाव, पाणीपुरी,भेळ सारखे चटकमटक पदार्थ बनवून विकणे. अत्यंत अस्वच्छ जागेत खाद्यपदार्थ तयार करणं, वेठबिगार मजूरा सारखे कामगारांना राबवून घेणे हे बऱ्याचदा पहायला मिळतं. गटारीच्या पाण्याने भाजीपाला धुणे, पिकवणं हे अलिकडे बघायला मिळाले.
दहा वीस रुपयांत असे पदार्थ मिळतात म्हणून अशा गाड्यांवर लाईन लागलेली असते.
सर्वच विक्रेते एकदम स्वच्छता पाळतात असे अजिबात नाही. काविळ सारखे आजार पसरायला असे खाणे कारणीभूत होते.
प्रशासन सगळीकडे लक्ष ठेऊ शकत नाही. आजकाल स्टिंग ऑपरेशन करून असे प्रकार उघडकीस आणण्याचे प्रमाणही वाढले आहे.‌ पण जनतेनेच मनावर ताबा ठेवून बाहेरचं खाणं टाळावं. अगदीच वाटले तर खात्रीशीर ठिकाणी जाऊन खावं असे वाटते.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

माझ्या मित्राची पोहे, इडली नाश्त्याची गाडी आहे.
मी अन माझा मित्र कुठेतरी जात होतो, आता आठवत नाही, पण मला भूक लागली होती, तेव्हा मित्राला म्हटलं, चल वडा पाव खाऊ. त्यावर तो वैतागला, त्याने सांगितलं की, त्याच्या गाडीच्या शेजारी एक फेमस वडा पाव वाला आहे, हा वडा पाव वाला, गटारातील पाणी वापरून वडे तळतो, पब्लिक रांग लावून तिथला वडा पाव खातो, टेस्टी आहे म्हणून परत परत खायला येतो, त्याने हे सगळं हाव भाव करून डीटेल्ड मध्ये सांगितलं. धक्काच बसला, मी बाहेरचं खायचं सोडून दिलं, काय करायचं असेल तर घरीच करून खातो, नवीन पदार्थ केल्याचा आनंद मिळतो, पैसे वाचतात, प्रकृती बरोबर हेळसांड होत नाही.

मुळात शास्त्राने परान्न वर्ज्य सांगितले आहे ते यासाठीच ! पण बदलत्या काळानुसार निदान स्वच्छता व शुद्धता तपासून मगच अन्न ग्रहण करणे परमावश्यक ठरते !

झोम्याटो व स्विग्गी आजकाल प्रचंड लोकप्रिय आहे , परन्तु त्यामुळे घरचे सात्त्विक जेवण घेण्याची चांगली भारतीय परम्परा हद्दपार होत आहे , त्यात झोम्याटो व स्विग्गी वाले कुठूनकुठून जेव्ण उचलतात राम जाने !

ते फक्त कुरिअर सारखे काम करत असावेत असे मला वाटते, कारण पदार्थ आपल्याला कोणत्या हॉटेलमधून मागवायचा हा ऑप्शन असतो.‌ धन्यवाद.

झोमॅटो, स्वीग्गीवर डिस्कउंटस असतात जी हॉटेलमालकांना आता परवडेनाशी झालीत. दिल्लीत खूप हॉटेल्स लॉग आऊट करताहेत.

अन्नाबाबत कुणीही तडजोड करू नये असे मला वाटते. त्यात दिसकौंटस शोधत बसू नये, ज्यांना परवडते त्यांनी योग्य किंमत देऊन, झालेच तर दोन पैसे जास्त देऊन सकस अन्न विकत घ्यावे, ज्यांना परवडत नाही त्यांच्यासाठी 'झुणका भाकर केंद्रासारख्या सोयी असाव्यात. झुणका भाकर योजनेचा बोजवारा उडाला हे दुर्दैव. अन्नाचा थेट संबंध आरोग्याशी आहे.

धन्यवाद साधना जी. मुळात झुणका भाकर योजना तकलादू होती. एक रूपया मध्ये एका व्यक्तीला एकच भाकर. हे केंद्र चालवायला सरकार भाकरी मागे अनुदान देत होते. पण तरीही घरचे खाऊन लष्कराच्या भाकऱ्या भाजण्यासारखं होते ते. मोक्याच्या जागी केंद्र टाकून नंतर उपहारगृहात रूपांतर केले काही ठिकाणी. अम्मा कॅंटिन यापेक्षा छान आहे.

