पळा पळा कोण पुढे पळे असे ते पळपुटे

Submitted by चैतन्य रामसेवक on 8 August, 2019 - 22:38

संपता मुद्दे येती गुद्द्यांवरी
चर्चेतून पाय काढता घेती
संघोटे, भगवे आणि सनातनी
म्हणोनी दुषणे इतरां देती
नसता आडात कुठून पोहऱ्यात
तेच तेच गुर्हाळ लावितात
किती समजावूनी पडेना उजेड
पेडगावा जाती पांघरुनी वेड
नाही यांचे वागणे बोलणे सरळ
सत्य सांगू जाता होते जळजळ
स्वत:च्या डोळ्यात असे हो मुसळ
यांना मात्र दिसे दुसऱ्याच्या कुसळ
दाखविता आरसा करितात त्रागा
म्हणती आता येथे उरली न जागा
स्वत:चे कर्म दुसऱ्यावर थोपिती
लावून पाय ..णा दूर ते पळती
अशांच्या नशीबी केवळ फजिती
चैतन्य म्हणे विचारा मनाला
पुसता कशाला दुजा माणसाला
आपले आपण करा परिक्षण
मगच होईल खरी सोडवण

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults