ठिकरी

Submitted by राजेंद्र देवी on 8 August, 2019 - 23:28

ठिकरी

पडू दे चांगले दान
मिळू दे यशाची शिडी
नकोत ते सर्प जागोजागी
आयुष्याची सापशिडी

सापडू दे लगेचच
लपलेले सुख
नकोच सापडू दे दुःख
आयुष्याचा लपंडाव

मिळू दे सुखाचा झेल
जिंकेन सर्वदा मी
जाऊ दे दुःखाची विकेट
आयुष्याच्या सामन्यात

पडू दे चांगल्या घरात
या देहाची ठिकरी
नको होऊ दे स्पर्श
या दुर्भाग्याच्या रेषांचा

राजेंद्र देवी

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कविता छानच. पण माफ करा माझ्या विचारांच्या चौकटीमुळे मला तितकीशी पटली नाही. Happy

जीवनात या
दुखाःमुळेच मिळे
प्रत्येकास सुखाची चाहुल

दुखाःमुळे मिळे
नवी जगण्याची आशा
सुख माझ्यासाठी
आहे आलस्याची परिभाषा

दुखाःमुळेच येते
घेता सुखाची चव
दुखः नसता जीवनात
कोण पुसतो सुखास!
(हलकेच घ्या.. Happy )

सुखाचा किंचितही ओलावा न मिळालेला व दु:खाने गांजलेल्या जीवाची मागणी पूर्ण होवो. मागितलेले दान मिळो ही सदिच्छा!! छान कविता.