माझा एक मित्र नैहमीच निरनिराळ्या प्रदर्शनांमध्ये भाग घेतो. त्याचा घरगुती वस्तू विकण्याचा व्यवसाय आहे व बनवण्याचा लघुउद्योग आहे. त्याच्या शेजारी नेहमी एक स्टॉलवाला असतो, जो आईस्क्रीम, सुगंधी दुध बनविण्याचे रेडी मिक्स पावडर विकतो. लोकांना आग्रह करून "टेस्ट करा. फ्रि आहे" ते पेयं सॅम्पल म्हणून देतो. एकदा मी मित्रासोबत गेलो होतो. मी टेस्ट करायला जात होतो तोच मित्राने अडविले. नंतर त्याने सांगितले की लोक फक्त फुकट पिऊन जातात म्हणून तो गटारीचे पाणी टाकून ती पेय बनवतो. मित्र नेहमी प्रदर्शनांमध्ये बरोबर असतो म्हणून त्या विक्रेत्याने त्याला खरं सांगितले होते.

अग्नी सर्व पवित्र करतो.अगदी गटारीचं पाणी वगैरे टोकाचा घाण पणा नसेल तर प्रसंगी रोज दिसणाऱ्या माणसाकडून, डोळ्यासमोर उकळलेलं आणि वासाला चवीला रेड सिग्नल न देणारं काहीही कधीतरी खायला हरकत नाही.(काही जोक्स प्रमाणे अगदी सर्व हायजीन पाळून बनवलेलं खाणं रस्त्यावर चविष्ट लागत नाही. ☺️☺️)
जोक्स अपार्ट, यावर कडक नियम असावे.वेळोवेळी इकोलाय आणि इतर बॅक्टरीया साठी चेकिंग व्हावे.

जीभेला चटक, पायांना वळण आणि खिसा फार रिकामा होत नसेल तर माणूस हायजीन बियजीन पहात नाही. नाक वासाने तिकडे ओढून नेते. चलता है, एवढ्या तेवढ्यानं काही फरक पडत नाही ही आपली मानसिकता आहे. माझ्या ओळखीची एक मुलगी फक्त खाण्यासाठी अनेक ठिकाणी भेट द्यायची. दाबेली इकडेच खावी, अमुक तिकडे छान मिळते म्हणून रोज नवनवीन ठिकाणी जीभेला संतुष्ट करण्यासाठी हिंडत असायची. पण जेव्हा काविळ झाली तेव्हा पासून कानाला खडा लावला तिनं.

सहमत. काय करायचं असेल ते घरीच केलेल उत्तम.

- ईथे अंधेरी मध्ये एक फेमस भजी-पाव वाला आहे....वड्याच्या मिश्रणा मध्ये त्याचा घाम नाही पडला तरच नवल....त्याच हाताने घाम पुसतो, हात न धुताच वडे करतो.

- जे.बी. नगर मध्ये, लकी शॉप च्या पुढे रेडीमेड Idli batter करणारा बसतो, एकदाच ते घेउन आले होते, बघु कशी टेस्ट आहे म्हणुन.
त्या मध्ये माशी पेक्षा छोट्या आकाराचा काहीतरी किटक सापडला होता. Sad Sad Sad

मी तीथे जाऊन खुप सुनावल त्याला. पण अश्या लोकान बरोबर लागायला आपल्या बिझी शेड्युल मध्ये कितीसा वेळ असतो ?
आजुबाजुला बघे होते. त्यांना समजल आहेच.

बहुतेक ठिकाणी असे लोक योग्य त्या ठिकाणी हप्ते, खंडणी देत असतात. व बदल्यात त्यांना संबंधित यंत्रणा, गुंड संरक्षण पुरवत असतात. त्यामुळे सामान्य माणूस तक्रार करत नाही. मागे एका जणाचे आर ओ पाणी विकण्याच्या ठिकाणी छापा घातला तर सरळ नळाचे पाणी मिनरल वॉटर म्हणून विकत होता. तीन वेळा बंदी घातली तरी तोच व्यवसाय तोच माणूस परत करीत होता.