"जीवन"

Submitted by mi manasi on 9 August, 2019 - 10:52

"जीवन"

ऊन सावली जीवन हे रे
जसे मिळाले तसे जगावे l
आनंदाची फुले होऊनी
दुःखाला सामोरे जावे ll १ ll

कुणास देणे नक्षत्रांचे
हात कुणाचे रिते राहिले l
दैवाने हे हिशेब सगळे
त्या त्या खाती लिहिलेले ll २ ll

पान उद्याचे उद्या उलगडू
आज तयाचे कशास ओझे l
काल-आज जे लिहिले-पुसले
त्यात काय रे होते माझे?ll ३ ll
......मी मानसी

Group content visibility: 
Public - accessible to all site users