प्रेम केलय मी तुझ्यावर........

Submitted by shrinand kamble on 10 August, 2019 - 03:27

जग बदलो अथवा ना बदलो
पण मी नाही बदलणार
प्रेम केलय मी तुझ्यावर
आणि ते शेवटपर्यंत निभावणार

नाही मारणार बढाया, ना फ़ुशारक्या
तुझ्यासाठी चंद्र तारे तोडून आणण्याच्या
पण खरंच सत्यात मात्र तुला ठेवणार
प्रेम केलय मी तुझ्यावर
आणि ते शेवटपर्यंत निभावणार

कदाचित तु माझ्या नशिबात नसशील
आणि एक दिवस दुसऱ्याचीच होऊन
हळूच निघून जाशील
पण मी मात्र माझ्या मनास समजावणार
प्रेम केलय मी तुझ्यावर
आणि ते शेवटपर्यंत निभावणार

@ श्रीनंद कांबळे

Group content visibility: 
Public - accessible to all site users