कोण आहे तो ??

Submitted by डी मृणालिनी on 11 August, 2019 - 05:11

मी नाही कोणी कवयित्री
नाही कोणी लेखिका
तरी मनातल्या शब्दांची
होऊन जाते कविता

न जाणो कधी माझ्या
हातात कलम येतो
कोऱ्या करकरीत कागदावर
हळुवार स्पर्श करतो

स्पर्शांनी उमटलेल्या या शब्दांना
न जाणो कोण सूर ताल देतो
पूर्ण झालेली कविता
माझ्याकडून म्हणवून घेतो

माझी कविता म्हणजे
बालिशपणाचा उद्रेक
माझी कविता
मलाच वाटते सुरेख

तुम्ही म्हणाल माझ्या कवितेचे
मीच कौतुक करते
पण न जाणो हे माझ्याकडून
कोण करवून घेते

कोण आहे , कोण आहे तो
जो मनातल्या शब्दांची कविता करतो
कोण आहे तो
जो माझ्या कवितेला रूप देतो

शोधतेय , शोधतेय मी त्याला
तुम्ही पण शोधा
भेटल्यावर मात्र
नक्की मला कळवा ....

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

सुंदर! अप्रतिम..

कोण आहे तो?
तुझ्या मनीचा
चंद्रमा तो..
तुझ्या भावनांच्या
भरती-ओहोटीचे
कारण तो!
तुझ्या लेखणीचा
तुझा व्यक्त-अव्यक्त
शब्दांचा नाजुक
अतूट बंध आहे तो! Happy Happy