मनं माझे बकुळीचे

Submitted by meenakshi.vaidya on 8 August, 2019 - 04:40

मनं माझे बकुळीचे...

मनं माझे बकुळीचे मंद मंद दरवळणारे
हळुवारपणे हे आनंद तुषार झेलणारे.
फिकीर नाही त्याला कसली मस्तीत राहतो
राग,द्वेश तर दूर लोटतो प्रेमच मनी जपतो.
कोण कुठला?कधी पुसत नाही कुणाला
असे त्याचा तो,जो असे प्रेमात रंगलेला.
असेच आहे मन माझे निराळे जगावेगळे
क्षणाक्षणाला फुलले तरी राहते सदा मोकळे.
यावे कुणी कधी मैत्रीस माझा नसे नकार
आहे जसा मी तसा त्याचा करावा स्विकार.
हे बोलणे माझ्या मनाचे ,असे स्वभाव माझा
पटला ज्याला तोच होई प्रिय सखा माझा.
## मीनाक्षी वैद्य.

Group content visibility: 
Use group defaults